प्रश्न:

(अ) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. साने गुरूजीच्या नजरेला रत्नपारख्याची नजर असे का म्हटले आहे ?
उत्तर  – साने गुरुजीच्या नजरेला रत्नपारख्व्याची नजर असे म्हटले आहे कारण त्यांची दृष्टी जरी सदैव भूमीकडे वळलेली दिसे, तरी त्यांच्या नजरेतून बारीकसारीक गोष्टीदेखील निसटत नसे.

२. गुरुजींची पत्रे कोणाला वारसा करणार आहेत?
उत्तर – गुरुजींची पत्रे महाराष्ट्रातील सर्व बाळगोपाळांचा वारसा ठरणार आहेत.

३. लेखकाने सुधाला ‘भाग्यवान’ असे का म्हटले आहे?
उत्तर – साऱ्या देशभर हिंडून आणि शेकडो ग्रंथ चाळून साक्षेपाने गोळा केलेल्या सुमधुर, सुरम, सुगंधी नि टपोर स्मृतींचे द्रोणच्या द्रोण भरुन गुरुजी सुधाला पाठवीत म्हणून लेखकाने सुधाला ‘भाग्यवान’असे म्हटले आहे.

४. लिहीतेवेळी कोणत्या गोष्टी गुरुजीपुढे हात जोडून उभ्या असत ?
उत्तर – लिहीतेवेळी उखाणे , म्हणी, ओव्या, अभंग, आर्या, श्लोक, ऋचा ,आठवणी या सारे गोष्टी गुरुजीपुढे हात जोडून उभ्या असत.

५. गुरुजींच्या बेचाळीस पत्रांना कशाची उपमा दिली आहे?
उत्तर  – गुरूजींचा बेचाळीस पत्रांना ‘रांजणाची’ उपमा दिली आहे.

६. गुरुजींनी सगळ्यांना कोणती शिकवण दिली आहे ?
उत्तर – महाराष्ट्र तसेच इतर प्रातांतील आपल्या देशबांधवांचे एकमेकांबद्दलचे प्रेम वाढो ही शिकवण गुरुजींनी सगळ्यांना दिला आहे.

७. लेखकाला गुरुजी गेल्याचे कसे कळले ?
उत्तर – लेखकाला रेडिओवर बातमी ऐकून गुरुजी गेल्याचे कळले.

८. शेवटच्या पत्रात गुरुजींनी काय लिहिले होते ?
उत्तर – शेवटच्या पत्रात गुरुजींनी लिहिले होते की ‘अधूनमधून लिहित जाईन, पण बंधन नको !’

आ) खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

१. ‘मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास / कठीण वज्रास भेदू ऐसे / ‘ या अभंग ओळीचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर – साने गुरुजी प्रेमळ तसेच झुंजारही होते. त्यांचे प्रेमळपणा म्हणजे बावळेपणा नव्हता. ते मेणाहूनही मऊ असले तरी कठीन वज्रास  भेदू शकत होते . नम्र आणि तेवढेच उग्र. कुठे अन्याय झाला, मग तो कामगारांवर असो किंवा देवळातल्या भक्तांवर असो, साने गुरुजी नेहमी निवारण्यासाठी जायचे. ते भल्याबरोबर भले व वाइटावर काठी पण घेण्याची क्षमता त्यांच्यात होती. मृदू आणि कठोर, शीतल आणि दाहक, नम्रआणि उग्र अशी दोन्ही रुपे त्यांच्यात होती.

२. या राष्ट्राचे नंदनवन केव्हा बनू शकेल?
उत्तर – गुरुजी राष्ट्राच्या एवड्या लोकांना पत्र पाठवत होते की पत्रे वाचण्याऱ्यामध्ये भाऊ – बहिणीचे नाते तयार झाले आहे. जर इतकी भावंडे राष्ट्राची मशागत करु लागले तर राष्ट्राचे पुन्हा आनंदवन बनणार तेव्हाच खऱ्या अर्थाने ते नंदनवन बनू शकेल.

३. गुरुजींचे मन स्पष्ट आहे असे कश्यावरून दिसून येते?
उत्तर.  काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरुन दिसते त्याप्रमाणे गुरूजींनी लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरूजींचे मन स्पष्ट आहे असे दिसून येते. त्यांच्या मनाचे सारे भाव त्या पत्रातून उमटलेले आहेत.

(आ) खालील प्रश्नांची प्रत्येकी पाच वाक्यांत उत्तरे लिहा.

१. गुरुजींचे हस्ताक्षर कसे होते ?
उत्तर. गुरुजींचे हस्ताक्षर बारीक आणि स्वच्छ होते. जिरग्याच्या तांदळासारखे . लिखाणामध्ये कुठे खोडाखोड नाही. मशिनीची जशी टीप पडत जाते , तसे यांच्या लेखणीतून टपटप शब्द पडत जातात. लिहिताना कुठे अडणे त्यांना माहीत नाही. लिहिताना त्यांना कसले तरी अवसान चढे. त्यावेळी त्यांना जगाचे भानच नसे.

2.  शेतातील मशागत झाली नाही तर तेथे काय काय दिसून येईल ?
उत्तर.  शेतातील मशागत झाली नाही तर तेथे तण वाढून ती फुकट जाईल. तिच्यात विषारी जीव – जीवाणू माजतील. गुरुजी आपल्या मनालासुध्दा घाण लागू नये म्हणून जपत. आपल्या मनाला त्यांनी संयमाचे बांध घातले. सुंदर भावनांचे पाणी त्यात खेळवले.

