(अ)   खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१. श्यामला कोणत्या गोष्टीची खंत वाटे ?
उत्तर.
भास्करला रामरक्षा पाठ म्हणता येते पण आपल्याला तो पाठ म्हणता येत नाही याची श्यामाला खंत वाटे.

२.  श्यामने कोणता निश्चय केला ?
उत्तर.
  भास्करच्या पुस्तकातून रामरक्षा पाठ लिहून काढून व ती पाठ करण्याचा श्यामाने निश्चय केला.

३.  वडिलांना श्यामाचे कौतुक का वाटले ?
उत्तर. श्यामने भास्करच्या पुस्तकावरून रामरक्षा पाठ लिहून काढून व ती पाठ करुन एका सुरात म्हणून दाखवली म्हणून वडिलानां श्यामचे कौतुक वाटले.

 ‌४.  आईने  श्यामला कोणता आशीर्वाद दिला ?
उत्तर.
  असाच कष्ट करुन मोठा हो, असा आईने श्यामला आशीर्वाद दिला.

५.  श्याम किती वर्षाचा होता ?
उत्तर.
  श्याम आठ वर्षाचा होता.

 ६. श्यामला कोणता पाठ येत नव्हता ?
उत्तर.
  श्यामला रामरक्षा पाठ येत नव्हता.

७.  श्यामच्या शेजारी कोण राहत होता ?
उत्तर.
  श्यामच्या शेजारी त्याचा मित्र भास्कर राहत होता.

(ब)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन-तीन वाक्यांत लिहा.

१.  भास्करवर श्याम का संतापला ?
उत्तर. 
एके दिवशी भास्कर एकटाच घरी होता. तो मोठमोठ्याने रामरक्षा म्हणत असताना श्याम त्याच्या घरी गेला. तेव्हा भास्कर त्याला म्हणाला, “अरे श्याम, मी रोज  रामरक्षा म्हणतो, तुला कुठे येते ?”  हे ऐकून श्याम भास्करवर संतापला.

२.  श्यामला रामरक्षा का पाठ म्हणता येत नव्हती ?
उत्तर.
   श्यामाजवळ रामरक्षेचं पुस्तक नव्हते. तसेच त्याच्या वडिलांना त्याला शिकवायला  वेळ नव्हता, म्हणून श्यामला रामरक्षा पाठ म्हणता येत नव्हती.

 ३.  आईने श्यामला रामरक्षा पाठ करण्याकरिता कोणता उपाय सुचविला ?
उत्तर. 
श्यामजवळ पुस्तक नव्हते म्हणून आईने श्यामाला सुचविले कि भास्करचे पुस्तक मागून घे, लिहून काढ आणि पाठ कर.

४. भास्करकडून पुस्तक मिळविण्यासाठी श्यामने काय कले ?
उत्तर. 
भास्कर पुस्तक घायला तयार नव्हता म्हणून श्यामने त्याच्या आईला सांगितले, “काकू, भास्करला पुस्तक द्यायला सांगा हो, मी माझ्या वहीत रामलक्षा लिहून घेतो. मला पण पाठ करायची आहे. आज सुटी आहे. मी दिवसभर बसून लिहून काढेन.” भास्करने मग आपल्या आईच्या सांगण्यावरून श्यामला पुस्तक दिले.

५.   रामरक्षा पाठ करण्याकरिता श्यामाने काय केले ?
उत्तर. 
रामरक्षा पाठ करण्याकरिता श्यामाने भास्करचे पुस्तक मागून आणले. एका निवांत जागी बसून पूर्ण रामरक्षा पाठ आपल्या वहीत त्याने लिहून काढली. एका आठवड्यात रोज पारायणे करुन श्यामाला रामरक्षा पाठ म्हणता येऊ लागली.

६. आईने संतापलेल्या श्यामला कसे समजावीले ?
उत्तर. 
श्यामचा मोठा आवाज ऐकून त्याची आई तिथे आली. ती श्यामला म्हणाली, “अरे श्याम, मी सर्व ऐकलं आहे. तुला पाठ येत नाही असं त्यानं म्हटलं तर त्यात चिडण्यासारखं काय आहे ? खरं तेच त्यानं सांगितलं. आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावं कशाला ? ती उणीव दूर करण्यचा प्रयत्न करावा. तू पाठ का करीत नाहीस ?” असे सांगून आईने संतापलेल्या श्यामला समजावीले.

७.  श्यामाने  आईला आपली अडचण कशी सांगितली?
उत्तर. 
“आई, मी भाऊंच्या बरेच दिवस मागे लागलो की मला रामरक्षा शिकवा म्हणून. पण त्यांना वेळच मिळत नाही. शिवाय माझ्याजवळ पुस्तकही नाही.” असे सांगून श्यामने आईला आपली अडचण सांगितली.

व्यवसाय :

(अ) खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा:

१.  “अरे श्याम, मी रोज रामरक्षा म्हणतो. तुला कुठे येते?”
उत्तर.
  भास्करने श्यामला म्हटले

२.  “तुला पाठ म्हणता येते हे माहीत आहे मला, एवढी ऐट नको काही!”
उत्तर
. श्यामने  भास्करला म्हटले.

३.  “अरे, मग भास्करचे पुस्तक आहे ना?”
उत्तर.
‌ श्यामच्या आईने श्यामला म्हटले.

४.  “काकू, भास्करला पुस्तक द्यायला सांगा हो”.
उत्तर
.  श्यामने भास्करच्या आईला म्हटले.

५.  “अरे, तू केव्हा पाठ केलीस ? कोणी शिकवली तुला?”
उत्तर
.  श्यामच्या वडिलांनी श्यामला विचारले.

६.  “भाऊ, मी भास्करच्या पुस्तकावरून लिहून काढली आणि पाठ केली.”
उत्तर
.  श्यामने आपल्या वडिलांना म्हटले.

७.  “असाच कष्ट करून मोठा हो.”
उत्तर
.  श्यामच्या आईने श्यामला म्हटले.

(ब) ‌ रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा:

१. लहानपणी तो आपल्या आईला _______ वाचून दाखवीत असे.
(रामरक्षा, पोथ्यापुराणे, पुराणे)

२.  श्यामच्या शेजारी त्याचा ________ भास्कर राहत होता.
(शत्रू, मित्र, शेजारी)

३.  संध्याकाळ झाली की _________ रामरक्षा मोठ्याने म्हणत असे.
( श्याम, भास्कर, वडिल )

४.  त्याने दिवसभरात रामरक्षा पूर्ण ________ काढली.
( वाचून, पाठकरून, लिहून )

५.  तो रोज _________ करू लागला.
( पटण, वाचन, पारायणे )

६.  दुसऱ्यावर _______ राहू नये.
( अवलंबून, रागावून, चिडून)

उत्तर   (१)  पोथ्यापुराणे
(२)  मित्र
(३)  भास्कर
(४)  लिहून
(५)  पारायणे
(६)  अवलंबून

(क)  खालील परिच्छेद वाचा व त्यातील नामे शोधून लिहा:

आज जांबावली गावच्या शाळेला सुटी होती. म्हणून कृष्णाला आनंद झाला  होता. दूध पिऊन तो बागेत गेला. झाडांना खत व पाणी घातले. बाबा खुश झाले.

उत्तर.  नामे – जांबावली, गाव, शाळा, कृष्ण, दूध, बाग, झाड, खत, पाणी, बाबा.