वाक्यप्रचार :

जळफळात होणे – खूप राग येणे

प्रौढी मारणे – ऐट दाखविणे

डोक्यात प्रकाश पडणे – समजणे

डोक्याला हात लावणे – निराश होणे

अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) वेळणेश्वराजवळ कोणते दृश्य दिसते ?
उत्तर वेळणेश्वराजवळ फाट्यावर  वळले की निळशार समुद्र दिसतो. तसेच माडा पोफळीच्या राईत  लपलेली छोटी कौलारु घरं आणि वेळोबाच्या शिवमंदिराचा कळस दिसतो.

२) मुले का चकित झाली ?
उत्तर. मुले चकित झाली कारण चोरघडे सरांनी मुलांना कागद वाटले आणि कागद टेबलावर ठेऊन बाहेर पळायला सांगितले.

३) रमाला कोणता गोष्टीचा गर्व होता ?
उत्तर. रमाला आपल्या श्रीमंतीचा गर्व होता.

४) रमाने स्पर्धेसाठी  सुरभीचे नाव का दिले ?
उत्तर.  रमाने सुरभीची फजिती व्हावी म्हणून स्पर्धेसाठी सुरभीचे नाव दिले होते.

५)  दारावरची बेल वाजल्यानंतर रमाने काय केले ?
उत्तर.  दारावरची बेल  वाजल्यानंतर रमाने पारुला म्हटले ” पारूS , दार उघड. कोण आलं बघ कडमडायला !”

६) दगडाच्या परळामध्ये पाणी का भरुन ठेवले होते ?
उत्तर.  चिमणी, पाखरांनी ते पाणी पाण्यासाठी दगडाच्या परळामध्ये पाणी भरून ठेवले होते.

७) रमाला का वाईट वाटले ?
उत्तर.  बक्षीस आपल्याला मिळाले नाहीच आणि सुरभीची फजिती झाली नाही म्हणून रमाला वाईट वाटले.

(आ) खालील प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा वाक्यांत लिहा.

१) लिमये आणि चोरघडे सरांना सुरभीच्या घरचा कोणता अनुभव आला ?
उत्तर.  लिमये आणि चोरघडे सरांना सुरभीच्या आजीने स्वागत केले. सुरभीने त्यांना बसण्याकरिता चटई पसरली. गार पाण्याचा गडवा आणून पुढ्यात ठेवला . दारासमोर तुळशीवृंदावन होते. त्याच्या समोर छान साधीच रांगोळी घातली होती. दगडाच्या परळामध्ये पाखरांसाठी पाणी भरून ठेवले होते. त्यामुळे उन्हाळ्यातही पाखरांना व पक्ष्यांना पाणी मिळत होते. असा अनुभव किमये व चोरघडे सरांना सुरभीच्या घरी मिळाला.

२)  सुरभीच्या‌ घरी शिक्षकांनी काय पाहिले ?
उत्तर.   सुरभीच्या घरी गरिबी होती. पण ती माणसे मनाने श्रीमंत होती. रघुपतींच्या घरी त्याची बायको आजारी असल्याने पोळी भाजीचा डबा सुरभीच्या घरातून पाठवला जात होता. पण त्याची प्रोढी/ वाच्यता कोणीही करत नव्हता. आजीने तांदूळ निवडून झाल्यावर‌ तांदळाची मूठ भरून अंगणाच्या पलीकडे हिरकीवर टाकली. हे पाखरांसाठी दाणे होते. त्यानंतर सुरभीच्या आईने दोन्ही सरांना पन्हे आणून दिले व जाताना त्यांना आंब्याच्या रोवळ्या हि भेट वस्तू म्हणून दिल्या.

३) स्पर्धेचे पहिले बक्षीस सुरभीच्या घराला का मिळाले ?
उत्तर.  स्पर्धेचे पहिले बक्षीस सुरभीच्या घराला मिळाले कारण इतर सर्व घरांपेक्षा सुंदर घर सुरभीचेच होते. त्या घरांत आनंद, आधार, विश्वास आणि करुणा नांदत होती. पशुंपक्ष्यांसाठी प्रेम होतं. त्या घरांत निसर्गाची जपवणूक, जतनगीरी केली जात होती. असे दृश्य अन्य घरांमध्ये पहायला मिळाले नव्हते. घराचे घरपण म्हणजे केवळ सुंदरपणा नसून त्यात प्रेम, सद्भावना  असावी. पाहुण्याची उठ बस, प्राणी मात्रांवर प्रेम असावं. ह्या सर्व गोष्टी सुरभीच्या घरी होत्या त्यामुळे सुरभीच्या घराला पहिले बक्षीस मिळाले.

(इ)  खालील वाक्ये कोणी कोणास म्हटले ते लिहा.

१.  ” आज तुझ्यामुळे मला बक्षीस मिळाले “
उत्तर.   हे वाक्य सुरभीने रमाला म्हटले.

२. ” कागद टेबलावर ठेवा आणि पळा बाहेर.”
उत्तर.   हे वाक्य सरांनी मुलांना सांगितीले.

३. “विचार त्यांना काय काम आहे ?”
उत्तर.  हे वाक्य रमाने पारुला म्हटले.

भाषाभास :

विकारी शब्द (पूनरावर्तन)

मुलांनो, शब्द म्हणजे काय ? या शब्दांचे विकारी व अविकारी शब्द आणि या शब्दाचे उपप्रकार यांची आपण या पूर्वीच्या अभ्यासक्रमात नेहमीच माहिती घेत आलो आहोत.

असलेल्या माहितीचे उपयोजन (वापर) दिलेल्या सूचनांनुसार आपल्याला करावयाचे आहे. तेव्हा दिलेल्या सूचना लक्षपूर्वक वाचा आणि योग्य अशी उत्तरे लिहा.

क)  खाली नामाचे उपप्रकार दिले आहेत. त्यापुढे त्या त्या उपप्रकारांचे प्रत्येकी चार शब्द लिहा.

१)  सामान्यनाम

२)  विशेषनाम

३)  भाववाचकनाम

४)  समूहवाचकनाम

उत्तर  १)    मुलगा, शाळा, गाय, झाड

२)    मांडवी, पणजी, महेश, भारत

३)   आनंद, उत्तम, अहंकार, वाईट

४)   वर्ग, समिती, मोळी, ढिगारा

ख)  खालील तक्त्यातील रिकाम्या जागी सर्वनामे लिहा.

        एकवचन                       अनेकवचन

१.   मी                                    ___________

२.   __________                 तुम्ही, आपण

३.   __________                  ते, त्या, ती

४.   हा, ही, हे                           __________

५.    ___________                जे, ज्या, जी

 

उत्तर           एकवचन                    अनेकवचन

१.   मी                                    आम्ही

२.   तू                                     तुम्ही, आपण

३.    तो                                    ते, त्या, ती

४.   हा, ही, हे                          तो, ती, ते

५.   तो ते                                जे, ज्या, जी

(ग)  खालील वाक्यांतील विशेषणे ओळखा व बाजूला लिहा.

१. दर पंधरा दिवसांनी चोरघडे सर एखादी नवीन शक्कल शोधून काढत.

२. त्या डेरदार आंब्याच्या झाडावर शेंदरी आंबे लोंबत होते.

उत्तर     १. नवीन

२. डेरदार