(अ) पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

१. समर्थ कशाप्रकारची  ‘ वाचा ‘ रामाकडे मागतात ?
उत्तर. समर्थ रामाकडे  “कोमलवाचा” मागतात.

२) आपली करणी कशी असावी, अशी मागणी ते रामाकडे करतात ?
उत्तर.  आपली करणी विमल असावी अशी मागणी ते रामाकडे करतात.

३) समर्थ रामाला कशा प्रकारची मैत्री दे असे सांगतात ?
उत्तर.  समर्थ रामाला बहुजन मैत्री दे असे सांगतात.

(आ) पुढील प्रश्नांची उत्तरे तीन – चार एका वाक्यांत लिहा.

१) समर्थ रामाकडे काय काय मागतात ?
उत्तर. समर्थ रामदास रामाकडे कोमल वाचा, विमल करणी, एखाद्या प्रसंग ओळखण्याची दृष्टी , शहाणपण, लोकांच्या सुखासाठी आणि हितकारक अशी कामे बहुजनांची मैत्री, विद्यासारखे वैभव आणि थोडीशी उदासिनता मागतात. या सर्व आपल्याला  न कळता मिळण्यात असे मागणे समर्थ रामाकडे मागतात.