प्रश्न :

(अ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१. शारिरीक सुदृढता  बळकट करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते ?
उत्तर – शारिरीक सुदृढता  बळकट करण्यासाठी नियमित व्यायाम व पोषक आहाराची गोष्टीची आवश्यकता असते.

२. लेखकाला दूध घालण्याचा मोबदला म्हणून काय मिळत असे ?
उत्तर  – लेखकाला दूध घालण्याचा मोबदला दररोज अर्धा‌ लिटर दूध प्यायला मिळत असे.

३. पाडगांवकरांनी लेखकाला बँकेत नोकरी का दिली‌?
उत्तर – लेखकाचे खेळ पाहून  पाडगांवकरांनी लेखकाला बँकेत नोकरी दिली‌.

४. लेखक व त्याच्या मित्रांनी कोणात्या संघाची स्थापना केली ?
उत्तर  – लेखक व त्याच्या मित्रांनी महाराणा प्रताप संघाची स्थापना केली.

५. लेखकाने कोणती जिद्द मनात बाळगली होती ?
उत्तर – आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा महाराष्ट्रास विजेतेपद मिळवून द्यायचे अशी जिद्द लेखकाने मनात बाळगली होती.

६. रेल्वे बरोबरीच्या कसोटीत लेखकाला कोणता मंत्र उपयोगी पडला?
उत्तर –  ‘पराभवाच्या खाईत असलो तरी जिद्दीच्या जोरावर आपण अशक्य गोष्टही शक्य करु शकतो ,’ हा मंत्र रेल्वे बरोबरीच्या कसोटीत लेखकाला उपयोगी पडला.

७. महिंद्र आणि महिंद्र विरुद्धचा  सामना जिंकल्यानंतर लेखकाला कोणती जाणीव झाली ?
उत्तर –  ‘प्रतिस्पर्धी कितीही बलवान असला तरी युक्तीने लढल्यास आपण विजयी होऊ शकतो,’ याची जाणीव महिंद्र आणि महिंद्र विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर लेखकाला झाली.

८. लेखक क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च सन्मान म्हणून कोणता पुरस्कार मिळवू शकला ?
उत्तर –  लेखक क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च सन्मान म्हणून समजला जाणाय अर्जून पुरस्कार मिळवू शकला.

९. पुण्याच्या कोणत्या शाळेत लेखकाचे नाव घातले गेले ?
उत्तर – पुण्याच्या ‘सावित्रीबाई फुले प्रशालेत’ आठव्या इयत्तेसाठी लेखकाचे नाव घातले गेले.

१०. भारताच्या दृष्टाने खेळाचे सुवर्णपदक अतिशय प्रतिष्ठेचे का होता ?
उत्तर – आशियाई स्पर्धेत प्रथमच कबड्डी या क्रीडाप्रकाराचा समावेश करण्यात आल्यामुळे, भारताच्या दृष्टीने खेळाचे सुवर्णपदक अतिशय प्रतिष्ठेचे होते.

(आ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत लिहा.

१. लेखकाच्या मोठ्या भावाने लेखकाला कोणता सल्ला दिला ?
उत्तर  – ‘तुझ्याकडे कबड्डीत चमक दाखविण्यासाठी आवश्यक असणारे सर्व चापल्य आहे. मात्र तू येथे वाघोलीत न थांबता पुण्यात चल. तेथे कष्ट करून, मेहनत करून मैदान गाजविले तर तू नावही कमावशील आणि पैसाही !” असा सल्ला लेखकाच्या मोठ्या भावाने लेखकाला दिला.

२. लेखकाने दूध घालण्याचे काम स्वीकारले?
उत्तर – शारीरिक सुदृढता  बळकट करण्यासाठी पोषक आहाराची ही आवश्यकता होती. पण मोठ्या बंधूवर खर्चाचा भार टाकायचा नव्हता, त्याला दूध घालण्याचे काम मिळाले. दुधाचे रतीब घालण्याबद्दल पैसे न घेता दररोज अर्धा लिटर दूध प्यायला द्यावे अशी मागणी मान्य झाली म्हणून लेखकाने दूद्य घालण्याचे काम स्वीकारले.

३. लेखक सकाळचा वेळ कोणत्या कामात घालवत असे?
उत्तर – पहाटे ४ ते ६ दूध घालणे, ६ ते ८  सिंगलबार,डबलबार, जोर-बैठका, सूर्यनमस्कार असा व्यायाम, ७ ते ९  कबड्डीचा सराव, असे लेखक सकाळचा वेळ घालवत असे.

