प्रश्नः

(अ) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१.  श्रीकांतची सुविचारवही पाहून सुदेशने काय ठरविले ?
उत्तर. श्रीकांतची सुविचारवही पाहून सुदेशने असाच एखादा संग्रह करायचे ठरविले.

२.  प्रदर्शन कुठे ठेवले होते ?
उत्तर. पंचायतीच्या सभागृहात प्रदर्शन ठेवले होते.

३.  प्रदर्शन पहायला कोण कोण आले होते ?
उत्तर. प्रदर्शन पहायला गावातील तसेच शेजारच्या गावातील शाळकरी मुले, तसेच श्रीकांत ही आला होता.

४.  सुदेश कुठे गेला होता ?
उत्तर. सुदेश आईसोबत आपल्या मावशीकडे गेला होता.

५.  वहीच्या मुखपृष्ठावर काय लिहिले होते ?
उत्तर. वहीच्या मुखपृष्ठावर सुंदर अक्षरात ‘अमृतकण’ लिहिले होते.

६. ‌‌ प्रदर्शनाचे उद्घाटन कोणी केले ?
उत्तर. प्रदर्शनाचे उद्घाटन गावच्या सरपंचांनी केले.

७.  मुलांचे कौतुक कोणी केले ?
उत्तर. गावातील लोकांनी प्रदर्शन पाहून मुलांचे कौतुक केले.

(ब)  खालील प्रश्नांची प्रत्येकी तीन – चार वाक्यांत उत्तरे लिहाः

१.  श्रीकांतची सुविचारवही सुदेशला का आवडली ?
उत्तर
. सुदेशने टेबलावरची सुविचारवही उचलली. त्या वहिच्या मुखपृष्ठावर सुंदर अक्षरात ‘अमृतकण’ लिहिले होते.  सुदेश त्या वहीचे एकेक पान हळुवारपणे उलटू लागला. प्रत्येक पानावर ठळक आणि वळणदार अक्षरात लिहिलेले सुविचार होते. विनोबा भावे, पं . जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, वि. स. खांडेकर, साने गुरुजी, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, शेक्सपिअर अशा अनेक थोरांचे विचार त्या वहीत होते, प्रत्येक सुविचार सोप्या भाषेत होता. त्यामुळे समजायला सोपा होता, म्हणून श्रीकांतची सुविचारवही सुदेशला आवडली.

२.  वाचनामुळे कोणकोणते फायदे होतात ?
उत्तर. वर्तमानपत्रात दरदिवशी सुविचार छापले जातात. दूरदर्शनवरही सुविचार दाखविले जातात. अशाप्रकारे कितीतरी सुविचार मिळू शकतात. वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचून आनंद तर मिळतोच, शिवाय बरेच चांगले चांगले विचार सहज मिळत जातात, तसच आपले ज्ञान पण वाढत जाते. चांगले विचार असलेली वाक्यं एका वहीत लिहून ठेवावी. वाचनामुळे आपण ज्ञानाने भरले जातात.

३. सुदेशने पक्षिज्ञानसंग्रह तयार करण्यासाठी काय काय केले ?
उत्तर. मावशीकडून परतल्यापासून सुदेश नेहमी घाईत दिसू लागला. वेगवेगळ्या पक्ष्यांची पिसे तो गोळा करु लागला. निरनिरळ्या पक्ष्यांची चित्रेही त्याने मिळविली. एका वहीत प्रत्येक पानावर एक पक्ष्याचे पीस आणि चित्र चिकटविले व त्या पक्ष्याची थोडक्यात पण महत्वाची अशी माहितीही लिहिली अशा रितीने सुदेशने पक्षिज्ञानसंग्रह तयार केले.

४.  मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सरपंचानी काय काय केले ?
उत्तर. पंचायतीच्या सभागृहात सुदेश आणि त्याच्या इतर मित्रांनी प्रदर्शन ठेवले होते. सभागृह छान सजवले गेले. गावच्या सरपंचांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. प्रदर्शनातील सर्व वस्तू त्यांनी बारकाईने बघितल्या व मुलांच्या या कामगिरीबद्दल प्रशंसा केली. मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामपंचायतीतर्फे त्यांनी बक्षिसेही जाहीर केले.

५.   सुदेशला त्याचे दोस्त ‘पक्षिमित्र’ का म्हणत ?
उतर. श्रीकांतची सुविचारवही पाहून व त्याचे बोलणे ऐकून सुदेशने असाच एखादा संग्रह करायचे ठरविले. त्याने ‘पक्षिज्ञानसंग्रह’ तयार केले. या त्याच्या उपक्रमामुळे सुदेशला निरनिराळ्या पक्ष्यांची नीट ओळख झाली. परिसरातील कोणत्याही पक्ष्याची माहिती तो आपल्या दोस्तांना  सांगत असे. म्हणून त्याचे दोस्त त्याला ‘पक्षिमित्र’ म्हणत.

