प्रश्न :

(अ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१)  कोठडीतील कैद्यांना मार का दिला जात होता ?
उत्तर. कोठडीतील कैद्यांना बोलके करून त्यांच्या साथीदारांची नावे व इतर माहिती वदवून घेण्यासाठी त्यांना मार दिली जात होता.

२)  गोव्यात स्वातंत्र्य चळवळीला ऊत केव्हा आला होता ?
उत्तर. सन १९५५ मध्ये गोव्यात स्वातंत्र्यचळवळीला ऊत आला होता.

३)  लोक गोव्यात सत्याग्रह का करीत होते ?
उत्तर.  गोवा पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त करण्यासाठी लोक गोव्यात सत्याग्रह करीत होते.

४)  स्वातंत्र्यसैनिकांना जीपमध्ये बसवून कुठे नेण्यात आले ?
उत्तर. स्वातंत्र्यसैनिकांना जीपमध्ये बसवून त्यांच्या गावात नेण्यात आले.

५)  पोर्तुगीज अधिकाऱ्यांने सैनिकाला कोणते आमिष दाखविले ?
उत्तर. पोर्तुगीज अधिकाऱ्याने सैनिकाला असे आमिष दाखविले कि ” जर सहकाऱ्यांची नावं सांगितलीस तर आताच मी तुला सोडून देईन. नाहीतर इथच ठार करीन !”

६.  दोन्ही कैदी किती दिवस कोठडीत होते ?
उत्तर. दोन्ही कैदी सहा दिवस कोठडीत होते.

७.  पोलीस कोणाचा शोध घेत होते ?
उत्तर.  पोलीस निरनिराळ्या मार्गाने स्वातंत्र्यसैनिकांचा शोध घेत होते.

८.  पोलीसांनी दोन स्वातंत्र्यसैनिकांना कुठे आणले 
उत्तर.  पोलीसांनी दोद्या स्वातंत्र्यसैनिकांना पकडून पणजीतील पोलीसठाण्यात आणले.

(ब)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन ते चार वाक्यांत लिहा.

१.  कोठडीत ठेवलेल्या कैद्यांना कोणकोणत्या प्रकारची शिक्षा दिली जात होती ?
उत्तर. कोठडीत ठेवलेल्या केद्यांना बोलके करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांच्या साथीदारांची नावे व इतर माहिती वदवून घेण्यासाठी त्यांना मारझोड करणे, तहानेने व्याकूळ झाले तरी प्यायला पाणी न देणे, डोळ्यांवर प्रखर प्रकाश टाकून झोपू न देणे, लोंबकळत ठेवणे, जळत्या सिगारेटचे चटके देणे अशा प्रकारची शिक्षा त्यांना दिली जात होती.

२.  या पाठातील स्वातंत्र्यसैनिकांचे देशप्रेम कसे दिसून येते ?
उत्तर.  सैनिकांकडून आपल्याला चळवळीत भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांची माहिती मिळेल असे अधिकाऱ्याला वाटत होते. पण त्या शूर वीरांनी गेल्या सहा दिवसांत तोंड उघडले नव्हते. आमिष दाखवूनही उपयोग झाला नाही. शेवटी ते अधिकाऱ्यांच्या गोळीचे शिकार झाले. त्यांच ते देशाशी एकनिष्ट देशप्रेमच होता कि त्यांनी मरण स्विकारले पण आपले तोंड उघडले नाही.

३.  स्वातंत्र्यसैनिकेच्या मनात कालवाकालव का झाली ?
उत्तर.  दूरवर स्वातंत्र्यसैनिकेची बायको उभी रडत होती. भेदरलेल्या नजरेने पाहत तिला बिलगून मुलगा उभा होता. बाजूला आई – वडील हताश होऊन पाहत उभे होते. त्या सगळ्याचे मग काय होईल असे चितून त्याला सगळ्यांना पाहताच त्याच्या मनात कालवाकालव झाली.

४.  नदीचे पाणी लाल कसे झाले ?
उत्तर.  शिपायांनी  स्वातंत्र्यसैनिकाला नदीकाठी नेले. त्याच्या हातातील बेड्या काढल्या व त्याला नदीत ढकलून दिले. सैनिक पोहण्याचा प्रयत्न करू लागला. अधिकाऱ्याने नेम धरून गोळ्या झाडल्या व त्याला ठार केले.  स्वातंत्र्यसैनिकेच्या रक्ताने नदीचे पाणी लाल झाले.

५. अधिकारी गावात आले तेव्हा लोकांची काय दशा झाली ?
उत्तर.  अधिकाऱ्यांनी  स्वातंत्र्यसैनिकांना हातात बेड्या ठोकल्या व त्यांना जीप मध्ये बसवून त्यांच्या गावात आणले. पोलिसांनी त्यांना उतरविले. एकाला जवळच्याच झाडाला करकचून बांधले. ही बातमी वाऱ्यसारखी गावात पसरली. काही लोक भीतभीतच घराबाहेर पडले. प्रत्येकजण दुरुनच समोरचे दृश्य पाहत होता , पण येण्याचे धाडस कुणालाही होत नव्हते. लोक खूपच घाबरलेले होते.

व्यवसाय:

(अ)  रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१.  त्यांना ________ करण्याचा प्रयत्न केला जात होता.

२. पण त्या ______ गेल्या सहा दिवसांत तोंड उघडले नव्हते.

३.  तो अधिकारी _____ होता.

४.  जीप भर ______ निघाली.

५.  एकाला जवळच्याच झाडाला _____ बांधले.

६.  सैनिकाने _______ दिशेने पाहिले.

७.  त्याने _______ मान हालविली.

८.  सैनिकाच्या मनात ______ सुरू झाली.

९.  शिपायांनी त्याला _____ नेले.

१०.  सैनिक _______ प्रयत्न करू लागला.

उत्तर    (१)   बोलके

(२)   शूर वीरांनी

(३)   खूश

(४)   वेगाने

(५)   करकचून

(६)   आवाजाच्या

(७)   नकारार्थी

(८)   चलबिचल

(९)   नदीकाठी

(१०)  पोहण्याचा

(ब)  खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.

१.  “उठा आता ”
उत्तर.
एका पोलीस अधिकाऱ्याने स्वातंत्र्यसैनिकांना म्हटले.

२.  ” हा तुझा गाव. “
उत्तर. पोलीस अधिकाऱ्याने  स्वातंत्र्यसैनिकाला म्हटले.

३.  ” मला  माहीत नाही. “
उत्तर. सैनिकाने पोलीस अधिकाऱ्याला सांगितले.

४.  तुझ्या साथीदारांची नावं सांग, नाहीतर मरायला तयार हो.”
उत्तर.  अधिकारी दुसऱ्या सैनिकाला म्हणाला.

५.  ” झाड गोळी “
उत्तर.  दुसऱ्या सैनिकाने अधिकाऱ्याना म्हटले.

(क) खाली दिलेली विशेषणे वापरून वाक्ये तयार करा.

१.   स्वच्छ – आपण नेहमी स्वच्छ कपडे वापरले पाहिजेच.

२.   सुंदर – बागेत सुंदर फूल फूलले आहे.

३.   थंड – मला थंड गोला खायला आवडतो.

४.    शूर – मला शूर कुत्रा हवा.

५.    हुशार – मीना शिकायला हुशार आहे.

६.    शहाणा – माझा मित्र शहाणा आहे

७.    म्हातारा – दुकानात एक म्हातारा चाय पित होता.