प्रश्न :

अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

 १) कवीने तोरण कशास म्हटले आहे?
उत्तर. – कवीने इंद्रधनुष्याला तोरण म्हटलेआहे.

२) हरिणी कुरणात काय करत आहेत?
उत्तर – सुंदर हरिणि कुरणात आपल्या बाळांसह बागडत आहेत.

३) गुराख्यांचा मंजुळ पावा कोणाचे गीत गात आहे?
उत्तर – गुराख्यांचा मंजुळ पावा श्रावणमहिमा गात आहे.

४) पारिजात पाहून कोणाचा रोष मनी मावळला?
उत्तर – पारिजात पाहून सत्यभामेचा रोष मनी मावळला.

(आ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी पाच ते सहा वाक्यांत तिहा :

१) उडणाऱ्या बगळ्यांना पाहून कवीला कोणत्या कल्पना सुचतात?
उत्तर – श्रावण महिन्यात आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची शुभ्र माळ कवीला कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळेप्रमाणे वाटते, आणि ती माळ पृथ्वीवर उतरायला येते त्यावेळी कवीला ते ग्रहगोलाप्रमाणे भासतात.

२) श्रावणमासात पक्षी व प्राणी आपला आनंद कसा व्यक्त करतात?
उत्तर – श्रावणमासात पक्षी व प्राणी यांना खूप आनंद होतो, जणू त्यांचा आनंद गगनात मावत नाही. पावसाच्या जलधारांत आपले भिजलेले पंख फडफडावीत पक्षी स्वतःला सावरत आहेत. सुंदर हरिणी हिरव्या कुरणात आपल्या बछड्यांसह बागडत आहेत. गुरांचा कळपही प्रसन्न चित्ताने रानात चरत आहे.

(इ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा :

१) क्षणांत येते सरसर _______।

२) वरतीं बघतां __________ गोफ दुहेरी विणलासे।

३) उठती वरतीं जलदांवरतीं अनंत ________ पहा।

४) बलाकमाला उडतां भासे _________  माळचि ते।

५) __________ ही बघतां भामा-रोष मनींचा मावळला।

उत्तर :  (१) शिरवें

(२) इंद्रधनुचा

(३) संध्याराग

(४) कल्पसुमांची

(५) पारिजात