वाक्यप्रचार :

१. ‌देहभान हरपणे  – ‌स्वतःला पूर्णपणे विसरणे

२. स्तब्ध बसणे  –  हालचाल न करता गप्प बसणे

३.  हाकेच्या अंतरावर असणे  –  जवळ असणे

४.  जीव भारून टाकणे  –  प्रभावित होणे

५.  हातचे राखून ठेवणे  –  काटकसरीने वागणे किंवा खर्च न करणे

प्रश्न:

(अ) खालील वाक्ये‌ कोणी व कोणास  म्हटली आहेत ते लिहा.

 १. “मेमसाब, बदाम सिर्फ दो किलो है।”
उत्तर: हे वाक्य काश्मिरी कन्येने लेखिकेला म्हटले आहे.

२. “हम घूमने चले हैं, तुम्हें हमारे साथ करनी होगी… मंजूर… “
उत्तर : हे वाक्य लेखिकेने त्या काश्मिरी कन्येला म्हटले आहे.

३. “कितना अच्छा कमरा है, मेमसाब.”
उत्तर: हे वाक्य काश्मिरी कन्येने लेखिकेला म्हटले  आहे.

४. “शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया, मेमसाब.”
उत्तर: हे वाक्य काश्मिरी कन्येने लेखिकेला म्हटले आहे.

५. “मेरी तरफसे यह छोटासा तोहफा….. मेमसाब.’
उत्तर : हे वाक्य काश्मिरी कन्येने लेखिकेला म्हटले आहे.

(आ) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यांत उत्तरे लिहा :

१. लेखिकेने निसर्गकन्या कोणाला म्हटले आहे?
उत्तर : लेखिकेने निसर्गकन्या त्या काश्मिरी मुलीला म्हटले आहे.

२. सकाळी लेखिकेला कोणाच्या आवाजाने जाग आली?
उत्तर : सकाळी लेखिकेला पक्ष्यांच्या मंजुळ कलरवाने जाग आली.

३. छोट्या काश्मिरी मुलीने लेखिकेला भेटीदाखल काय दिले?
उत्तर : छोट्या काश्मिरी मुलीने लेखिकेला फुलांचा दस्ता भेटीदाखल दिला.

४. छोट्या काश्मिरी मुलीला स्वर्ग मिळाल्याचा आनंद केव्हा झाला?
उत्तर : लेखिकेने आपले जुने जोडे त्या मुलीला दिल्यावर तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला.

५. ‘पेहलगामची वाट’ हा उतारा कोणत्या पुस्तकातून घेतला आहे?
उत्तर : पेहलगामची वाट’ हा उतारा माझा उत्तरेचा प्रवास’ या पुस्तकातून घेतला आहे.

६. पेहलगामजवळून कोणती नदी वाहते?
उत्तर : पेहलगामजवळून लिडर नदी वाहते.

७. पेहलगाम किती उंचीवर आहे?
उत्तर : पेहलगाम ७९०० फूट उंचीवर आहे.

(इ) खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा:

१. लेखिकेला कोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं?
उत्तर : त्या मुलीच्या बोलण्यावरून लेखिकेला तिथल्या गरीबीचा अंदाज येत होता. इतकी निसर्गाची श्रीमंती असलेल्या या प्रदेशात एवढं प्रचंड दारिद्र्य असावं, या गोष्टीचं लेखिकेला आश्यर्य वाटत होतं.

२. लेखिकेने गौरीशंकर मंदिर व परिसराची कोणती माहिती दिली आहे?
उत्तर : रस्त्यालगत लिडर नदीच्या किनारी गौरीशंकर मंदिर आहे. नदीच्या पलीकडे व्याघ्र पर्वतात एक पुरातन व छोटं मंदिर आहे. हिरव्यागार वृक्षांनी मंदिरावर दाट छाया धरली होती. दारात एक झुळझुळता झरा वाहत होता. पूर्वी इथे राजेलोक शिकार करायला येत असत.

