(अ)  पुढील प्रश्नांची उत्तर प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१.  विनोबाजींनी विद्यार्थ्यांना कोणते काम करायला सांगितले ?

उत्तर.  विनोबाजींनी विद्यार्थ्यांना काही कागदाचे तुकडे दिले त्यात भारताचा नकाशा होता. आता हे तुकडे जोडून पुन्हा भारताचा नकाशा तयार करायला सांगितले.

२.  तो तरुण विनोबाजींना काय म्हणाला ?

उत्तर.  तो तरुण थोडी हिंमत करुन विनोबाजींना म्हणाला, “तुमची परवानगी असेल तर मी हे तुकडे जोडून देतो.”

३.आर्चाय विनोबांकडे कोण आले होते ?

उत्तर.  आचार्य विनोबांकडे काही कॉलेज विद्यार्थी आले होते.

(ब)  पुढील प्रश्नांची उत्तर प्रत्येकी तीन ते चार वाक्यांत लिहा.

१.  विनोबाजींनी विचारलेल्या प्रश्नावर तरूणाने कोणते उत्तर दिले ?

उत्तर.  विनोबाजींची संमती घेऊन थोड्याच वेळात त्या तरुणाने ते तुकडे जोडून भारताचे चित्र तयार केले.  विनोबाजींनी कौतुकाने त्या तरुणाला विचारले, “तू इतक्या लवकर हे तुकडे कसे जोडलेस ?” तेव्हा तरुणाने उत्तर दिले, “या तुकड्यांवर एक बाजूने भारताचा नकाशा आहे आणि दुसऱ्या बाजूने माणसाचे चित्र आहे. माणूस जोडला. त्यातूनच भारताचा हा नकाशा आपोआप तयार झाला.

४.  विनोबाजींनी कोणते स्पष्टीकरण केले ?

उत्तर  विनोबाजींनी असे स्पष्टीकरण केले कि जसे तुकड्यांवर एका बाजूने भारताचा नकाशा होता आणि दुसऱ्या बाजूने माणसाने चित्र होते. माणूस जोडला. त्यातूनच  भारताचा नकाशा आपोआप तयार झाला, त्याच प्रमाणे देश जोडायचा असेल तर आधी माणूस जोडायला हवा. एक एक माणूस जोडला तर देश आपोआप जोडला जाईल.

  व्यवसाय :

(अ) खालील वाक्ये कोणि कोणास म्हटले ते लिहा.

१.  “तुमची परवानगी असेल तर मी हे तुकडे जोडून देतो.”

उत्तर.  एका तरुणाने विनोबाजींनी म्हटले.

२. “तू इतक्या लवकर हे तुकडे कसे जोडलेस ?”

उत्तर.  विनोबाजींनी तरुणाला विचारले.

३.  “अगदी बरोबर आहे.”

उत्तर.  विनोबाजींनी विद्यार्थ्यांनी म्हटले.

(ब)  रिकाम्या जागी पठातील योग्य शब्द लिहा.

१.  विनोबाजींनी त्यांना काही ______ तुकडे दिले.

२.  कागदावर ________ नकाशा होता.

३.  जवळच एक _________ बसला होता.

४.  विनोबाजींनी _________ त्या तरुणाला विचारले.

उत्तर.    (१)  कागदाचे

(२)  भारताचा

(३)   तरुण

(४)   कौतुकाने