प्रश्नः

(अ)  खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहाः

१.  शेतकऱ्याच्या मुलांचा स्वभाव कसा होता ?
उत्तर
.  शेतकऱ्याच्या मुलांचा स्वभाव आळशी व अविचारी होता.

२.  शेतकऱ्याच्या पलंगाखालची पेटी पाहून मुलांना काय वाटेल ?
उत्तर
. शेतकऱ्याच्या पलंगाखालची पेटी पाहून मुलांना वाटले कि वडिलांनी धनसंप्ती एकत्र करुन ठेवली असणार.

३.  पेटी उघडून पाहताच मुलगे निराश का झाले ?
उत्तर
. पेटीत धन नाही, दागिने नाहीत हे पाहून मुलगे निराश झाले.

४.  कागदावरील मजकूर वाचून मुलगे आनंदित का झाले ?
उत्तर. वडिलांनी पेटीत धन, दागिने न ठेवता श्रीमंत होण्याचा सोपा उपाय सुचविलेला पाहून मुलगे आनंदित झाले.

५.  शेतकऱ्याची बायको अस्वस्थः का झाली होती ?
उत्तर.  पिकांनी हिरवीगार दिसणारी जमीन ओसाड पडलेली पाहून शेतकऱ्याची बायको अस्वस्थ झाली होती.

६.  मुलांनी वडिलांच्या मित्राला जेवायला का बोलाविले ?
उत्तर
. मुलांनी वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त वडिलांच्या मित्राला जेवायला बोलाविले.

७. ‌शेतकऱ्याला किती मुले होती ?
उत्तर
. शेतकऱ्याला तीन मुलगे होते.

८. ‌शेतकऱ्याने आपल्या मुलांना सुधारण्यासाठी कोणाला बोलाविले ?
उत्तर
. शेतकऱ्याने आपल्या मुलांना सुधारण्यासाठी आपल्या खास मित्राला बोलाविले.

(आ)  खालील प्रश्नांची प्रत्येकी तीन – चार वाक्यांत उत्तरे लिहा.

१.  शेतकऱ्याला कोणत्या गोष्टीची चिंता वाटे ?
उत्तर.  मुलगे मोठे झाले. त्यांची लग्ने झाली. ते वडिलांबरोबर शेतात थोडे काम करु लागले; परंतु वडिलांसारखे मेहनतीचे काम कोणीच करीत नव्हता. शेतकऱ्याचे वय झाले होते. ‘आपली तिन्ही मुलं शिकली नाहीत. शेतात कष्ट करायचीही त्यांची तयारी नाही. त्यांच पुढं कसं होणार?’ ही चिंता शेतकऱ्याला सतत वाटे.

२.  शेतकऱ्याने मुलांना सुधारण्यासाठी कोणती युक्ती केली ?
उत्तर.
एकदा शेतकऱ्याने आपल्या खास मित्राला बोलाविले व आपले दुःख त्याच्याजवळ व्यक्त केले. दोघांनी विचार करुन त्यावर एक युक्ती काढली. मित्राने एक पेटी शेतकऱ्याला आणून दिली. शेतकऱ्याने त्या पेटीला कुलूप लावून ती आपल्या खोलीत पलंगाखाली ठेवली. मुलांना वाटले वडिलांनी धनसंपत्ती एकत्र करुन ठेवली असणार. सर्वांचे लक्ष पेटीकडे असे; पण वडील तिथे असल्याने पेटीला हात लावायला कुणीच धजत नव्हता.

 ३. ‌वडिलांच्या आज्ञेचा मुलांनी कोणता अर्थ लावला ?
उत्तर.
शेतकऱ्याने प्राण सोडल्यावर काही दिवसांनी आईच्या सांगण्यावरुन मुलांनी पेटी उघडली. पेटीत एक मोठा कागद होता. त्यावर दोन ओळी मोठ्या अक्षरांत लिहिल्या होत्या, ‘सावलीतून जावे सावलीतून दावे ! मिष्टान्न खाऊन श्रीमंत व्हावे ।।’  वडिलांनी पेटीत धन, दागिने न ठेवता श्रीमंत होण्याचा सोपा उपाय सुचविलेला पाहून मुले खूष झाले. ते तिघेही वडिलांच्या उपदेशाचे तंतोतंच पालन करू लागले. ‘सावलीतून जावे सावलीतून यावे !’  ह्याचा त्यानी असा अर्थ काढला कि ते जास्तसा वेळ घरातच घालवायचे. शेतात अधुनमधून जायचे; पण ते सुध्दा ऊन उतरल्यावर! गावातही सावलीतून हिंडू लागले. ‘मिष्टान्न खाऊन श्रीमंत व्हावे।।’  ह्याचा अर्थ असा काढला कि ते घरात दररोज पक्वान्ने खाऊ लागले. अशा प्रकारे ते चैनीत दिवस घालवू लागले.

