वाक्यप्रचार :

१. देहभान हरपणे –  स्वतःला विसरून जाणे.

२. अवलोकन करणे – निरीक्षण करणे, बारकाईने पाहणे.

टीपा :

१. तेलमुंडे – झाडावर चढण्यारा एक प्रकारचा मासा.

२. मॅनग्रूव्ह – खाजणीचे जंगल, खाडीच्या किनाऱ्यावर व पाण्यात असणारे खारफुटीचे जंगल.

३. उदमांजर – मासे खाणारा प्राणी.

४. ऋग्वेद – चार वेदांपैकी पहिला वेद.

५. हरोळ्या – पक्ष्यांनी एक जात.

६. मोहाचे रान – मध्य प्रदेशात काही ठिकाणी आढलणारे रान, आदिवासींचे जीवन या रानाशी अधिक निगडीत असते.

प्रश्न :

अ) खालील वाक्य कोणी कोणास म्हटली ते लिहा.

१) “ह्या झाडावर चढणारा डेमका – म्हणजे मासा आहे.”
उत्तर.  हे वाक्य धर्माने लेखकाला म्हटले.

२) “कालवं मिटताना असा आवाज होतो.”
उत्तर.  हे वाक्य अधिक माहिती देताना धर्माने लेखकाला म्हटले.

३)  “ही वारूळं नाहीत सायब. ती समुद्र – विंचवाची घरं आहेत.”
उत्तर. हे वाक्य धर्माने लेखकाला म्हटले आहे.

४) “बुडला तर मासा, उडला तर पक्षी.”
उत्तर.  हे वाक्य धर्माने खंड्या पक्ष्याबद्दल लेखकाला म्हटले आहे.

५) “अगं, माझ्या झाडाची फुलं गोळा करतेस काय? आता तुला दाखवतेच.”
उत्तर.  हे वाक्य अधिवासी स्त्रीने अस्वलाला स्त्री समजून म्हटले आहे.

६) वृक्षांइतका धर्मात्मा कुणी नाही. त्यांच्यापासून मी देवाचं अस्तित्व जाणलंय.
उत्तर.  लेखक मारुती चितमपल्ली यांनी स्वतः शीच व्यक्त केलेले हे विचार आहेत.

(आ)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यांत लिहा.

१) लेखक सागर सीमेवरच्या पक्ष्यांच्या अभ्यासाकरिता कोणत्या गावाला पोहोचले होते ?
उत्तर.  लेखक सागर सीमेवरच्या पक्ष्यांच्या अभ्यासाकरिता  दिवेआगर नजीकच्या कुडेगावला  पोहोचले  होते.

२) कालवं मिटताना कसा आवाज होतो?
उत्तर.  कालवं  मिटताना चुट्चुट् आवाज होतो.

३) लेखकाच्या सोबत कोण होता ?
उत्तर. लेखकाच्या सोबत गावातला होडीवाला धर्मा जानू पाटील होता.

४) लेखकाच्या  प्रवास कोणता खाडीतून चालला होता ?
उत्तर.  लेखकाच्या  प्रवास हरीवत या खाडीतून चालला होता.

५) खाजणीच्या जंगलात कोणकोणती झाडे होती ?
उत्तर.   खाजणीच्या जंगलात कांदळ, टिवर व बांजळाची झाडे होती.

६) झाडावर चढणाऱ्या माशाचे नाव करा ?
उत्तर.    झाडावर चढणाऱ्या माशाचे नाव डेमका मासा.

७) ऋग्वेदात पक्ष्यांच्या घरट्यातील पिलांना कशाची उपमा दिली आहे?
उत्तर.   ऋग्वेदात पक्ष्यांच्या घरट्यातील पिलांना धनाची उपमा दिली आहे.

८) समुद्र – विंचवाचे  घर कसे दिसतात ?
उत्तर.  समुद्र – विंचवाचे घर वारुळासारखे दिसतात .

