(अ)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१.  रमेशला कोणता नाद होता ?

उत्तर.  रमेशला शिकारीचा नाद होता.

२.  रमेश व मित्र अंगारवाडीच्या डोंगरात का गेले ?

उत्तर.  रमेश व मित्र अंगारवाडीच्या डोंगरात ससे मारायला गेले.

३.  रानडुकरे पाणी पिण्यासाठी कोठे येत असत ?

उत्तर.  रानडुकरे पाणी पिण्यासाठी चिंचेच्या झाडा खाली  येत असत.

४.  प्रकाशझोत टाकताच रमेशला काय दिसले ?

उत्तर.   प्रकाशझोत टाकताच रमेशला पंधराएक यार्डावर लाल डोळा‌ चमकताना दिसला.

५. लेखकाला अचानक रस्त्यावर त्याचा मित्र रमेश भेटला होता.

उत्तर.  लेखकाला अचानक रस्त्यावर त्याचा मित्र रमेश भेटला होता.

६.  रमेश कुठे असतो ?

उत्तर.  रमेश दिल्लीला असतो.

७.  रमेश व त्याचे मित्र शिकारीला कसे जायचे ?

उत्तर.  रमेश व त्याचे मित्र शिकारीला सायकलीवरून जायचे.

८.  रमेशला शिकारीला चोरुनमारुन का जावं लागे ?

उत्तर.  घरातल्या विरोधामुळे रमेशला शिकारीला चोरूनमारून जावं लागे.

९.  रमेशने आपली बंदूक काय केली ?

उत्तर.  रमेशने आपली बंदूक विकून टाकली.

(ब)  खालील प्रश्नांची उत्तरे दोन – तीन वाक्यांत लिहा.

१  लेखकाने रमेशचे वर्णन कसे केले आहे ?

उत्तर. रमेश आता देखणा, तगडा जवान झाला होता. बावन्न त्रेपन साली अगदी पोरसवदा होता. अंगाने सडसडीत, चपळ असा रमेश धाडसी होता आणि शिकारीचा विलक्षण नाद त्याला होता असे वर्णन लेखकाने रमेशबद्दल केले आहे.

२.  रमेशच्या आईला कोणती काळजी वाटायची ?

उत्तर. रमेशच्या घरात शिकारी कोणी नव्हते. त्याचा छंदाची सर्वांना भीती वाटायची. तो एकुलता एकच मुलगा असल्याने जंगलात त्याचा पाय कधी सापावर पडले, अशी काळजी रमेशच्या आईला वाटायची.

३. रमेशच्या छंदाबद्दल त्याचे वडील काय सांगायचे ?

उत्तर.  रमेशच्या छंदाबद्दल त्याचे वडील त्याला सांगायचे कि ” अरे, जा. पण कोणी अनुभवी माणसाबरोबर जा. एकटा मात्र जाऊ नकोस आणि तुझी ही रात्रीची शिकार मला पसंद नाही. अंधारात भटकताना रात्र रात्र कधी काहीही घडेल.”

४.  रमेशला ससे मारायला गेल्यावर रानात काय काय दिसले.

उत्तर.  रमेशला आपला मित्रांबरोबर ससे मारायला रानात गेल्यावर त्याला कधी मांजराचे हिरवेगार डोळे दिसत, कधी नाईटजार पक्ष्याची एकच लालबुंद डोळा दिसे, कधी मुंगूस, तर कधी कोल्हे दिसले.

५.  ससे रानात नसल्याने रमेशच्या मित्राला कसे कळले ?

उत्तर. रेमेशचा मित्र वयांन थोर असल्याने व ते शिकारी असल्याने त्याला ससे पकडण्याचा अनुभव होता. रानात चारपाच वेळा कोल्हे दिसल्याने व बोकेसुध्दा दिसल्याने रमेशच्या मित्राला ससे रानात नसल्याने कळले.

६.  रानात आल्यावर रमेशला रिक्यामा हातानं घरी जायचं का नव्हत ?

