प्रश्न

(अ) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. देवाने लाडक्या कवीसाठी काय दिले आहे?
उत्तर
. देवाने लाडक्या कवासाठी संपूर्ण जग खेळायला दिले आहे.

२. कवीची दृष्टी कशी असते ?
उत्तर.
कवीची दृष्टी सर्व दिशांच्या  आरपार पाहणारी असते.

३. कवीच्या हातात कोणती जादू असते ?
उत्तर. 
कवीच्या हातांच्या स्पर्शाने कोणत्याही वस्तूला अधिक सौंदर्य प्राप्त होण्याची जादू असते.

४. कवी कोणाचा लाडका आहे ?
उत्तर.
कवीच्या  देवाचा लाडका आहे .

५. कवीच्या मते जीवनाची किंमत कधी कमी होईल ?
उत्तर.
कवीच्या मते जर या जगातून आपण वगळले तर जीवनाची किंमत कमी होईल.

(आ) खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन  किंवा तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

१. तिसऱ्या कडव्यात कवी काय सांगतो ?
उत्तर
. कवींनी शून्यामधून मोठमोठ्या काव्यांची निर्मिती केलेली आहे. कवी पृथ्वीला स्वर्गासारखे करण्यासाठी सदैव झटत आहेत. त्यांच्या कृतीमधून सदैव अमृतरस पाझरतो आहे म्हणूनच कवी सर्वांना वंदनीय असेच आहेत, असे कवी तिसऱ्या कडव्यात सांगतो.

२. कवीला वगळताच कोणत्या गोष्टी घडू शकतात ?
उत्तर.
कवीला वगळताच आकाशामध्ये एक प्रकारची धारा निर्माण होईल व मनुष्याच्या जीवनाला काहीही किमत राहणार नाही. मनुष्याचे जीवन कवडीमोलाचे होईल.

(इ) खालील कविता ओळींचा अर्थ स्पष्ट करा:

१. विश्वि या प्रतिभाबले  विचरतो चोहीकडे लीलया ?
उत्तर.
विश्वि या प्रतिभाबले  विचरतो चोहीकडे लीलया’ ही ओळी ‘आम्ही कोण?’ या कवितेमधील आहे. ह्या ओळीमध्ये कधी असे सांगतो की, कवी हे देवाचे आहेत. देवाने त्यांना संपूर्ण जग खेळायला दिले आहे. या प्रतिभेच्या जोरात कवी कोठेही संचार करु शकतो व जगाच्या कानाकोपऱ्यात लीलया करू शकतो.

२. फोले पाखडितां तुम्ही, निवडतो ते सत्व आम्ही निकें.
उत्तर.
‘फोले पाखडिंता तुम्ही, निवडतो दे सत्व आम्ही निकें ‘ ही ओळी ‘आम्ही काण?’ या कवितेमधील आहे . ह्या ओळीमध्ये कवी असे सांगतो की, तुम्ही फोले पाखडितां म्हणजे इतर लोंक फक्त फोले पाखडितां,  निवडतो ते सत्व आम्ही निकें म्हणजे कवी जगातील फक्त चांगले गोष्टी निवडतात.

(ई) कवितेतील ओळी पूर्ण करा.

१. आम्ही कोण म्हणुनि काय पुससी ? _____________
२. दिक्कालातुनि आरपार ____________
३. सौंदर्यातिशया, अशी वसतसे _____________
४. शून्यामाजि वसाहती वसविल्या __________
५. ते आम्हीच सुधा कृतींमधुनिया ______________

उत्तर.

१. आम्ही कोण म्हणुनि काय पुससी ? आम्ही असू लाडके –
२. दिक्कालातुनि आरपार अमुची दृष्टि पहाया शके !
३. सौंदर्यातिशया, अशी वसतसे  जादू करांमाजि या
४. शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरें ?
५. ते आम्हीच सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ;