(अ) पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

१) तुकाराम महाराजानी ईश्वराच्या रूपाचे कसे वर्णन केले आहे ?
उत्तर. तुकाराम महाराजानी हे सर्व जगच विष्णूमय भासते आहे. तसेच त्यांना सर्वत्र ईश्वराचे रुप दिसते आहे.

२) सर्वेश्वर पूजनाचे वर्म कोणते ?
उत्तर. कोणत्याही जीवाचा व्देष करु नये हेच सर्वेश्वर पूजनाचे वर्म आहे.

३) तुकाराम महाराजांना कोणती गोष्ट अमंगळ वाटते ?
उत्तर. तुकाराम महाराजांना भेदभाव करणे ही गोष्ट अमंगळ वाटते.