(अ)  खाली दिलेल्या प्रश्नांनी उत्तरे प्रत्येकी एका शब्दात लिहा.

१.  मुलांना घेऊन वाचनालयात कोण गेले ?
उत्तर.  वर्गशिक्षिका मुलांना घेऊन वाचनालयात गेल्या.

२. शिक्षिकेने वाचनालयाचा प्रत्येक पुस्तकांत काय ठेवले ?
उत्तर.
  शिक्षिकेने वाचनालयाचा प्रत्येक पुस्तकांत  एकेक प्रश्नावली ठेवली होती.

(ब)  दिलेल्या प्रश्नांची प्रत्येक एका एका वाक्यात उत्तरे लिहा.

१.  विद्यार्थ्यांनी प्रश्नावली केव्हा सोडवून आणली होती ?
उत्तर
.  वाचनालयाच्या पुढील तासाला विद्यार्थ्यांनी प्रश्नावली सोडवून आणली होती.

२.  प्रश्नावली कोणी उत्कृष्ट उत्तरे लिहिली होती ?
उत्तर.
  महेश, शर्मद, सुझान व मारिया यांनी प्रश्नावलीची उत्कृष्ट उत्तरे लिहिली होती.

३.  शिक्षिकेने कोणाला मार्गदर्शन केले ?
उत्तर. 
ज्या मुलांना उत्तरे नीट लिहिता आली नव्हती त्यांना शिक्षिकेने मार्गदर्शन केले.

४.  महेशने वाचनालयाच्या वहीत काय नोंदावून देवले ?
उत्तर
.  महेशने प्रत्येक पुस्तकातील महत्वाचे विचार वाचनालयाच्या वहीत नोंदावून ठेवले.

५.  शिक्षिका कोणत्या विद्यार्थ्यांना खास गुण देणार होता ?
उत्तर.
  प्रश्नावली नियमितपणे सोडविणाऱ्या  विद्यार्थ्यांना शिक्षिका खास गुण देणार होत्या.

६.  नवीन योजनेचा परिपाठासाठी मुलांना कसा उपयोग  झाला ?
उत्तर. 
नवीन योजनेमुळे मुले वाचनालयाची पुस्तके नीटपणे वाचून रोज  परिपाठाच्या वेळी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यी पाळीपाळीने गोष्ट सांगू लागला.

(क)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन – चार वाक्यात लिहा.

१.  सुझानने वाचनालच्या वहीत कोणती नोंद केली होती ?
उत्तर. 
सुझानने वाचनालयात वहीत वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचे नाव, तिला आवडलेली वाक्ये तसेच त्यातील कथा तीने थोडक्यात लिहिली होती.

२.  शिक्षिकेने कोणती नवीन योजना सांगितली ?
उत्तर.
  वाचनालयाच्या प्रत्येक पुस्तकात शिक्षिकेने एकेक प्रश्नावली ठेवली. त्यात पुस्तकाचे नाव, पुस्तकाचे लेखक,  मजकूर यासंबंधीचे ते प्रश्न होते. प्रश्नावली नियमितपणे सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत खास गुण देण्याची नवीन योजना शिक्षिकेने सांगितली.

३.   सुझानने  वाचनालयाच्या  वहीत कोणती नोंद केली होती ?
                                           वा
    महेशने व सुझानने  वाचनालयाच्या वहीत कोणती नोंद केली होती ?
उत्तर. 
वाचनालयाचा तास असल्याने महेशने व सुझानने  आपापल्या वाचनालयाच्या वही वर्गात आणल्या होत्या. प्रत्येकाने आपल्या वहीला सुंदर वेष्टण घातले होते. वहीच्या आत पहिल्या पानावर सुवाच्य अक्षरात आपले नाव लिहिले होते. मग त्यात वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, पुस्तकातील महत्वाची वाक्ये/ सुविचार इत्यादींची व्यवस्थितपणे नोंद केली होती.

४.  मुख्याध्यापकांनी वर्गातील मुलांचे कौतुक का केले ?
उत्तर.
  शिक्षिकेने नवीन योजने  मुळे वर्गातील मुलांनी वाचनालयासाठी एकेक पुस्तक ठेवले होते व त्यात शिक्षिकेने दिलेली प्रश्नावली सोडवीत होते. ह्या मूळे मुले वाचनायलाची पुस्तके नीटपणे वाचू लागली. रोज परिपाठाच्या, वेळी ह्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी पाळीपाळीने गोष्ट सांगू लागला म्हणून मुख्याध्यापकांनी वर्गातील मुलांचे कौतुक केले.

व्यवसाय :

रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१.  वाचनालयाचा __________ सुरू झाला.

२.  वर्गशिक्षिका मुलांना घेऊन ________ गेल्या.

३.  फक्त _______ मुलांनी हात वर केले.

४.  प्रत्येकाने आपल्या वहीला सुंदर _______ घातलें.

५. ‌ बाईनी आपली योजना ________ केली.

६.  प्रत्येक पुस्तकात एकेक ________ होती.

७.  शर्मदने आपल्याला _________ पुस्तक आवडल्याचे सांगितले.

८.  पूर्वी दिलेली पुस्तके त्यांनी आता ________ करून घेतली.

उत्तर  (१)  तास
(२)  वाचनालयात
(३)  चारच
(४)  वेष्टण
(५)  स्पश्ट
(६)  प्रश्नावली
(७)  वीरकथांचे
(८)  जमा

(ब)  खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.

१.  ” आतापर्यंत दिलेली सर्व पुस्तके कोणी कोणी वाचली आहेत ?”
उत्तर
.  शिक्षिकेने मुलांना प्रश्न केला.

२.  ” बाई, मी पण एक वही ठेवली आहे.”
उत्तर
.  सुझानने शिक्षिकेला म्हटले.

३.  ” अरेव्वा ! शाब्बास ! ”
उत्तर
.  शिक्षिकेने सुझानला म्हटले.

४.  ” तुम्ही दोघे तुमच्या वह्या एकदा वर्गात घेऊन या.”
उत्तर. 
शिक्षिकेने महेश व सुझानला सांगितले.

५.  “आजपासून मी एक नवीन योजना सुरू करणार आहे.”
उत्तर.
  शिक्षिकेने विद्यार्थ्यांना  सांगितले.

व्यवसाय :

(क)  एक  ‘पुस्तक’ अनेक  ‘पुस्तके’  या प्रकारे खालील नामांची रुपे लिहा.

 एक          अनेक
फळ           फळे
झाड           झाडे
मांजर          मांजरे
बदक          बदके
पान          पाने