प्रश्न :

(अ ) पुढील काव्यांशाच्या जोड्या जुळवा.

          ‘ अ ‘                                                                        ‘ ब ‘
१. झाडांनी किति                                          १. जणू का पाळण्यांत झुलती
२. साळीवर झोपली                                      २. मुकूट घातले डोकिस सोनेरी
३. पहा पाखरे चरोनी होति                            ३. वाहूनिया दूर
४. झाडांवर गोळा

उत्तर –      ‘ अ ‘                                                       ‘  ब ‘

१. झाडांनी किति                                            मुकूट घातले डोकिस सोनेरी

२. साळीवर झोपली                                       जणू का पाळण्यांत झुलती

३. पहा पाखरे चरोनि होती                              झाडांवर गोळा

 (आ) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यांत उत्तरे लिहा :

१. या कवितेत कवीने दिवसाच्या कोणत्या वेळेचे वर्णन केले आहे?
उत्तर – या कवितेत कवीने सायंकाळचे वर्णन केले आहे.

२. ओढा आपल्याबरोबर काय वाहून नेतो असे कवीला वाटते?
 उत्तर – ओढा आपल्याबरोबर सोने वाहून नेतो आहे असे कवीला वाटते.

३. ‘सोन्याचा गोळा’ असे कवीने कोणास म्हटले आहे?
उत्तर : ‘सोन्याचा गोळा’ असे कवीने मावळणाऱ्या सूर्याला उद्देशून म्हटले आहे.

४. सायंकाळी पाखरे कोठे गोळा होतात?
उत्तर : सायंकाळी पाखरे झाडावर गोळा होतात.

५. कवीने फुलपाखरांस अचल असे का म्हटले आहे?
उत्तर : फुलपाखरे साळीवर झोपली असून ती पाळण्यात झुलत असल्यासारखी वाटतात, म्हणून  कवीने फुलपाखरांस अचल म्हटले आहे.

६. फुलपाखरांच्या पंखास कोणकोणती रत्ने चिकटली आहेत असे कवीस वाटले?
उत्तर : हिरे, माणके, पाचू ही रत्ने फुलपाखरांच्या पंखांस चिकटली आहेत, असे कवीस वाटते.

७. गुलाल कोठे पसरला आहे?
उत्तर : गुलाल चौफेर कुरणावर व शेतात पसरला आहे.

(इ) खालील प्रश्नांची प्रत्येकी पाच ते सहा वाक्यांत उत्तरे लिहा:

१. कवीने सायंकाळच्या वेळेचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर : सूर्य मावळतीला चालला आहे. चहूंकडे पिवळे तांबूस – कोवळे ऊन पसरलेआहे. ओढ्यामधल्या पाण्याकडे पाहिले की वाटू लागते, ओढा पाण्याऐवजी सोनेच वाहून नेत आहे. झाडांनी आपल्या डोकीस सोनेरी मुकुट घातले आहेत. कुरणात व शेतात सर्वत्र जणू गुलाल पसरला आहे. हिरवीगार भाताची शेते वाऱ्यावर झोके घेत आहेत. कवी तांबे यांनी हे असे सायंकाळच्या वेळेचे वर्णन केले आहे.

२. पक्षी व फुलपाखरे यांच्या संदर्भात कवीने काय काय सांगितले आहे?
उत्तर : कितीतरी फुलपाखरे स्वच्छंदे उडत आहेत. कोणाचे पंख सोनेरी, कोणाचे रुपेरी तर कोणाचे पंख मखमली आहेत. जणू त्यांना इंद्रधनुष्याचे विविध रंग लाभले आहेत. साळीवर बसलेली फुलपाखरे पाहून वाटते की ही अचल फुलेच जणू साळीवर फुलली आहेत. साळीवर ती झोपली आहेत की पाळण्यात झुलताहेत, असा संभ्रम पडतो. चपळगतीने ती इकडून तिकडे आणि तिकडून इकडे झुळकन सुळकन उडताहेत. त्यांच्या पंखांना जणू हिरे, माणके, पाचू ही रत्ने फुटून त्यांचे पंखच गरगरत आहेत. सायंकाळ झाल्यामुळे दूर दिशांना चरायला गेलेले पक्षी झाडावर गोळा होत आहेत. ते थकून भागून झाडावरच्या आपल्या घरट्यात विश्रांती घेण्याच्या तयारीत आहेत.