६.  सुदेश आणि त्याच्या मित्रांनी प्रदर्शनाची योजना कशी तयार केली ?
उत्तर. सुदेश आणि त्याच्या दोस्तांच्या मनात आपल्या वस्तुसंग्रहाचे प्रदर्शन भरविण्याचा विचार आला. त्यांनी सरपंचांची भेट घेतली. वस्तु संग्रहाविषयी माहिती दिली आणि प्रदर्शन भरविण्याची इच्छा व्यक्त केली. सरपंचांना प्रदर्शनाची कल्पना खूप आवडली. त्यानंतर सुदेश व इतरांनी आपल्या शाळेतील शिक्षकांना प्रदर्शनाविषयी सांगितले. त्यांना ही आनंद झाला. त्यांच्या मदतीने सुदेश आणि त्याच्या मित्रांनी प्रदर्शनाची योजना तयार केली.

७.  सभागृह कसा सजवला गेला ?

                          वा
७.  प्रदर्शनासाठी काय काय ठेवण्यात आले ?
उत्तर. पंचायतीच्या सभागृहात सुदेश आणि त्याच्या इतर मित्रांनी आपापले संग्रह व्यवस्थित मांडले. प्रत्येक संग्रह आकर्षक दिसण्यासाठी सजावट केली. एका टेबलावर पक्षिसंग्रह ठेवला. सोबत काही पक्ष्यांची मोठ्या आकारातील चित्रेही ठेवली. दुसऱ्या टेबल्यावर  पेनांचे वेगवेगळे प्रकार मांडले. आणखी एका टेबलावर दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक अशा विविध नियतकालिकांचे अंक मांडले होते. तसेच काही टेबलांवर काही तक्ते, वेगवेगळ्या प्राण्यांची सुबक अशी रंगीत चित्रे, कापूस वा चिंध्या भरुन केलेल्या काही प्राण्यांच्या प्रतिकृती, दगडांचे नमुने इत्यादि मांडून ठेवले होते.

(अ)  रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहाः

१.  सुदेश वही पाहण्यात ______ झाला.

२.  वेगवेगळ्या पक्ष्यांची ________तो गोळा करु लागला.

३.  सुदेशचा पक्षिसंग्रह पाहून त्याच्या मित्रांनाही ______ झाला.

४.  पुढे त्यांना ______ करण्याचा छंदचा जडला.

५.  त्यांनी जमविलेल्या काही वस्तू ______ तर होत्याच, शिवाय ______ !

६.  एखाघा वस्तूचे वेगवेगळे ______  एकत्र बघण्यात सगळ्यांना ______ वाटे.

७.  सुदेशच्या आमंत्रणावरुन _______ आला होता.

उत्तर (१)  गुंग

(२)  पिसे

(३)  हुरुप

(4)   वस्तुसंग्रह

(5)    दुर्मीळ, आकर्षकही

(6)    नमुने, मौज

(7)    श्रीकांतही

(ब)  खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहाः

१.  “अरे श्रीकांत इकडे ये, कोण आलंय, बघ ना !”
उत्तर. श्रीकांतच्या आईने श्रीकांतला म्हटले.

२. “कसल्या कामात गुंतला होतास रे तू ?”
उत्तर. सुदेशने श्रीकांतच्या विचारले.

३.  “हे काम शिक्षकांनी करायला सांगितलंय का ?”
उत्तर. सुदेशने श्रीकांतला विचारले.

४.  “माझ्या एका मित्रानं विविध प्रकारच्या कितीतरी रिकाम्या जमविल्या आहे‌.”
उत्तर. श्रीकांतने सुदेशला सांगितले.

५.  “खरच की अशाप्रकारे कितीतरी सुविचार मिळू शकतात.”
उत्तर. सुदेशने श्रीकांतला म्हटले.

व्यवसाय :

(क)  खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची अनेकवचनी रुपे करुन ती वाक्ये पुन्हा लिहा.

१.  अहमदने चित्र ठेवले .
– अहमदने चित्रे ठेवली.

२.  मी वही उचलली.
– आम्ही वह्या उचलल्या.

३.  मुलाने दररोज सुविचार वाचावा.
–  मुलाने दररोज सुविचारे वाचावेत.

४.  शिक्षक विद्यार्थ्यांला खेळ शिकवतात.
–  शिक्षक विद्यार्थ्यांना  खेळ शिकवतात.

५.  तू कुठे गेला होतास ?
–  तूम्ही कुठे गेला होत्यास ?