४.  शेतकऱ्याच्या मित्राने मजकुराचा कोणता अर्थ सांगितला ?
उत्तर
. शेतकऱ्याच्या मित्राने मजकुराचा असा अर्थ सांगितला कि सावलीतून जावे म्हणजे सूर्योदयापूर्वी शेतात कामासाठी जावे. सावलीतून यावे म्हणजे सूर्यास्तानंतर घरी यावे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यन्त शेतात खूप कष्ट केल्यावर घरीशिजविलेले साधे अन्नसुध्दा गोड लागते. असे कष्ट केल्यावर धान्याच्या रुपाने लक्ष्मी घरी येईल व तो माणूस श्रीमंत होईल.

५.  मुलांनी आपली चूक कशी सुधारली ?
उत्तर. वडिलांच्या मित्राने मजकुराचा स्पष्टीकरण केल्याने मुलांना त्यांची चूक समजली. आपल्या वागण्याचा त्यांना पश्चाताप झाला. आपली चूक सुधारण्यासाठी ते दिवसभर शेतात राबू लागले. काही दिवसांनी त्यांच्या शेतात पिके डोलू लागली. धान्याच्या रूपाने घरात लक्ष्मी आली. वर्षभरात पुन्हा घर पूर्वस्थितीला आले.

६. ‌वडिलांच्या उपदेशाचा कागद मुलांनी काय केला ?
उत्तर.
वडिलांच्या मित्राने केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण सुधारलो याची जाणीव त्या मुलांना झाली. त्यांनी वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त वडिलांच्या त्या मित्राला जेवायला बोलावले. त्यांचे नातेवाईकही त्या दिवशी जेवायला आले होते. सर्वजण ओसरीवर बसले. धाकट्या मुलाने घरातून एक लाकडी चौकट आणली. त्या चौकटीत वडिलांच्या उपदेशाचा तो काघद चिकटवला होता. मधला भावाने ती चौकट ओसरीच्या भिंतीवर मध्यभागी लावली.

७.  शेतऱ्यांचे मुलगे कशे होते ?

                      वा
७.  शेतकऱ्यांच्या मुलांचा स्वभाव कसा होता ?
उत्तर
. शेतकऱ्याला तीन मुलगे होते. मुलांनी चांगले शिकावे म्हणून शेतकऱ्याने त्यांना शाऴेत घातले. शाळेसाठी आवश्यक सर्व गोष्टी तो वेळोवेळी आणून देत असे. मुलगे शाळेला जात, पण अभ्यासाकडे त्यांचे लक्ष नसे. वडिलांबरोबर कधी शेतात गेले तरी काम करण्याऐवजी ते उनाडक्या करायचे. वडिलांनी अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण पालथ्या घागरीवर पाणी ! शेतकऱ्यांचे मुलगे आळशी व अविचारी होते. आईवडिलांच्या कष्टावर ते आरामात जगत.

व्यवसायः

(क) रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहाः

१.  घर नेहमी _______ भरलेले असायचे.

२.  शेतकऱ्याला _______ मुलगे होते.

३. ‌ बाकीच्या ______  भावांनी डोकावले.

४.   घरातील ________ संपत आले.

५.  एके दिवशी ______ त्यांच्या घरी आले.

६. ‌‌  ______ त्यांना पश्चाताप झाला.

७. ‌ त्यानंतर ते दिवसभर शेतात ______  लागले.

उत्तर   (१)  धनधान्याने

(२)  तीन

(३)  पेटीत

(४)  धनधान्य

(५)  वडिलांचे मित्र

(६)  वर्तनाचा

(७)  राबू

(ब)  खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहाः

१. ” काय रे, हल्ली शेतात काही पिकत नाही की काय ?”
उत्तर. वडिलांच्या मित्रांने मुलांना विचारले.

२.  “हा अर्थ लक्षात न घेता तुम्ही आरामात राहून वडिलोपार्जित धन मात्र संपवून टाकलेत.”
उत्तर.  वडिलाच्या मित्रांने मुलांना म्हटले.

(ख)  खाली कंसात दिलेल्या शब्दसमूहातून नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद निवडून पुढे दिलेल्या रकान्यात लिहा. 

(शेत. ती, नाही, आळशी, त्यांना, कुलुप. चित्र, गुरु, कागद. बोलावले, मला, तिने, दाखवला, आपण, येईल,  तुम्ही, घेतलात, आई, लाकडी, वैद्य )

नाम              सर्वनाम            विशेषण                क्रियाप

शेत                  ती                 आळशी                   नाही

कुलूप             त्यांना             लाकडी                   बोलावले

चित्र                मला                                               दाखवला

गुरु                 तिने                                                येईल

कागद             आपण                                           घेतलात

आई                तुम्ही

वैघ