अधिक प्रश्न:

१) मासळी घेऊन घरी जाणार गाडेकार तोंडाने कोणता आवाज काढी ?
उत्तर. मासळी घेऊन घरी जाणार गाडेकार तोंडाने हिरीरी SS पा SS पा SS पा SS असा आवाज काढी .

२) मुले गाडेकाराकडून कोणती गोष्ट शिकली ?
उत्तर. मुले गाडेकाराकडून भजन शिकली.

३) संध्याकाळचा चहा घरी प्याल्यावर गाडेकार कोठे जायचा ?
उत्तर.  संध्याकाळचा चहा घरी प्याल्यावर गाडेकार मासळी आणायला बाजारात जायचा.

४) गाडेकारावर लोक खूष का झाले?
उत्तर. दहा मुखी रावणाच्या सोंगात गाडेकर उत्कृष्ट नाचला म्हणून गाडेकरावर लोक खूष झाले.

(आ) खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यांत लिहा.

१) गाड्याचा कुईSS कीर्रर्रSS असा आवाज का येत असे ?
उत्तर. चढणीवरुन गाडा खाली सावकाश यावा म्हणून गाडेकाराने गाड्याच्या  चाकांना लाकडाचा देक लावला होता. ते लाकूड धावपट्टीवर घासले जाई. त्यामुळे कुई SS  कीर्रर्रSS असा आवाज का असे.

२) गाडेकाराचा दिनक्रम कसा होता ?
उत्तर. गाडेकार दररोज सकाळी साडेसात – आठाच्या दरम्यान घराकडून बाजारात जायला निघे. दिवसभर तिकडे मालाची ने – आण करून संध्याकाळी सहा – साडेसहाच्या सुमारास घरी येई. रेड्यांना गवत – पाणी देऊन, स्वत: चहापाणी घेऊन मासळी आणायला बाजारात जाई.

अधिक प्रश्न:

१. गाडेकाराची मासळी घेऊन घरी येतानाची अवस्था कशी असे?
उत्तर : बाजारातून येताना डाव्या हातात मासळीची पिशवी व उजव्या हाताने हावभाव करीत. तोंडाने ‘हिरीरीऽऽऽपाऽऽपाऽऽपाऽऽ अस म्हणत, किवा ‘जगात कोण सुखी आसा?’ हांवगाडेकार” अस म्हणत थकून भागून तो घरी येई.

२. गणपती विसर्जनाला जाताना गाडेकार शिक्षकाची भूमिका कशी वटवायचा?
उत्तर : गणपती विसर्जनाच्या वेळी गाडेकार सर्व मुलांना एका रांगेत गाड्यापुढे उभे करीत असे. आपण स्वतः रेड्यांच्या मधोमध असलेल्या आडव्या लाकडी टोकाला धरून पुढे उभा राहु मुलांना भजन शिकवी. घरी परत येताना ‘मोरया बाप्पा मोरया रे’च्या गजरात मुलांना घरी सुखरूप आणीत असे. अशा पध्दतीने गाडेकर शिक्षकाची भूमिका वटवायचा.

(इ)  खालील प्रश्नांची उत्तरे पाच ते सात वाक्यांत उत्तर लिहा.

१) गाडेकाराचे कोणते गुण लेखकाने सांगितले आहेत ?
उत्तर. मुलांची विचारपूस करणारा गाडेकर प्रेमळ होता. तो परिश्रमाने पैसे मिळवणारा होता. वाड्यावरच्या मुलांच्या अभ्यासची काळजी करणारा आणि गाड्याच्या रेड्यांमुळे आपले पोट चालते याची कृतार्थ जाणीव त्याला होती. नेहमी आनंदी स्वभाव . मुल्यांच्या उत्साहाने गणेश विसर्जन, होळी उत्सवात भाग घेणारा गाडेकार रसिक व एक कलाकार होता. मुलांत मूल होऊन त्यांच्यात रमणारा मुलांना भजन शिकविणारा गाडेकार ओढगस्तीचे जीवन जगूनही जगात आपण सुखी असलेला एकमेव माणूस असल्याचा आव आणायचा परोपकारही ऐपतीप्रमाणे करायचा. हे गुण गाडेकाराचे सांगितले आहेत.

