(अ)  खालील प्रश्नाची उत्तरे एका वाक्यात लिहा.

१.  कोल्ह्याचे लक्ष कशावर गेले ?
उत्तर.
  कोल्ह्याचे लक्ष एका भल्या मोठ्या काळ्या खेकड्यावर गेले.

२.   कोल्ह्याने बीळ उकरायला का सुरुवात केली ?
उत्तर
.  बिळातील खेकड्याला बाहेर आणण्यासाठी कोल्ह्याने बीळ उकरायला सुरुवात केली.

३.   कोल्ह्याने शेपटी बिळात का घातली ?
उत्तर. 
खेकड्याला खेळवत गवतावर आणण्यासाठी कोल्ह्याने शेपटी बिळात घातली.

४.   कोल्हा पळायला का लागला ?
उत्तर.
  अचानक एक असध्य कळ कोल्ह्याच्या मस्तकात घुसली म्हणून तो पळायला लागला.

५.   कोल्ह्याने खेकड्याला कसे पकडले ?
उत्तर. 
कोल्ह्याने आपल्या पंजाचा वापर करून खेकड्याला गवतावर उताणा पाडुन पकडले.

६.  कोल्हा कुठून जात होता ?
उत्तर
.  कोल्हा ओढ्याच्या काठाने सावकाश जात होता.

७.  काळा खेकडा काय करत होता ?
उत्तर. 
भलामोठा काळा खेकडा गवताची पाती कुरतडत होता.

८.  कोल्ह्यानं खेकड्याचा नाद का सोडला ?
उत्तर.
  चिखल उडत होता. तसं करून खेकडा मिळणं कठीण होतं म्हणून कोल्ह्यानं खेकड्याचा नाद सोडला.

९.  खेकड्यानं आपली चाल का थांबवली ?
उत्तर.
  कोल्हा नजीक जाताच खेकड्यानं आपली चाल थांबवली.

१०. ‌‌ कोल्ह्याला कसली खात्री होती?
उत्तर.
  बिळात खेकडा आहे याची खात्री कोल्ह्याला होती.

(ब) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन ते चार वाक्यांत लिहा.

१.  खेकड्याला बिळाबाहेर आणण्यासाठी कोल्ह्याने काय काय केले ?
उत्तर.
  खेकड्याला बिळाबाहेर आणण्यासाठी कोल्ह्याने आजूबाजूला पाहिले. कोणी नजरेत दिसत नव्हते. कोल्ह्यानं शांतपणे बिळाकडे पाठ केली. मागे बघत त्यानं आपल्या शेपटीचा गोंडा बिळात सरकवण्याचा प्रयत्न केला. शेवटी बिळात शेपटी शिरली. शेपटीला हेलकावे देत कोल्हा बसून राहिला. शेपटीच्या केसांना‌ खेकडा धरण्याचा प्रयत्न करीत होता. खेकड्याला खेळवत गवतावर आणायच्या उद्देशाने कोल्ह्यानं मागे सरकून शेपटी जरा आत सरकवली.

२.  डोळ्यांसमोर दिसणारा खेकडा पाहून कोल्ह्याच्या मनान कोणते विचार आले ?
उत्तर.
  डोळ्यांसमोर दिसणार खेकडा पाहून कोल्ह्याच्या मनात असे विचार आले कि गवतावर आलेला खेकडा पंजानं उडवायचा. उताणा पडला, पांढरं पोट दिसलं की, पकडायचा ! त्या खेकड्याच्या चवीनं कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. जिभेनं लाळ पुसत तो बसून होता.

३.  भानावर येताच कोल्ह्याला कोणकोणत्या गोष्टींची जाणीव झाली ?
उत्तर. 
कोल्हा अचानक भानावर आला. अंग न हलवता कोल्हा तसाच बसून होता. शेपटीची पकड कमी झाल्याचं त्याला जाणवलं. क्षणाची उसंत घेऊन कोल्हा परत उसळला. थोडं अंतर तसाच धावला. शेपटीला ओझं जाणवत नव्हतं. त्यानं वळून शेपतीकडं पाहिलं. शेपटीच्या टोकातून रक्ताचे थेंब भिजल्या गवतावर ठिबकत होते.

