प्रश्न:

(अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यांत लिहा.

१. बालकृष्ण यशोदेला कोणती विनंती करतो ?
उत्तर. बालकृष्ण यशोदेला सांगतो की मी मातीचे मडके पाहिले नाही. त्यामुळे तु मला मारु नकोस अशी विनंती करतो.

२. त्याने काय पाहिले नाही ?
उत्तर. त्याने मातीचे मडके पाहिले नाही.

३. बालकृष्णाचे सोबती त्याला कोणत्या भरीला घालू बघतात ?
उत्तर. बालकृष्णाचे सोबती त्याला दही दूध चोरुन आणून त्यांना द्यायला सांगतात.

(ब) खालील प्रश्नांची उत्तर चार ते पाच वाक्यांत  लिहा.

१) बापुडवाणा होऊन बालकृष्ण यशोदामातेला काय सांगतो ?
उत्तर. बापुडवाणा होऊन बालकृष्ण यशोदामातेला सांगतो की आई मी मातीचे मडके पाहिले नाही तु मला मारु नको. हे माझे सोबती मला दही दुध चोरुन आणून आपल्याला दे म्हणून ते माझ्यावर रुसले आहेत. त्याच्यात माझा भाऊही बलराम समिल झालेला आहे.