२) होळीच्या दिवसांत गाडेकार कोणती धमाल करीत असे ?
उत्तर. होळीच्या दिवसांत गाडेकार चित्रविचित्र पोषाख अंगावर घालून वाड्यात नाचत फिरे. लोक त्याला पैसे देत. धुळवडीच्या आधी दोन दिवस गावात नाचणाऱ्या रोमटात  तो कधी मारुती, कधी लक्षीमण, राक्षस, वानर तर कधी रावणाचे सोंग घेऊन नाचे अशी धमाल होळीच्या दिवसांत गाडेकर करायचा.

३) गाडेकाराचा मृत्यू कसा झाला ?
उत्तर. रोजच्याप्रमाणे सकाळी गाडेकार आपला गाडा लाकडाचा ब्रेक लावून उतरणीवरून हाकत होता. अचानक ब्रेकला बांधलेला दोर तुटला, त्यामुळे गाडा विनाअडथळा वेगाने धाऊ लागला. रेडे उधळून वेगाने धाऊ लागले. गाडेकराने पुढला धोका ओळखून गाड्यापूढे उडी घेऊन गाडा रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. उतरण असल्यामुळे गाडीला व रेडयांना आवरणे कठीण गेले. शेवटी गाडा गाडेकारासकट एका विजेच्या खांबावर जोराने आदळला. त्याचवेळी त्याचे डोकेही त्या खाब्यांवर आपटून छिन्नविछिन्न होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला.

अधिक प्रश्न:

४. गाडेकाराने कोणते सोंग घेण्याचा हट्ट धरला? गाडेकारावर लोक खूष का झाले?
उत्तर : त्या वर्षी गाडेकाराने दहा मुखी रावणाचे सोंग घेण्याचा हट्ट धरला. मग एका हुशार पेंटरने कागदी पुट्ट्याची नऊ तोंड करून गाडेकाराच्या खांद्याला व्यवस्थित बांधली. दहा मुखी रावण त्यावर्षी उत्कृष्ट नाचला. राम-रावणाचे युद्ध तर इतके सुरेख झाले की आजूबाजूच्या भागातील लोकसुद्धा मुद्दाम ते युद्ध बघण्यासाठी आले होते. दहा मुखी रावणाच्या सोंगामुळे गाडेकार सर्वमुखी झाला. जमलेल्या सर्व लोकांनी खुष होऊन त्याची वाहवा केली.

भाषाअभ्यास :

क्रियाविशेषण अव्यय : क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

उदा :

१) क्रियेची जागा किंवा स्थळ दाखविणारे शब्द – येथे, तिथे, दूर, लांब, जवळ, आसपास इत्यादी.

२) क्रियेचा काळ व वेळ दाखविणारे शब्द – उद्या, आज, सतत , नेहमी, पुन:,  पुन्हा, रात्रीस इत्यादी.

३) मोजमाप किंवा परिणाम दाखविणारे शब्द – पुष्कळ , फार, अत्यंत, किंचित, जरा, काही इत्यादी.

४) क्रियेची रीती दाखविणारे शब्द – सावकाश , खचित, असे, गटागट, जपून, उभ्याने इत्यादी.

शब्दयोगी अव्यय : जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांच संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.

उदा : १) त्याच्या घरावर कौलै आहेत.

२) टेबल पुस्तक पडले.

३) सूर्य ढगमागे लपला.

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द वर, खाली, मागे, घर, टेबल, ढग, शब्दांना जोडून आले आहेत व वाक्यांतील शब्दांचा‌ संबंध दाखवितात म्हणून शब्दयोगी अव्यये आहेत.