प्रश्न:

(अ) योग्य जोड्या जुळवा :

‘ अ ‘                                                  ‘ ब’

१ जीवनकलिका                             १. पण कर्तव्याची
२. पावित्र्याचे                                  २.  कळूनी येता
३. अनुसरतील जन                         ३.  पूर्ण फुलू दे
४. भूल नको                                     ४.  तेज चढू दे

उत्तर.    ‘ अ ‘                                           ‘ ब’

१. जीवनकलिका                                पूर्ण फुलू दे
२.  पावित्र्याचे                                     तेज चढू दे
३.  अनुसरतील जन                            कळूनी येता
४. ‌‌ भूल नको                                     पण कर्तव्याची

(आ) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यांत उत्तरे लिहा:

१. कोणाला विसरू नको असे कवी सांगतात?
उत्तर. ध्येयाला व परंपरेला विसरू नको असे कवी सांगतात.

२. कवीच्या मतानुसार आपल्या जीवनावर कशाचे तेज चढू दे?
उत्तर. कवीच्या मतानुसार आपल्या जीवनावर पावित्र्याचे तेज चढू दे.

३. कवीच्या मते कशाची भूल पडू दे?
उत्तर. ‌कवीच्या मते भ्याडपणाची, अहंपणाची व मीचपणाची भूल पडू दे.

४. ‘प्रबोधन’ ही कविता कोणत्या पुस्तकातून घेतली आहे?
उत्तर.  ‘प्रबोधन’ ही कविता ‘भारतमित्र’ या पुस्तकातून घेतली आहे.

५. माणसाचे यश कुठे झळकावे असे कवीला वाटते?
उत्तर.  माणसाचे यश दिगंतरी झळकावे, असे कवीला वाटते.

 (इ) खालील प्रश्नांची प्रत्येकी पाच ते सहा वाक्यांत उत्तरे लिहा:

१. यश दिगंतरी झळकण्यासाठी काय काय करायला कवी सांगतात?
उत्तर.  आपल्या जीवनाची कळी पूर्ण फुलू दे. जीवन अनुभवांनी परिपक्व बनवा. ध्येयाला अजिबात विसरू नका. जीवनावर पावित्र्याचे तेज चढवा.  देशाबद्दलची प्रीती दरवळू द्या. या गोष्टींमुळे जीवन व्यर्थ ठरणार नाही, उलट यश दिगंतरात झळकत राहील.

२. आपला इतिहास मनात धरून ठेवा; असे कवी का म्हणतात?
उत्तर. आपल्या देशाचा इतिहास उज्ज्वल आहे, ज्वलन्त आहे. देशप्रेमाने, समर्पणाने नि सेवेने भरलेला आहे. आपला इतिहास आपल्याला क्षात्रधर्माची आठवण करून देतो. आपला इतिहास भूमी, प्रजा, संत, अध्यात्म व भक्तीची प्रतिष्ठा राखतो. ‘सत्यमेव जयते’,   ‘शरणार्थींना अभय’,   ‘ सर्वधर्मसमभाव’ ही वचने आपल्या महान इतिहासाने सार्थ केली आहेत. म्हणूनच कवी आपल्या इतिहास मनात धरून ठेवा असे कवी म्हणतात.

३. मीचपणाची भूल पडवी असे कवी का म्हणतात?
उत्तर.  मीपणा म्हणजे अहंकार, मीपणा म्हणजे स्वार्थभाव. या दुर्गुणांमुळे माणसाला आपल्या कर्तव्याचा विसर पडतो. माणूस आपल्या तत्त्वाला विसरतो. मीपणामुळे तो खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावतो. अहंकारामुळे माणूस आपले ध्येय सोडून भलत्याच गोष्टींना महान मानतो. मीपणा चेतविण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. आपण तत्त्वपुजारी आहोत,वआपण तत्त्वांचे पालन केले पाहिजे, हे मीचपणामुळे माणूस विसरून जातो. त्यामुळे माणसाचा पशू बनायला वेळ लागत नाही. म्हणूनच मीपणाची भूल पडावी, असे कवी म्हणतात.