(अ)  खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१.  मुलगा का रडत होता ?

उत्तर.  मुले आपल्याला खेळायला घेत नाहीत म्हणून मुलगा रडत होता.

२.  मुले विनोदला खेळायला का घेत नव्हती ?

उत्तर.  विनोदला खरुज झाली होती म्हणून मुले त्याला खेळायला घेत नव्हती.

३.  शरीर स्वच्छ नसल्यास कोणते त्वचारोग होतात ?

उत्तर.  शरीर स्वच्छ नसल्यास खरुज, पुरळ, नायटा या सारखे त्वचारोग होतात.

४.  आपला आहार कसा असावा ?

उत्तर. आपला आहार समतोल व आरोग्याला पोषक असावा.

५.  अंगणात मुले कुठला खेळ खेळत होती ?

उत्तर.  अंगणात मुले चोर – शिपाईचा खेळ खेळत होती.

६. ‌ सकाळी उठल्यावर काय करावे ?

उत्तर.  सकाळी उठल्यावर दात दतमंजनाने घासून तोंड स्वच्छ धुवावे.

७.  विनोदला कुठे खरूज झाली होती ?

उत्तर. विनोदला हातपायांच्या बोटांना खरुज झाली होती.

(ब)  खालील प्रश्नाची उत्तरे प्रत्येकी दोन-तीन वाक्यांत लिहा.

१.   दररोज व्यायाम केल्याने कोणता फायदा होतो ?

उत्तर.  शरीरल निरोगी राहण्यासाठी व्यायामाची आवश्यक्ता असते. दररोज व्यायाम केल्याने आपले स्नायू बळकट होतात व आपण निरोगी राहतो. निरोगी शरीर हीच खरी संपत्ती !

२.  आपले शरीर स्वच्छ राखण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे ?

उत्तर. आपले शरीर स्वच्छ राखण्यासाठी आपण दररोज आंघोळ करावी. आंघोळ करताना साबण लावून शरीर स्वच्छ करावे. आपला चेहरा, नाक, कान, हातापायांची बोटे, डोळे स्वच्छ धुतले पाहिजेत. दात दतमंजनाने घासून तोंड स्वच्छ धुवावे. हातापायांची वाढलेली नखे वेळच्या वेळी कापावीत. आपले केसही स्वच्छ ठेवावेत.

३.  रोज स्वच्छ धुतलेले कपडे का वापरावेत ?

उत्तर.  काम करताना, खेळताऩा आपल्याला घाम येतो. घामाने भिजलेल्या कपड्यांना हवेतील धुळीचे कण चिकटतात. असे घामाट कपडे आरोग्याला अपायकारक असतात म्हणून नेहमी स्वच्छ कपडे वापरावेत.

४.  पाणी कोणत्या कारणामुळे दुषित होते ?

उत्तर.  विहिरीच्या जवळ आंघोळ केल्यास, तसेच कपडे, भांडी, गुरे धुतल्यामुळे पाणी पिणे अपायकारक असते.

५.  डॉक्टरकाकांनी विनोदला जवळ का बोलावले ?

उत्तर.  विनोदला खरुज झाली होती, म्हणून डॉक्टकाकांनी विनोदला जवळ बोलावून मलम दिले व ते कसे वापरावे याबद्दल सूचना दिल्या.

६.  स्वच्छता राखल्याने कोणते फायदे होतात ?

उत्तर.  स्वच्छता राखल्याने खरुज, पुरळ, नायटा यासारखे त्वचेचे रोग होत नाहीत. शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न राहते, कोणतेही काम करण्यास उत्साह वाटतो व सर्वांना आनंद मिळतो.

व्यवसाय :

(अ)  खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.

१.   “काका, हे मला खेळायला घेत नाहीत.”

उत्तर.  विनोदने डॉक्टरकांना म्हटले.

२.  “विनोदला का खेळायला घेत नाही रे.”

उत्तर.  डॉक्टरकाकांनी मुलांना म्हटले.

३.  “एक मुलगा दात घासत आहे.”

उत्तर.  रोहनने डॉक्टरकाकांना म्हटले.

४.  “काका, मुलगा आंघोळ करीत आहे”

उत्तर.  शांतीने डॉक्टरकाकांना म्हटले.

५.  “काका, माझी आईपण रोज कपडे धुते.”

उत्तर.  मीना डॉक्टरकाकांना म्हणाली.

६.  “आपले घर व घरासभोवतालचा परिसरही स्वच्छ ठेवावा.”

उत्तर.  डॉक्टरकाका मुलांना म्हणाले.

७.  “काका, आज तुम्ही आम्हाला छान चित्रे दाखवलीत आणि माहितीपण चांगली सांगितलीत.”

उत्तर.  रीटा डॉक्टरकाकांना म्हणाली.

(ब)  रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१.  एक मुलगी आपल्या हाताची ________ कापत आहे.

२.  आपले ________  स्वच्छ ठेवावेत.

३.  प्रत्येकाने दररोज ________  केली पाहिजे.

४.  शरीर निरोगी राहण्यासाठी _________ आवश्यक्ता असते.

५.  निरोगी शरीर हीच खरी _________.

६.  विहिरीच्या जवळ _________  करू नये.

७.   ________ व गाळलेले पाणी नेहमी प्यावे.

उत्तरः   (१)  नखे

(२)  केसही

(३)  आंघोऴ

(४)  व्यायामाचीही

(५) ‌ संपत्ती

(६) आंघोळ

(७)  उकळलेले

(क)  खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाऐवजी समानार्थी शब्द वापरा.

१.  प्रत्येकाने दररोज स्नान करणे आवश्यक आहे.

उत्तर. प्रत्येकाने दररोज आंघोळ करणे आवश्यक आहे.

२.  विहिरीजवळ स्त्रिया कपडे धूत आहेत.

उत्तर विहिरीजवळ बायका कपडे धूत आहेत.

३.  घरासभोवतालच्या आवारात फुलझाडे होती.

उत्तर. घरासभोवतालच्या परिसरात फुलझाडे होती.

४.  दूषित जल पिणे अपायकारक असते.

उत्तर.  दूषित पाणी पिणे अपायकारक असते.

५.  आपले गृह टापटीप असेल तर आपले मन प्रसन्न राहते.

उत्तर.  आपले घर टापटीप असेल तर आपले मन प्रसन्न राहते.

 

(ड)  खालील वाक्य वाचा.

        खेळणारा मुलगा पडला.

या वाक्यात ‘खेळणारा’ हा शब्द ‘खेळणे’ या शब्दापासून तयार झाला आहे. अशाप्रकारे खालील शब्दांपासून नवीन शब्द तयार करा.

भिजणे – भिजणार

बोलणे – बोलणारा

पळणे – पळणारा

घासणे – घासणारा

करणे – करणारा