उत्तर.  रमेश घरातल्या विरोधामुळे अनेकवेळा जामानिमा करून शिकारीला घराबाहेर पडू लागला की त्याची बहीण त्याला म्हणे, “आज आणा काहीतरी, नहमी रड नको. काही मिळालं नाही म्हणून” हे ऐकून  रेमेश फार खट्ट व्हायचा, म्हणून आज रमेशला रिकाम्या हातानं घरी जायचं नव्हत.

(क)  पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी पाच – सहा वाक्यांत लिहा.

१.   रमेशला मित्राने कोणती योजना आखली होती ?

उत्तर.  एकदा रमेश आपल्या मित्रांबरोबर रात्री डोंगरात ससे मारायला गेला होता. फार फिरून सुध्दा त्यानां ससे दिसले नाही. फार कोल्हे असल्याने व बोकेसुध्दा दिसल्याने रमेशच्या मित्राने ससे नसल्याचे सांगितले. दमून गेल्यामुळे ते सर्व बांधावर बसले. सुरेख काळोख होता. आभाळ चांदण्याने गजबजलं होतं ऐवड्यात रमेशचा मित्र म्हणाला, ” असं करूया का ? मी थोडा वर जातो . वरची पठारं बघतो. तुम्ही पायथ्यापायय्थानं सरळ या बघत बघत. इथनं चारशेएक यार्डावर खाली शेतात चिंचेचं मोठं झाड आहे. मळाच आहे. तो‌ लागला की, तुम्हीही हळूहळू वर चढा. लहानशी घळ आहे तिथं; आणि लगेच वर आंबाच्या झाडाखाली पाणी आहे. मळातल्या पिकावर जाणारी रानडुकरं ह्या पाण्यावर येतात. बघत बघत या. तोवर मीही वरून येतो.” अशी योजना रमेशच्या मित्राने आखली होती.

२.  मित्राचा प्लॅन आकर्षक का वाटला ?

उत्तर.  रमेश शिकारीला निघाला कि त्याची बहीण त्याला म्हणे, “आज आणा काहीतरी, नहमी रड नको. काही मिळालं नाही म्हणून” हे ऐकून  रमेश फार खट्ट व्हायचा. एकदा रानात असच दमून बसल्यावर रमेशच्या मित्राने ससा  मिळाला नाही म्हणून रानडुकरं मारण्याची योजना आखली होती. हा प्लॅन भलताच आकर्षक वाटला कारण आजवर फक्त चित्तूर, ढोक यासारखी पाखरं, हरेल, कवडे, ससे ह्याशिवाय काही मारलं नव्हतं. रमेशच्या मनात आलं, की ह्यांच्यापेक्षा आपण नक्कीच पाण्यावर पोचणार, डुक्कर दिसलं की मारू. एवढी मोठी शिकार सायकलवरून घरी नेली, की काय आनंद होईल सर्वांना ! असे रमेशला वाटले.

३.  रमेशने शिकार करणे का सोडले ?

उत्तर.  रमेश आपला मित्रां बरोबर शिकारीला गेला होता. तेव्हा त्यांची रानडुकरं मारण्याची योजना होती म्हणून तो भराभर चिंचेच्या झाडाकडे निघाला होता. जवळ जवळ पोचल्यावर त्याला लाल डोळा चमकताना दिसला, तो रानडुकर आहे समजुन रेमेशने आपली बंदूक खंद्य्याला जोडून नीट नेम घेतला. आता ट्रिगर  ओढणारच होता, तोच आवाज आला ! ” या या ! पलीकडे आहे पाणी.” ह्या आवाज त्या डोळाने केला होता ! रमेशच्या मित्रांपाशी दोन सेल्सची लहान बॅटरी होती, तो लहान बब्लच त्याला डोळ्यासारखा दिसला होता. मित्रांनी तेवढेशब्द उच्चारले नसते, तर रमेशने बार मारला असता. त्या काळोखात त्यांच्या मस्तकाच्या चिंधड्या झाल्या असत्या. त्या शॉकमधून बाहेर पडायला दीड तास लागला. त्यानंतर रमेशने शिकार करणे साडले.