3.  साने गुरुजींच्या झूंजारवृत्तीविषयी लिहा?
उत्तर.  मुंगीपासून मनुष्यापर्यंत सर्व जीवांवर प्रेम करण्यास शिकवणारे गुरुजी जसे प्रेमळ तसेच झुंजारहीवृत्तीचे होते. कोठे अन्याय दिसला की आपल्या पिलांवर झडप घालण्याऱ्या घारीशी सामना करण्यासाठी कोंबडी ज्याप्रमाणे पिलांना पंखांखाली घेऊन उभी ठाकते तसे ते उभे टाकत. त्यांचा डोळ्यांतील अश्रुबिंदूंच्या ठिणग्या बनत. लोण्यासारखे त्यांचे ह्दय वज्रासारखे होई. कामगारांवर अन्याय झाला, पांडुरंगाच्या देवळात चोखोबाच्या लेकरांना मज्जाव झाला, की उठलेच गुरुजी. धावलेच अन्याय निवारण करण्यासाठी, प्रतिष्ठा रक्षण करण्यासाठी.

४. लेखक ना. ग. गोरे यांनी १९४४ सालची कोणती आठवण या पाठात जागवली आहे?
उत्तर. १९४४ साली गुरुजी तुरुंगात असताना अप्पा त्यांना भेटायला आले. गुरुजी भेटीहून परत आल्यावर, ते संध्याकाळी जेवायचे नाही, असे सांगून खोलाचे दार लावून जे लिहायला बसले ते सारी रात्र लिहीतच होते. लेखक मुद्दाम रात्रीतून तीनदा उठले. पाहिले तर गुरुजींच्या खोलीत दिवा जळत होता , आणि गुरुजी लिहितच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता १२५-१५० पानांचा गांधीजींच्या जीवनाबद्दल मजकूर लिहून त्यांनी ते हस्तलिखित (गोष्टीरुप गांधीजी) अप्पांच्या स्वाधीन केले.

५. गुरुजी बालमहाराष्ट्राशी गुजगोष्टी कसे करायचे ?
उत्तर. गुरुजी उदार चरितांपैकी होते. वासरांची आठवण झाली की गाईची कास जशी तटाटू लागते, तशी मुलांची आठवण झाली, त्यांचे दर्शन झाले की गुरुजींचे मन बहरुन येई, ते तटाटू लागे. त्यामुळे दर शनिवारचे पत्र रात्री – बेरात्री , भल्या पहाटे बसून ते लिहून काढायचे. सहसा अंतराय होऊ द्यायचे नाहीत. आणि सुधाला डोळ्यासमोर ठेवून ते अवघ्या बालमहाराष्ट्राशी गुजगोष्टी करायचे.

भाषाभ्यास:

पत्रलेखन

पत्र लिहिणे ही एक कला आहे. अशा लेखनासाठी विशिष्ट तंत्राचा वापर करावयाचा असतो. प्रत्यक्ष भेटून बोलणे शक्य होत नाही, तेव्हा पत्रासारख्या माध्यमाचा अवलंब केला जातो. पत्र लिहिताना खाली नमूद केलेल्या गोष्टी विचारात घ्याव्यात.

१) पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता व दिनांक

२) मायना

३) मजकूर

४) पत्र पाठवणाऱ्याची सही/नाव

५) ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता

कोणास      ‌         ‌‌                                 सुरुवात                                                        शेवट

१. आई/वडील                                     तीर्थरूप (आई/बाबा) यांस                            तुझा /तुमचा
साष्टांग नमस्कार विनंती विशेष                     आज्ञाधारक

२. मोठा भाऊ, बहीण,                          तीर्थस्वरूप …………. यांना                              आपला
काका, काकी, मामा इ.                     साष्टांग नमस्कार
वडील मंडळीस

३. अध्यापक.                                      गुरुवर्य ………… यांना                                    तुमचा अज्ञाधारक
सादर प्रणाम

४. लहान भाऊ, बहीण,                      चिरंजीव / प्रिय ………… यास                            तुझा / तुझी
नातलग                                         अनेक आशीर्वाद

५. मित्र, मैत्रीण                                 प्रिय मित्र/ मैत्रीण                                                तुझा / तुझी

६. सन्माननीय व्यक्ती                     माननीय ………………….. यांना                          आपला नम्र
सा. न. वि. वि.

लेखन:

निबंध स्पर्धेत तालुका पातळीवर तुम्ही पहिला क्रमांक मिळवलात, याची माहिती तुमच्या वडिलांना पत्राने कळवा.

कु . महादेव एस. कांबळे ,
लक्ष्मीकृपा,
वाडा,
वास्को – गोवा

दि, १२/९/२०२०

निर्थरुप बाबांस

साष्टांग नमस्कार

विनंती निशेष मी इकडे सुखरूप आहे. माझी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झालेली आहे. मला अभ्यासात खूपच रुची लागलेली आहे. माझी काळजी करु नये.

यावर्षी मी आमच्या शाळेतून तालुका पातळीवर निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. वेगवेगळ्या शाळेतून या स्पर्धेत भाग घेण्यात आले . मला निकालाची उत्सुकता होती. पाहिले तर मला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला . सर्वांनी माझे भरपूर कौतुक केले.  ह्या श्रणी तुम्ही असले तर बर वाटले असते.

घराकडील सर्व मोठ्यांना माझा नमस्कार. तसेच लहान भावाला माझा गोड गोड पापा. आपल्या पत्राची वाट पाहेन.

कळावे

आपलाच

कु. गणेश