४. महिंद्र व महिंद्र बरोबरीच्या कसोटीत लेखकाच्या संद्याला कलाटणी का मिळाली ?
उत्तर –  महिंद्र व महिंद्र बरोबरीच्या कसोटीत लेखकाचे संघ पराभवाच्या छायेत होता . संद्याचा  कर्णधार  म्हणून लेखक त्याच्या सहकाऱ्यांना थोडेसे चुचकारले. सामन्यास कलाटणी देण्याची क्षमता त्यांच्यात आहे, याची जाणीव त्यांना करून दिली आणि लेखकाच्या संघाने उत्तरार्धांत सामन्यास कलाटणी दिली.

५. पाकिस्तानविरूध्द खेळळावयाचे म्हणजे भारतीय खेळाडूंचे काय व्हायचे?
उत्तर  – कबड्डी या आपल्या पारंपारिक खेळात भारतीय संघाचे सुवर्णपदक निश्चित असले तरी, पाकिस्तानविरुध्दच्या सामन्याबाबत लेखकाच्या संद्याच्या खेळाडूंना उगाचच दडपण वाटत होते. खेळ कोणताही असो, पाकिस्तानविरुध्द खेळावयाचे म्हणजे भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य सामना सुरू होण्यापूर्वी खचून जाते.

(इ) वाक्याखाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा .

१. लहानपणी लेखकाच्या घरची आर्थिक स्थिती ________.
(अ) मजबूत होती
(ब) हलाखीची होती
( क) मध्यम होती
(ड) गरिबीची होती

२. वसंतराव पाडगांवकर यानी लेखकाची __________ .
(अ) गरिबी पाहून  बँकेत नोकरी दिली.
(ब) खेळातील प्रगती  पाहून बँकेत नाकरी दिली.
(क) त्यांचा प्रामाणिकपणा पाहून बँकेत नोकर दिली.
(ड) त्यांची हुशारी पाहून बँकेत नोकरी दिली.

३. पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यावेळी सुवर्णपदक निश्चितझाल्यानंतर _____________.
(अ) लेखकाच्या मनावरचे ओझे दूर झाले.
(क) लेखकाचे आनंद झाला
(ड) लेखकाच्या मनावरचा ताण कमी झाला.
(ढ) लेखकाने सुटकेचा श्वास सोडला.

४. _________ पाहून मोठ्या बंधूंनी हायस्कूलसाठी  पुण्याला शिकायला आणले.
(अ) क्रिकेटबाबत लेखकाची आवड.
(ब)  फुटबॉलबाबत लेखकाची आवड.
(क) कबड्डीबाबत लेखनाची आवड.
(ड) हॉकीबाबत लेखकाची आवड.

५. पाडगांवकर यांच्याच सहकार्यामुळे ___________.
(अ) महाराष्ट्र संघ तयार केला.
(ब) महिंद्र संघ तयार केला.
(क) सात – आठ धडधाकट मुलांना घेऊन संघ तयार केला.
(ड) महाराष्ट्र बँकेचा संघ तयार केला.

उत्तर  (१)  लहानपणी लेखकाच्या घरची आर्थिक स्थिती हलाखीची होती .

(२) वसंतराव पाडगांवकर यानी लेखकाची खेळातील प्रगत पाहू बॅंकेत नोकरी दिली.

(३) पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यावेळी सुवर्णपदक निश्चित झाल्यानंतर लेखकाच्या मनावरचे ओझे दूर झाले .

(४)  कबड्डीबाबत लेखनाची आवड पाहून मोठ्या बंधूंनी हायस्कूलसाठी  पुण्याला शिकायला आणले.

(५) पाडगांवकर यांच्याच सहकार्यामुळे महाराष्ट्र बँकेचा संघ तयार केला .

(ई) रिकाम्या जागी पाठातील योग शब्द लिहा:

१. पहिल्याच वर्षी आम्ही _______ फेरीपर्यंत मजल गाठली.

२. पाकिस्तानाचे खेळाडू कबड्डीला _______ असले तरी ते अतिशय जिद्दीने खेळत होते.

३. पंचांच्या एक – दोन निर्णयांमुळे सामन्यात थोडा ________ निर्माण झाला.