व्यवसाय :

(अ) खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.

१.  “ओळखलंत का ?”

उत्तर.   रमेशने लेखकाला विचारले.

२.  “शिकारीला जातोस का आता ?”

उत्तर. लेखकाने रमेशला विचारले.

३.  ” अरे, जा पण कोणा अनुभवी माणसाबरोबर जा.”

उत्तर.  रमेशचे वडील रमेशला म्हणाले.

४.  “कोल्हे आहेत फार ह्या रानाला. बोकेसुध्दा दिसतात.,”

उत्तर.  रमेशच्या मित्राने रमेशला म्हटले.

५.  “आज आणा काहीतरी, नेहमी रड नको. काही मिळालं नाही म्हणून.”

उत्तर.  रमेशची बहीण रमेशला म्हणाली.

६.  “असं करुया का? “

उत्तर.  रमेशच्या मित्राने रमेशला म्हटले.

७.  “या या ! पलीकडे आहे पाणी.”

उत्तर.  रमेशच्या मित्राने रमेशला सांगितले.

८.  ” ही हकीकत तुम्ही नंतर त्यांना सांगितली ?”

उत्तर.  लेखकाने रमेशला विचारले.

९.  “काय सांगणार म्हणा ? कोण होते ते ?”

उत्तर.  लेखकाने रमेशला विचारले.

१०.  “तुम्हीच होता ते !”

उत्तर.  रमेशने लेखकाला सांगितले.

(ब)  रिकाम्या जागी पाठातील योग शब्द लिहा.

१.     अचानक रस्त्यात __________ पडली.

२.     बावन्न त्रेपन्न साली, अगदी ________ होता.

३.     संध्याकाळी साडेसहा सातचा वेळ असल्यामुळे _______ घो घो गर्दी होती.

४.     ________ वाहत होते.

५.    आम्ही दोघं _________ वरून नेहमी कुठं कुठं जायचो.

६.    मी अगदीच ________ होतो.

७.    एकदा ________ डोंगरात रात्री आम्ही दोघे ससे मारायला गेलो.

८.    जिभेला _________ पडली.

९.     डोळा ________ दिसतच होता.

१०.   त्या शॉकमधून बाहेर पडायला ________ तास लागला.

उत्तर  (१)      गाठ

(२)      पोरसवदा

‌   (३)       जिमखान्यावर

(४)       फूटपाथ

(५)       सायकलीवरून

(६)        नवशिका

(७)        अंगारवाडीच्या

(८)         कोरड

(९) ‌       लुकलुकताना

(१०)     दीड

 भाषाभास :

पुरुषवाचक सर्वनाम     

एकवचन                अनेकवचन

प्रथम पुरुष                                              मी                           आम्ही

द्वितीय पुरुष                                            तू                            तुम्ही

तृतीय पुरूष                                       तो, ती, ते                   ते, त्या, ती

 

प्रश्नार्थक सर्वनामे  = (?)

कोण, काय, कोणी

दर्शक सर्वनामे

हा, ते, तो, ती  इत्यादी शब्द जेव्हा दर्शक (दाखविणे) ह्या अर्थी वापरले जातात, तेव्हा त्या शब्दांना ‘दर्शक        सर्वनामे’  म्हणतात.

 

(ख)  पुढील वाक्यांतील सर्वनामे ओळखा.

१.  ” काल तुम्हाला पत्र आले ना एक ?” तिने पून्हा म्हले.

=    तिने – द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम

२.  सावरून बसत तो म्हणाला, “होय, मीच रमेश तालीम.”

=    तो – दर्शक सर्वनाम

३.  “कोण होते ते ? पुण्याचेच का ?”

=  कोण – प्रश्न्नार्थक सर्वनाम