९) समुद्र – विंचवाला इंग्रजीत काय म्हणतात ?
उत्तर.   समुद्र – विंचवाला इंग्रजीत ‘किंग क्रॅब’ म्हणतात.

१०) हरोळ्या सूर्योदयापूर्वी काय करायला जातात ?
उत्तर.  हरोळ्या सूर्योदयापूर्वी जंगलातील खारी माती खायला जातात.

११) हरोळ्या थव्याथव्यांनी कोठे जमू लागतात?
उत्तर.  हरोळ्या थव्याथव्यांनी मोहाच्या झाडांवर जमू लागतात.

१२) कोणती रानबदकं पोखरीत घरटी करून त्यांत अंडी घालतात ?
उत्तर.  अडई व‌ वणकी रानबदकं पोखरीत घरटी करून त्यांत अंडी घालतात.

इ) खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यांत लिहा.

१) खाडीकाठच्या जंगलाचे वर्णन लेखकाने कसे केले आहे ?
उत्तर.  खाडीकाठच्या जंगलावर हळूहळू तांबडं फुटलं. या जंगलाला एक आगळं – वेगळं गूढ सौंदर्य प्राप्त झालं. बाजूला हिरव्या डोंगरांच्या रांगा. दोन डोंगरातून वाहत समुद्राला मिळालेली हरवीत नदी. समुद्राचा पोटात गेलेले दांडे. त्यामुळे निर्माण झालेली खाडी अन् खाडीकाठची जंगलं. त्या पलीकडं अफाट समुद्र, असे खाडीकाठच्या जंगलाचे वर्णन लेखकाने केले आहे.

२) उदमांजराविषयी लेखक काय सांगतात ?
उत्तर.  उदमांजरी पाण्यालगत जमिनीच्या दिशेनं लांबवर बीळ करत अन् त्यात दोन – तीन पिलांना जन्म देते. अशा पिलांना धबाड म्हणतात.धबाड म्हणजे धन. ऋग्वेदात पण पक्षाच्या घरट्यातील पिलांना धनाचीच उपमा दिली आहे.

३) समुद्रविंचवाची  घरे कशी असतात ?
उत्तर. समुद्रविंचवाची  घरे बाहेरून वारुळासारखी दिसतात. आत नर व मादी राहते. ते मातीच्या ओल्या गोळ्यांनी घर  बांधतात. जमिनीवर एक – दोन हात उंच असलेलं हे घरटं खाली नऊ ते दहा हात खोल असतं. मादी घरट्यात अंडी घालते व तिथंच पिलं होतात.

४) मोहाच्या फुलाचे वर्णन लेखकाने कसे केले आहे ?
उत्तर.  मोहाची फुलं कुचीत येऊ लागली की जिकडे तिकडे मोयान मोयान गंध सुटतो. रोज जमिनीवर फुलांचा सडा पडू लागतो. फुलं वेचायला आदिवासी स्त्रिया येतात. रात्री जंगलातील हरणं फुलांचा गोड चारा खायला जमू लागतात. मोहा फुलला की त्याचं आगळचं रूप अनुभवला येतं.

५) मुलांना विचारी बनवायला हवे असेल तर काय करावे लागेल असे लेखक म्हणतो ?
उत्तर.  मुलांना विचारी बनवायला हवं असल्यास त्यांना जंगलात व पर्वतावर न्यायला पाहिजे. तिथल्या हिरवळीवर त्यांना स्वैरपणे भटकू  द्यायला पाहिजे. पर्वतावरील वाऱ्याचा प्रत्येक झुळुकेबरोबर मुलांतील पावित्र जाणायला त्यांना तशी दृष्टी द्यायला हवी.

(इ)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी पाच ते सहा वाक्यांत लिहा.

