(अ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१.  पुंगीवाला मुलांना काय करायला सांगत आहे ?
उत्तर.
   पुंगीवाला मुलांना लवकर भरभर दुसरी दुनियेत मजा करण्यासाठी बोलवित आहे.

२.  नव्या दूनियेत काय आहे ?
उत्तर.
  नव्या दुनियेत खळखळ वाहणारे झरे, सुवासिक फुले, रसाळ फळे, सोन्याचे पंख असलेले  पोपट, पाचूचे पंख असलेले मोर, मोती टिपणारी पाखरे, पंख असलेले घोडे, चपळ हरणे आणि  तऱ्हेतऱ्हेचे सुंदर देखावे आहेत.

३. मोर, पाखरे, घोडे ह्यांच्याबदल कवितेत काय काय सांगितले आहे ?
उत्तर.
  मोरांना पाचुचे पंख आहेत, पाखरे मोती टिपत आहेत व पंख असलेले घोडे आहेत, असे कवितेत सांगितले आहे.

४.  नव्या दुनियेत मधुर  गीत कोण गात आहे ?
उत्तर
. नव्या दुनियेत मधुर गीत खळबळ वाहणारी झरे गात आहे.

५.  नव्या दुनियेतील देखावे कसे आहेत ?
उत्तर
. नव्या दुनियेतील देखावे तऱ्हेतऱ्हेचे व सुंदर आहेत.

६. नव्या दुनियेतील हरणे कशी आहेत ?
उत्तर.
नव्या दुनियेतील हरणे चपळ गतीची आहेत.

७.  “या बालांनो” हि कविता कोणी लिहीली आहे ?
उत्तर.
  “या बालांनो” हि कविता कवि भा. रा .तांबे ह्यांनी लिहिली आहे.

व्यवसाय :

(अ) खाली दिलेल्या रिकाम्या जागी कवितेतली ओळी पूर्ण करा:

१.  जिकडे तिकडे __________ ,
सुवास पसरे, __________!
२.    ________ _________ मोरांना,
________ _________ मोत्यांना.
३.    ________ हरिण किती !

उत्तर.  १.   फुले फळे
रसहि गळे

२.   पंख पाचुचे
टिपति पाखरे

३.  चपलगती