४.  मागे परतताना कोल्ह्याला काय दिसले ?
उत्तर.
  रक्त पाहताच त्याला खेकडा आठवला. हरामखोरानं रक्त काढलं होतं. तो गवतावरच असणार ! शेपटीची वेदना विसरली गेली. कोल्हा त्वेषाने वळला. खेकड्याला शोधत. आल्या पावली तो मागे वळला. मागे  परताना कोल्ह्याला खेकडा गवतावरून जात दिसला.

5. कोल्हा निर्धास्त का होता ?
उत्तर.  कोल्हा निर्धास्त होता कारण शिकार आता हातात आली होती. कोल्ह्यानं अंदाज घेतला आणि आपल्या पंजाने खेकड्याला उडवलं. खेकडा थोड्या अंतरावर जाऊन पडला. कोल्ह्याची नजर वळायच्या आत आपल्या नांग्या गवतावर पसरून तो उभा राहिला होता. कोल्ह्यानं परत पंजाचा वापर केला व खेकड्याल्या गवतावर उताण पाडला.

६. कल्पनेत गुंग झालेल्या कोल्ह्याची अवस्था काय झाली ?
उत्तर.
  कल्पनेत गुंग झालेल्या कोल्ह्याच्या मस्तकात अचानक एक असघ्य कळ घुसली. काय होतं हे कळायच्या आत कोल्हा झोपावला. वाट दिसेल तिकडं पळत सुटला. शेपटीला अडकलेल्या ओझ्याची जाणीव त्याला होत होती. त्या चिखलातून पळून कोल्हा दमला. त्याला वेग मंदावला. त्यानं मागे वळून पाहिले तर शेपटीला खेकडा चिकटला होता.

७.  कोल्ह्याला कोणती वेदना सोसणं कठीण होत होतं ?
उत्तर.
  शेपटीला खेकडा चिकटलेला पाहून कोल्हा खेकडा पकडण्यासाठी वळला. गरकन स्वतःभोवणी फिरला. पण तो खेकडा तोंडात आला नाही. खेकड्याची शेपटीची पकड बळकट होत होती, असह्य वेदना उठत होती. ती वेदना सोसणं कठीण होत होतं.

८. कोल्ह्याच्या डोळ्यांत सुख कसे उतरले ?
उत्तर.
  कोल्ह्यानं आपल्या पंजाने खेकड्याला उडवलं. गवतावर खेकडा उताणा पडलेला त्याला दिसला. क्षणभर त्याचं पांढरं पोट नजरेत आलं. त्याच क्षणी कोल्ह्यानं आपला जबडा त्यावर आवळला. तोंडात खेकडा आला होता. आवळल्या जाणाऱ्या दातांबरोबर कोल्ह्याच्या डोळ्यांत सूख उतरत होतं.

व्यवसाय :

(अ)  रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१.  कोल्हा _______ जागी दबला.

२.    _______  खेकडा पळत होता.

३. _______  त्यानं इकडं तिकडं पाहिलं.

४.   गवताच्या  ________ खाली असलेलं खेकड्याचं बीळ.

५.  कोल्ह्यानं खेकड्याचा  ________ सोडला.

६.  तेवढा मिळाला असता तर  _______  नव्हती.

७.  _______ पाणी पाहत कोल्हा पुढं जात होता.

८.  बिळाच्या तोंडाशी  ______  मातीच्या गोळ्या दिसत होत्या.

९. कोल्हा सावकाश  _______ गेला.

१०.  कोल्ह्याच्या डोळ्यांत _______ उतरत होतं.

उत्तर  (१)  उभारलेल्या

(२)  डोळ्यांदेखत

(३)‌ आश्चर्यानं

(४)  गड्डड्या

(५)  नाद

(६)  चिंता

(७)  ओढ्याचं

(८)  ‌ताज्या

(९) ‌ बिळाजवळ

(१०)  सुख

(अ)  पुढील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द योजा.

(खाली, थांबला, मी, सुगंध, चार, बापरे, व, इकडे तिकडे)

१.   ________  माझी पिशवी घेतली.

२.  फुलांचा ________ दरवळत होता.

3. पाऊस __________ .

४.  कोल्ह्याने ________ पाहिले.

५.  ________ दिवसांपासून दुपारचे ढग येत.

६.   __________ केवढा हा पाऊस !

७.   ढग वितळले _______  उन्हे आली.

८.  सगळे झाडा ________ जमले.

उत्तर  (१)  मी

(२)  सुगंध

(३)  थांबला

(४)  इकडे तिकडे

(५)  चार

(६)  बापरे

(७)   व

(८)  खाली