(अ)  पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा:

१.  स्वाती रामतीर्थांनी मुलांना कोणता प्रश्न विचारला ?

उत्तर.  स्वाती रामतीर्थांनी फळ्यावर एक रेषा काढली आणि मुलांना विचारले ,” ही रेषा न पुसता हिला कोणी लहान करून दाखवील का ?”

२.  रेषा लहान दाखविण्यासाठी एका विद्यार्थ्यांने काय केले ?

उत्तर.  रेषा लहान दाखविण्यासाती एका विद्यार्थ्यांने त्या रेषेच्या जवळच एक मोठी रेषा काढडी. आपोआपच पाहिली रेषा लहान दिसू लागली.

(ब) पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन ते चार वाक्यांत लिहा.

१.  स्वामी रामतीर्थांनी विद्यार्थांना भारतीय संस्कृतीचे कोणते मर्म  सांगितले ?

उत्तर.  आपण स्वतः मोठे होण्यासाठी आपल्या भोवतीच्या लोकांना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची निंदा करून त्यांना छोटे लेखण्याची गरज नाही. आपण आपल्या स्वत: च्या गुणांनी आणि कर्तृत्वाने महान बनले पाहिजे. असे सांगून स्वामी रामतीर्थांनी विद्यार्थांना भारतीय संस्कृतीचे हेच खरे मर्म आहे  असे सांगितले.

व्यवसाय :

(अ) ‌खालील वाक्य कोणी कोणास म्हटले ते लिहा :

१.  “ही रेषा न पुसता हिला कोणी लहान करुन दाखवील का ?”

उत्तर.  स्वामी रामतीर्थांना विद्यार्थांना विचारले.

२.  “याचा सखोल अर्थ आपण समजून घेतला पाहिजे ?

उत्तर.  स्वामी रामतीर्थांना विद्यार्थांना म्हटले.

(ब)  रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१.  एके  दिवशी त्यांनी _______ एक रेषा काढली.

२.  एक विद्यार्थी ________ उठला.

३.  भारतीय ________ हेच तर खरे मर्म आहे.

उत्तर    (१)  फळ्यावर

(२)  पटकन

(३)  संस्कृतीचे