१) लेखकाने खाजणीच्या जंगलाचे वर्णन कसे केले आहे ?
उत्तर.  खाडीकाठच्या जंगलाला मॅनग्रूव्ह म्हणजे खाजणीचं जंगल म्हणतात. या जंगलाला एक आगळं – वेगळं गूढ सौदर्य प्राप्त झालेलं असतं. या जंगलात कांदळ, टिवर, बांजळ नावाची झाडे आढळतात. भरती – ओहोटीचं पाणी या जंगलात भरत – ओसरत असल्यामुळे त्यास भरती – ओहोतीचं जंगल किवा ‘टायडल फॉरेस्ट’ असंही म्हटलं जातं. पाणी व जंगलाचं हे सुंदर साहचर्य क्वचितच कुठे पाहायला मिळतं. झाडांच्या मुळांची टोके पाण्यावर आलेल्या तीक्ष्ण खिळ्यांसारखी दिसतात.

२) सूर्यास्ताबरोबरचे वातावरण व त्यामुळे निर्माण झालेली लेखकाची भावावस्था यांचं वर्णन करा.
उत्तर.  सूर्यास्ताबरोबर  तिथल्या वातावरणात विलक्षण गूढता निर्माण झाली. पाण्यावरची ती विलक्षण शांतता आणि अंद्भुत वृक्षांचा तो मेळावा, तिथे नांदणारे रहस्यमयी जीव, पाण्याचा रंग एखाद्या गुलजार पाख्याच्या पंखासारखा बहुरंगी. हे सगळं वातावरण पाहून लेखक देहभान हरपून गेला. जमेल तेव्हढं तो अवलोकन करीत होता. त्याला वाटत होतं की हे अलौकिक सौंदर्य पुन्हा कधी दिसणार नाही.

३. वनविभागात नोकरी मिळणे हे लेखक भाग्याचे लक्षण का समजतो ?
उत्तर.  ग्रंथांत आढळून येणार नाही, असं ज्ञान लेखकाला जंगलांतून प्राप्त झालं आहे. गुरुजनांकडून शिकता येणार नाही  ते वृक्ष व दगडांनी त्यांना शिकविलं. वृक्षांइतका धर्मात्मा दुसरा कोणी नाही, असे त्याचे मत. त्यांच्यापासून लेखकाला देवाचं अस्तित्व जाणवलं. मितव्ययी म्हणजे काय ते जंगलापासून लेखकाला शिकायला मिळालं. म्हणूनच वनविभागात नोकरी मिळणे हे लेखक भाग्याचे लक्षण समजतो.

भाषाभास:

वाक्यात येणाऱ्या वेगवेगळ्या शब्दांची वेगवेगळी कार्ये लक्षात घेऊन त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत. त्यांनाच शब्दजाती म्हणतात. शब्दांच्या आठ जाती. त्या सव्यय (विकारी) व अव्यय (अविकारी) अशा दोन प्रकारात मोडतात.

– नाम

क) खाली नामाचे उपप्रकार दिले आहेत. त्यापुढे त्या त्या उपप्रकारांचे प्रत्येकी चार शब्द लिहा.

१.  सामानन्यनाम

२.  विशेषनाम

३.  भाववाचकनाम

उत्तर      १. सामान्यनाम – मनुष्य, पर्वत, घर, रस्ता

२. विशेषनाम – महादेव, हिमालय, गंगा, म्हापसा

३. भाववाचकनाम – शौर्य, वक्तृत्व, गुलामगिरी, स्वातंत्र्य

ख) खालील तक्त्यातील रिकाम्या जागी सर्वनामे लिहा.

       एकवचन                                  अनेकवचन

_____                                          आम्ही

_____                                           तुम्ही

त्याने, तिला                                    __________

_________                                 जे, ज्या, जी

उत्तर   ‌
एकवचन                                अनेकवचन

मी                                          आम्ही

तू                                            तुम्ही

त्याने, तिला                            त्यांनी, त्यांना

जो , जी,  जे                              जे, ज्या, जी