१. तिररूवल्लुवरचा मते जीवनाच्या चिंध्या केव्हा होतात ?
उत्तर तिरूवल्लुवरच्या मते जसं कपड्याचं, तसचं माणसाच्या जीवनाचं असते. जोपर्यंत कपडा आहे
तोपर्यंत त्याला किंमत असते. क्रोध, अहंकार यासारख्या वाईट गुणामुळे माणसाच्या जीवनाच्या
चिंध्या होतात.

२. सावकाराने तिरूवल्लुवरचे आभार का मानले ?
उत्तर तिरूवल्लुवरचे बोलणे ऐकुन सावकाराचा मुलगा सुधारला. त्याने दुसऱ्याची खोडी काढायचे
सोडून दिले. आपला मुलगा सुधारला म्हणून सावकाराला आनंद झाला, व त्याने तिरूवल्लुवरची भेट
घेऊन त्याचे आभार मानले.

३. सावकार तिरूवल्लुवरला घेऊन कविपरिषेदेला का गेला ?
उत्तर सावकार मुलासहित तिरूवल्लुवरच्या घरी काही‌ दिवस राहिला. ते रोज तिरूवल्लुवरच्या ओव्या
एकेत होता. त्यो ओव्या ऐकून सावकरला वाटले की, तिरूवल्लुवरच्या ओव्या हा मोठा खजिना आहे.
तो सर्वांसमोर उघडा झाला पाहिजे. म्हणून सावकार तिरूवल्लुवरला घेऊन मदुरा येथे भरलेल्या
कविपरिषदेला गेला.

४. तिरूवल्लुवरने कविपरिषद कशी जिंकली ?
उत्तर कविपरिषेद पंडितांनी तिरूवल्लुवरला प्रश्न विचारला, "काव्यशास्त्र, ज्योतिष, तत्वज्ञान यापैकी
तुमचा ग्रंथ कोणता विषयावर आहे ? " त्याने एकेक ओवी वाचायला सुरूवात केली. सारी सभा
ओत्या ऐकून चकित झाली. पंडित म्हणाले, "खरोखरच हा जीवनाचा महान काव्यग्रंथ आहे.
"अशाप्रकारे ‌तिरूवल्लुवरने कविपरिषद जिंकली.

५. तिरूवल्लुवरचे पाय धरल्यावर सावकाराच्या मुलाला तिरूवल्लुवरने काय समजावले ?
उत्तर आपली चूक मानून तिरूवल्लुवरचे पाय धरल्यावर सावकाराच्या‌ मुलाला तिरूवल्लुवर समजावत
म्हणाला "माणसाने प्राणपणाने सांभाळावी अशी एकच वस्तू देवाने माणसाला दिली आहे. ती म्हणजे
सदाचार. त्याची साथ माणसाने कधी सोडू नये."

६. बाजारत लोकांची बरीच गर्दी का होती ?
उत्तर आठवड्याचा बाजार असल्याने बाजारात लोकांची बरीच गर्दी होती. कोणी काही विकण्यासाठी
आला होता तर कोणी काही विकत घेण्यासाठी आला होता. तसेच तिकडे तरुणांची एक घोळके मात्र
उगीचच बाजारात फिरत होते.

७. सावकार का प्रभावित झाला ?
उत्तर ज्याने माझ्या मुलाला सुधारले त्या देवमाणसाचे आभार मानले पाहिजेत असे सावकाराला
वाटले, म्हणून एक दिवस सावकार तिरूवल्लुवरला भेटण्यासाठी मुलाला घेऊन त्याच्या घरी गेला.
हातामागावर कापड विणत तिरूवल्लुवर गोड आवाजात ओव्या म्हणत होता. त्याचा ओव्या ऐकून
सावकार प्रभावित झाला.

८. कविपरिषद कशाप्रकारे मांडली जायची ?
उत्तर कविपरिषद पांड्या राजे भरवत असत. तेथे कवी आपापले काव्यसंग्रह वाचत. कविपरिषदेतील
पंडित काव्यग्रंथाचा कस ठरवीत; त्याप्रमाणे राजा कवीचा यथायोग्य सन्मान करी. अशाप्रकारे
कविपरिषद मांडली जायची.

९. तिरूवल्लुवरचा ग्रंथ कोण कोणत्या भाषांत भाषांतर झाला आहेत?
उत्तर तिरूवल्लुवरचा ग्रंथ संस्कृत, तेलगू, मल्याळी, मराठी, उर्दू इत्यादी भारतीय भाषांत आणि इंग्रजी,‌
फ्रेंच, लॅटिन , सिंहली आदी विदेशी भाषांत भाषांतर झाला आहेत.