शब्दार्थ :

१. रूग्णालया– दवाखाना (hospital)

प्रश्न :

(अ)खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१. रशीद शाळेत का आला नव्हता ?
उत्तर. रशीद आजारी होता म्हणून तो शाळेत आला नव्हता.

२. शिक्षक आंतोनच्या घरी का गेले ?
उत्तर. अंतोन व त्याच्या घरची माणसे एकाचवेळी आजारी पडली म्हणून शिक्षक त्यांच्या चौकशीसाठी त्यांचा घरी गेले.

३. मुले आजारी का पडली ?
उत्तर. समुद्राकिनाऱ्यालगत आलेले दूषित मासे खाल्ल्लाने मुले आजारी पडली.

४.वाहनांमुळे हवाप्रदूषण कसे होते ?
उत्तर. वाहनांच्या धुरामुळे हवाप्रदुषण होते.

५.जलप्रदूषण म्हणजे काय ?
उत्तर.  पाणी दूषित होणं म्हणजेच जलप्रदूषण.

६.शिक्षकांनी चौकशी का केली ?
उत्तर. वर्गात नियमितपणे हजर असणारी मुले आज गैरहजर होती म्हणून शिक्षकांनी चौकशी केली.

७. हवाप्रदूषण आरोग्याला अपायकारक कसे ठरते ?
उत्तर. श्वास घेताना नाकावाटे प्रदूषित हवा आपल्या फुप्फुसात जाते. त्यामुळे अनेक रोग होऊ शकतात.

(ब)खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकीतीन ते चार वाक्यांत लिहाः

१.जलप्रदूषण कशामुळे होते ?
उत्तर. पाणी दूषित होणं म्हणजेच जलप्रदूषण. गटारातून सांडपाणी समुद्रात सोडलं जातं. तसेच काही कारखान्यांतील टाकाऊ रासायनिक द्रव्येही समुद्राच्या पाण्यातच सोडली जातात. त्यामुळे होणारे जलप्रदूषण अत्यंत घातक असते.

२. हवाप्रदूषण होऊ नये म्हणून काय करता येईल ?
उत्तर. हवाप्रदूषण होऊ नये म्हणून प्रत्येकानं आपल्या घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील वडिलधाऱ्यांना सांगून सांडपाण्याची योग्य व्यवस्था केली पाहिजे.

३. प्रदूषण कसे टळता येईल ?
उत्तर. जलप्रदूषण टाळण्यासाठी पाणी स्वच्छ राखलं पाहिजे, तसच झाडं लावल्यानं हवाप्रदूषण रोखण्यात मदत होते. झाडे हवेतील कार्बन डॉयआक्साईड वायू शोषून घेतात. त्यामुळे हवा शुध्द होण्यास मदत होते. म्हणूनच ‘वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन’ ही आजची गरज आहे.

४. दूषित मासे खाल्ल्यामुळे सर्वांनवर काय परिणाम झाला ?
उत्तर. दुपारी जेवणात दूषित मासे खाल्लामुळे संध्याकाळ होता होताप्रत्येकाच्या पोटात दुखू लागले. काहींना वांत्या सुरू झाल्या. बऱ्याच जणांना जुलबही सुरू झाले. सर्वांची भीतीने गाळण उडाली.

५. मासे खाऊन सर्वजण आजारी का पडले ?
उत्तर. सहसा मासे समुद्रकिनाऱ्यालगत कधीच येत नाहीत. जलप्रदूषणझालं तरच मासे किनाऱ्यावर येऊ शकतात. ते मासे जलप्रदूषणामुळे खाण्यास योग्य नव्हते म्हणून सर्वजण मासे खाऊन आजारी पडले.

६.गावातील नदीचं पाणी स्वच्छ का राखलं पाहिजे ?
उत्तर. गावातील काही लोक मेलेली जनावरंनदीत टाकतात. काही ठिकाणी कुजके मासेसुध्दा नदीच्या पाण्यातच टाकले जातात. वाड्यातील लोक नदीच्या पाण्यातच कपडे धुतात. त्यामुळे पाणी प्रदूषित बनते आणि हे असे प्रदूषित पाणी आरोग्याला अपायकारक असते म्हणून गावातील नदीचं पाणी स्वच्छ राखलं पाहिजे.

७. हवाप्रदूषण कशामुळे होते ?
उत्तर.  हवा दूषित होणे म्हणजेच हवाप्रदूषण. कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणारा धूर ‘हवाप्रदूषण करतो’ मेलेली जनावरे जमिनीत न पुरता उघड्यावर टाकल्याने, सांडपाणी साचून राहिल्यासही हवाप्रदूषण होऊ शकतं. वाहनांच्या धुरामुळेही हवाप्रदूषणात भर पडते.

व्यवसाय:

(क)रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१. शिक्षकांनी______ केली.

२. वाड्यावर लहान – लहान घरे अगदी ______ उभी होती.

३.ठिकठिकाणी______ साचलेले दिसत होते.

४. सर्वांची भीतीने ______ उडाली.

५. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना एक दिवस _____ ठेवावे लागले.

६. जलप्रदूषण, हवाप्रदूषण यांना _____ घातला पाहिजे.

७. झाडं हवेतील _____ वायू शोषून घेतात.

उत्तर

१. चौकशी

२. दाटीवाटीने

३. सांडपाणी

४. गाळण

५. रूग्णालयात

६. आळा

७. कार्बनडाऑक्साइड

(ब)खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.

१. “ते मासे तुम्ही खाल्ले ?”
उत्तर. शिक्षकांनी आंतोनच्या वडीलांना विचारले.

२.”हो सर, तेच आमचं चुकलं.”
उत्तर.  आंतोनची आई शिक्षकांना म्हणली.

३. “सर, मासे खाऊन ते सर्वजण आजारी का पडले?”
उत्तर. श्रुतीने शिक्षकांना विचारले.

४.”सर, जलप्रदूषण म्हणजे काय ?”
उत्तर.  ईशाने शिक्षकांना विचारले.

५.”मुलांनो धीर धरा सर्व काही सांगतो.”
उत्तर. शिक्षक मुलांना म्हणाले.

६. “सर आमच्या वाड्यातील लोक नदीच्या पाण्यातच कपडे धुतात.”
उत्तर.  पीटरने शिक्षकांना सांगितले.

७.”सर, पण गावात पिण्याच्या पाण्याचीअन्य सोय नसले तर ?”
उत्तर.  अब्दुलने शिक्षकांना विचारले.

८. “आम्ही काय करू शकतो सर ?”
उत्तर. पीटरने शिक्षकांना विचारले.

९. “‘वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन’ ही आजची गरज आहे.”
उत्तर. शिक्षक मुलांना म्हणाले.

१०. “सर, यापुढं आम्हीही प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊ.”
उत्तर.  सर्व मुले शिक्षकांना म्हणाली.

(क) ‘शिमग्याचा उत्सव’या दोन शब्दांऐवजी शिमगोत्सव हा शब्द वापरतात . याप्रमाणे खालील शब्दांपासून प्रत्येकी एक शब्द बनवा.

१. शारदेचा उत्सव – शारदोत्सव

२. नवरात्रीचा उत्सव – नवरात्रौत्सव

३. जत्रेचा उत्सव – जत्रोत्सव

४. दीपचाउत्सव – दीपोत्सव

५. शिवरात्रीचा उत्सव – शिवरात्रोत्सव