३. सायंकाळी पहाडावरून लेखिका व तिचे कुटुंबीय ग्रामकन्येसह केव्हा खाली उतरले?
उत्तर : पश्चिमेच्या पहाडापलीकडे मावळत्या सूर्याची तांबूस उधळण होऊ लागली. पिवळसर किरणं वृक्षवेलींना गोंजारू लागली. आता अंधार पडेल याची खात्री होऊन लेखिका आपल्या कुटुंबीयांसह त्या ग्रामकन्येला घेऊन खाली उतरली.

(ई)  खातीत प्रश्नांची प्रत्येकी पाच ते सात वाक्यांत उत्तरे लिहा

१. लेखिकेने काश्मिरी मुलीला निसर्गकन्या का म्हटले आहे ?
उत्तर: काश्मिरी मुलगी लेखिकेच्या कुटुंबीयांबरोबर त्या दिवशी संध्याकाळी व्याघ्र पर्वतात अनवाणी भटकली. सर्वांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. त्या मुलीला तिथली सर्व माहिती होती. ती एकसारखी निरागसपणे बडबडत होती. चिनार वृक्षांची विविध मोसमात बदलणारी रूपे, विविध पक्ष्यांची नावे, पाईन वृक्षाची जाळीदार पाने, रानगवताचे गुण हे सारं काही ती सराईतपणे सांगत होती. निसर्गाशी एकरूप झालेली. गोरीगोमटी, लालचुटूक ओठांची,काश्मिरी पेहरावातली व खेडवळ हिंदीत बोलणारी ती मुलगी निसर्गकन्याच वाटावी अशी दिसत होती. म्हणूनच लेखिकेने त्या काश्मिरी मुलीला निसर्गकन्या म्हटले आहे.

२. लेखिकेला पेहलगामला भेटलेल्या छोट्या मुलीचे थोडक्यात वर्णन करा.
उत्तर : बदाम-अक्रोड विकणाऱ्या, गिन्हाईकांना-पर्यटकांना पाहून गिल्ला करणाऱ्या मुलींपासून दूर बसलेली ही मुलगी वेगळी वाटत होती. आपले बदाम खपविण्यासाठी ती इतर मुलींसारखी धावपळ करत नव्हती. शांत, स्तब्ध बसून होती. लेखिकेने तिच्याकडे पाहिले तेव्हा ती फक्त खुदकन हसली. गोऱ्यापान गालांची, लाल चुटूक ओठांची ती मुलगी काश्मिरी सौंदर्याचा एक नमुना वाटत होती. जेव्हा जेव्हा ती हसायची तेव्हा डाळिंब फुटलेल्या ओठांतून जणू हिरकण्या चमकत असल्याचा भास व्हायचा. काश्मिरी वेषात ती देखणी पोरगी परीसारखी वाटत होती. डोक्यावरच्या निळ्या टोपीतून तिचे पिंगट केस कपाळावर रूळत होते. विशाल डोळ्यांच्या पापण्या भिरभिरत होत्या. तिच्या हालचालींतून तिचा अल्लड बालिशपणा डोकावत होता.

३. पेहलगामच्या बस अड्ड्याजवळील निसर्गसौंदर्याचे वर्णन लेखिकेने कसे केले आहे?
उत्तर : दुपारी पेहलगामला थंडगार वारे वाहात होते. गाव खरेच निसर्गाने विनटलेला होता. समोर देहभान विसरायला लावणारी लिडर नदी वाहत होती. त्यावर देखणा पूल होता. पायथ्यापासून वर वर चढत जाणारी हिरवीगार वनराजी नयनांना सुखवित होती. चहूं बाजूंना हिमाने आच्छादलेले पर्वत दिसत होते. नजर टाकावी तिकडे हिरवाई दिसत होती. लॉजमधल्या खिडकीतूनही हे सारं निवांत व रेखाटल्यासारखं सुंदर दिसत होतं. लेखिकेने असे पेहलगामच्या बसअड्ड्याजवळील निसर्गसौंदर्याचे वर्णन केले आहे.