४. वादंगाची कोंडी फुटेना म्हणून तांत्रिक समितीने हा सामना, _______ मिनिटांनी पुन्हा खेळावयाचा निर्णय घेतला.

५. भारतीय संघाचा मार्गदर्शक या नात्याने लेखकाने संघातील खेळांडूमध्ये _______ निर्माण केला.

६.  जपानमधील भारतीय चाहत्यांनी लेखकाला खांद्यावर घेऊन _____  केला.

७.  रेल्वेच्या मैदानात ______ चढाई केली.

८.  पराभवाच्या खाईत असलो तरी ________  जोरावर आपण अशक्य गोष्ट शक्य करू शकतो.

९.  डोळ्यांत ________ आनंदाश्रू तरारले.

१०.  कबड्डी या खेळाने मला ________ , आर्थिक स्थैर्य व समृध्द मिळवून दिले.

उत्तर  (१) उपांत्य

‌‌(२) नवोदित

(३) वादंग

‌‌ (४) वीस

(५) आत्मविश्वास

(६) जल्लोष

(७) खोलवर

(८) जिद्दीच्या

(९) अक्षरशः

(१०)  नावलौकिक

भाषाभ्यास:

पुढील वाक्य वाचा.

१) राजाला मुकुट शोभतो.

२) गुरुजीनी गोष्ट सांगितली.

३) पोलिसानी चोराला पकडले.

४) मला नाटक आवडते.

वरील वाक्यांत ठळक अक्षरात छापलेले ‘शोभतो, सांगितली, पकडले, आवडते’ हे शब्द त्या त्या क्रिया दाखवतात. शोभतो’ या शब्दात शोभण्याची क्रिया आहे. इतर वाक्यांत सांगण्याची, पकडण्याची, आवडण्याची’ अशा क्रिया आहेत. शिवाय हे शब्द त्या त्या वाक्याचे अर्थ पूर्ण करतात. अशा शब्दांना ‘क्रियापदे म्हणतात.

क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. क्रियापद या शब्दाचा अर्थ क्रिया दाखवणारा शब्द असा होतो; पण नुसत्या क्रियेचा बोध करून देणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणत नाहीत. उदाहरणार्थ – ‘संध्या शाळेत जाऊन येते.’ या वाक्यात क्रिया दाखवणारे दोन शब्द आहेत.

(१) जाऊन (२) येते. हे शब्द जाण्याची व येण्याची क्रिया दाखवतात. ‘जाऊन’ या क्रियावाचक शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ‘येते’ या क्रियावाचक शब्दाने तो पूर्ण होतो. म्हणून ‘जाऊन’ हे क्रियापद नसून ‘येते हे क्रियापद आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द म्हणजे धातू. ‘येते’ या क्रियापदात मूळ शब्द ‘ये’ हा असून त्याला ‘ते’ हा प्रत्यय लागून क्रियापदाचे रूप बनले आहे. वरील वाक्यात शोभ, सांग, पकड, आवड हे धातू आहेत. धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची विविध रूपे बनतात. जसे पकड – तो, पकड – ला, पकड – तात वगैरे. धातूपासून बनलेली ही रूपे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. धातूपासून तयार झालेली काही रूपे वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत. अशा अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दांना ‘धातुसाधिते’ किंवा ‘कृदंते’ असे म्हणतात.

(१) तो मुलगा छान गात असे.

(२) तो आता छान गात नाही.

पहिल्या वाक्यात ‘गात’ हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते, म्हणून ते क्रियापद. दुसऱ्या वाक्यात ‘गात’ हे केवळ धातुसाधित आहे.

क्रियापदाची व्याख्या करताना आपण ‘वाक्यातील क्रिया दाखवणारा व वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द’ अशी केली आहे. ‘वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा’ हे शब्द महत्वाचे आहेत. कारण वाक्यात क्रिया दाखवणारे आणखी काही शब्द असू शकतात. पण ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत.

पुढील वाक्ये पहा

(१) देणाऱ्याने देत जावे.

(२) हसणाऱ्याचे दात दिसतात.

(३) त्याला आम्ही पडताना पाहिले.

(४) त्यांच्याकडे कमवणारे लोक खूप आहेत.

वरील वाक्यातील देणारा, हसणारा, कमवणारे, पडताना हे शब्द त्या त्या वाक्यात क्रिया दाखवत असले तरी ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत. म्हणून ती क्रियापदे नव्हेत. वाक्यातील त्यांच्या कार्यावरून ‘पाहता, देणारा, हसणारा’ ही नामे आहेत. ‘पडताना’ हे क्रियाविशेषण. व ‘कमवणारे’ हे विशेषण आहे. क्रियापद हा क्रिया दाखवणारा शब्द असला तरी सगळीच क्रियापदे क्रिया दाखवतात असे नाही.

“गोव्यातील लोकाना भात आवडतो.” या वाक्यात ‘आवडतो’ हा शब्द आवडण्याची क्रिया दाखवतो. पण “संध्या शहाणी आहे.” “शिवाजी पराक्रमी होता.” “हत्ती जंगलाचा राजा झाला. ” या वाक्यांतील ‘आहे’ , ‘होता’ व ‘झाला’ हे शब्द कोणतीही क्रिया दाखवत नाहीत. पण ते कर्त्याची स्थिती किंवा स्थित्यंतर (दुसरी स्थिती) दाखवतात. ‘अस’ ह्या धातूने स्थिती दाखवली जाते. तर ‘हो’ ह्या धातूने स्थित्यंतर दाखवले जाते. अशा शब्दांनाही व्याकरणात क्रियापदे म्हणतात. क्रियापद हा वाक्यातील मुख्य शब्द असला तरी काही म्हणीमध्ये तो गुप्त किंवा गाळलेला असतो. उदा. हातच्या काकणाला आरसा कशाला ? (पाहिजे) कर्ता व कर्म – वाक्यात क्रियापदाने केलेली क्रिया करणारा जो असेल त्याला ‘कर्ता’असे म्हणतात. हा कर्ता क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर करतो ते त्याचे ‘कर्म’ असते. वाक्यातील कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला – ‘णारा’ प्रत्यय लावून ‘कोण ?’ किंवा ‘काय ?’ असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो.

वाक्यातील कर्म शोधताना मुख्य क्रियापदाने दाखवलेली क्रिया ‘कोणावर घडते ?’ असा प्रश्न करावा. ती क्रिया ज्या वस्तूवर किंवा प्राण्यावर घडते ते त्याचे कर्म.

(१) मी उत्तर दिले.
‌(२) सिद्धीने आंबा कापला.
(३) संतांनी अभंग गाइले.
(४) सीमाला पेढे आवडतात.

पहिल्या वाक्यात ‘दिले’ क्रियापद असून ! ‘दे’ हा धातू आहे. त्याला – णारा ‘ह प्रत्यय लावून’ देणारा कोण ? असा प्रश्न केला की ‘मी’ हा कर्ता मिळतो. क्रियापदाने दाखवलेली क्रिया ‘कोणावर घडते आहे ?’ असा प्रश्न केला की ‘उत्तर’ हे कर्म मिळते. दुसऱ्या वाक्यात ‘कापला’ हे क्रियापद असून ‘काप हा त्याचा धातू आहे. या वाक्यात ‘कापणारा कोण?’ – सिद्धी. म्हणून ‘सिद्धी’ हा कर्ता ‘कापण्याची क्रिया कोणावर घडते ?’ ‘आंब्यावर.’ म्हणून ‘आंबा’ हे कर्म. तिसऱ्या वाक्यात ‘गाणारे कोण ? – संत’ म्हणून ‘संतानी’ हा कर्ता. ‘गाण्याची क्रिया कोणावर घडते ? ‘अभंगावर’ म्हणून ‘अभंग’ हे कर्म होय. चौथ्या वाक्यात ‘आवडणारे काय ?’ – पेढे. ‘म्हणूण ‘पेढे’ हा कर्ता आहे. या वाक्यात क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही म्हणून या वाक्यात कर्म नाही.

– खालील वाक्यातून  ‘क्रियापद’ ‘कर्ता’ व  ‘ कर्म ‘ लिहा.

१. गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवितात.
गुरुजी – कर्ता
शिकवितात – कर्म

२. त्याला चहा पाहिजे.
त्याला – कर्ता
पाहिजे – क्रियापद

३. हत्तीनणबाईने पाय धुतले.
    हत्तीणबाई – कर्ता
धुतले – कर्म

४. पाखराने पंख पसरले.
    पाखराने – कर्ता
पसरले – कर्म

५. रावण दुष्ट होता.
       रावण – कर्ता
दुष्ट – कर्म