भाषाभास :

(अ) शब्दयोगी अव्यय
वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात.

उदा.

१.  सायंकाळी मुले घराकडे गेली.

२.  शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.

३.  आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.

४.  गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द कडे, खाली, समोर, जवळ हे अनुक्रमे घर, झाड, शाळा, फळा या शब्दांना जोडून आले असून त्यांनी वाक्यांतील शब्दांशी असले संबंध दाखविला आहे. म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत.

(क) खालील वाक्यांतील अव्यये ओळखून त्यांचा प्रकार लिहा

१ तो वारंवार रजेवर जातो.

२. पाखरू कौलावर बसले.

३.साप माझ्यासमोरून गेला.

४. आज शाळेला सुट्टी आहे.

५. झाडाखाली काळा बोका बसला आहे.

६. पाऊस पडला तेव्हा मी घरात होतो.

उत्तर      १.  वारंवार – क्रियाविशेषण अव्यय (कालवाचक)

२.  कौलावर – शब्दयोगी अव्यय

३.  माझ्यासमोरून – शब्दयोगी अव्यय

४.   आज – क्रियाविशेषण अव्यय (कालवाचक क्रि. वि.)

५ .  झाडाखाली – शब्दयोगी अव्यय

६.  तेव्हा – उभयान्वयी अव्यय (परिणामबोधक उ. अ.)

(ख) काही स्थलवाचक व कालवाचक अव्यये क्रियाविशेषण व शब्दयोगी अव्यय असतात. ज्यावेळी ती नामापुढे त्यास जोडून येतात, तेव्हा ती शब्दयोगी अव्यये असतात आणि जेव्हा ती स्वतंत्र असून कशासही जोडली न जाता क्रियेचा गुण दाखवितात, तेव्हा ती क्रियाविशेषण अव्यय असतात.

उदा.

शब्दयोगी अव्यये क्रियाविशेषण. अवव्ये
१. पक्षी झाडावर बसला. तो जिना चढून वर गेला.
२. दिव्याखाली अंधार असतो. मीना पटकन खाली बसली.
३. जेवण्यापु्र्वी हात धुवावेत. पूर्वी वानर खूप होते.
४. उठल्यानंतर नामस्मरण करावे. तू नंत ये.

(क) केवल प्रयोगी अव्यय :
आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करण्याऱ्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.

उदा.

१. अरेरे! फार वाईट झाले हे!

२. छिः। मला नाही आवडत असले उघड्यावरचे खाद्यपदार्थ!

३. अबब! केवढी ही रास!

४. बापरे! केवढा मोठा हा साप!

५. अरे! काय झालं त्याला!

वरील वाक्यांतील अरेरे, छिः, अबब, बापरे, अरे हे शब्द केवळ उद्गार व्यक्त करणारे शब्द आहेत. अशा शब्दांतून भावना व्यक्त होते. एरवी निरर्थक वाटणारे हे शब्द विशिष्ट प्रसंगी त्या त्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात.

(क) खालील प्रकारची केवलप्रयोगी अव्यय विशेषतः आपल्या बोलण्यात आढळतात:

१. हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
उदा. अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.

२. शोकदर्शक : आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे
उदा. अरेरे! खूप वाईट झाले.

३. आश्चर्यदर्शक : ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या
उदा. अबब! केवढा मोठा साप!

४.  प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी
उदा. शाब्बास! तू दिलेले काम पूर्ण केलेस.

५. संमतीदर्शक : ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा
उदा. अछा! जा मग

६. विरोधदर्शक : छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च
उदा. छे-छे! असे करू नकोस.

७. तिरस्कारदर्शक : शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी
उदा. छी! ते मला नको

८. संबोधनदर्शक : अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे
उदा. अहो! एकलत का ?

९. मौनदर्शक : चुप, चुपचाप, गप, गुपचुप
उदा. चुप! जास्त बोलू नको.