प्रश्न :

(अ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१. खरे शिक्षण कधी मिळते असे साने गुरुजी सांगतात ?
उत्तर.  खरे शिक्षण प्रत्यक्ष उदाहरणाने मिळते असे साने गुरूजी सांगतात.

२. पानात गुंतवळ किंवा काही सापडल्यास ते इतरांना का दाखवू नये ?
उत्तर.  पानात गुंतवळ किंवा काही सापडल्यास ते इतरांना दाखवू नये कारण दुसऱ्यांना किळस येते.

३. पानाभोवती शिते सांडल्यास वडील काय म्हणत?
उत्तर.  पानाभोवती शिते सांडल्यास वडील म्हणतात एक कौबडं जेवेल इतकी शितं सांडली आहेत.

४. भाजी अळणी असतानाही वडिलांनी मीठ का मागितलं नाही ?
उत्तर.  भाजी अळणी असतानाही वडिलांनी मीठ मागितलं नाही कारण आईला संशय आला असता.

५. आईला कोणती रुखरुख लागली होती ?
उत्तर. आईला आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही. म्हणून तिला  रुखरुख लागली होती.

६.  भारतीय संस्कृती कशावर उभारलेली आहे ?
 उत्तर.  भारतीय संकृती संयम व समाधान यावर उभारलेली आहे.

 ७.  जेवणं कधी सुरू होत ?
 उत्तर.  वडील देवळात पूजा करून गणपतीचे तीर्थ आणत. ते सर्वांनी घेतले म्हणजे जेवणं सुरू होत.

 ८. आईने कसली भाजी केली होती ?
उत्तर.  आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती.

(ब)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी पाच – सहा वाक्यात लिहा.

१.   ‘कसे  जेवावे’ ह्याबद्दल श्यामाचे वडिलांची कोणती मते होती ?
उत्तर.  ‘कसे जेवावे’ ह्याबद्दल श्यामाचे वडिल नेहमी सांगायचे, “आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये. येईन तेव्हा घ्यावे. पंक्तीचे सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपल्यालाही मिळेल. हावरेपणा करू नये. शीतं पानाबहेर सांडू   नये , पानात काही टाकू नये, पानातील पदार्थावर‌ टीका करु नये, पानात गुंतवळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुसऱ्यास वर करून दाखवू नये.  कारण दुसऱ्यांना किळस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसे लख्ख करावे.

२. अळणी भाजी खाण्यामागे वडिलांची काय दृष्टी होती ?
उत्तर.  भाजी अळणी असतानाही वडिलांनी मीठ घेतले नाही कारण आईला संशय आला असता. आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केलेला, तो गोड करून खावा, त्यांत दोष पाहू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी होती.

३. साने गुरुजींनी आपला आईवडिलांना श्रेष्ट का मानले.
उत्तर.  दुसऱ्याचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजीही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ, अळणी कशी हातून झाली, का रे तुम्ही कोणी सांगितले नाहीत असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी, माझी आई श्रेष्ठ. दोघेही थोर व श्रेष्ठ. साने गरुजींनी आपला आईवडिलांना श्रेष्ठ मानले कारण जसे हिंदू संस्कृती संयम व समाधान यावर उभारलेली आहे. त्याचप्रमाणे कार्यकुशलतेवरही  उभारलेली आहे, आणि हे दोन्ही धडे गुरुजींचे आई – वडील त्यांना देत होते.

४. आपली मोठी चूक झाली असे आईला का वाटले ?
उत्तर.  आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले कारण जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यायला तो चांगला करून द्यावा. मग ती भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही. हे बरे झाले नाही असे आईला वाटले.

 व्यवसाय :

 ‌(अ)   खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.

१  “आपला पानाकडे पाहून जेवावे.”
उत्तर.  श्यामच्या वडिलाने श्यामला सांगितले.

२. “एक कोंबडं जेवेल इतकी शितं सांडली आहे.”
उत्तर.  श्यामच्या वडिलाने श्यामाला म्हटले.

३.   “तुला नाही का रे आवडली भाजी.”
उत्तर.  आईने श्यामला विचारले.

४. “तो आता इंग्रजी शिकायला लागला ना.”
उत्तर. वडील आईला म्हणाले.

५. “असं नाही काही.”
उत्तर. श्यामने वडिलांना म्हटले.

६. “आणवा. पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही.”
उत्तर.  आई वडिलांना म्हणाली.

७. “काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही.”
उत्तर. आईने श्यामला म्हटले.

(ब) रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१. _______ ही मुकेपणाने बोलते.

२. कसे जेवावे याचीसूध्दा आपल्याकडे _______ आहे.

३. पानातील पदार्थावर ________ करु नये.

४. दुसऱ्यांना ______ येते.

५. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, _________.

६. वडील येताना _________ आणत.

७. आईने ________ पाल्याची भाजी केली होती.

८. ती करी ते सारेच _________ लागे.

९. जणू तिच्या हातात _______ होती.

१०. तिला ________ लागली.

उत्तर    (१)   कृती

(२)   संस्कृती

(३)   टीका

(४)   किळस

(५)   राजमान्य

(६)   गणपती तीर्थ

(७)  रताळीच्या

(८)   गोड

(९)   पाकदेवताच

(१०)  रुखरुख

भाषाभास

(अ) खालील शब्दांपुढे रिकाम्या जागी विरुध्दलिंगी शब्द लिहा.

            स्त्रीलिंग                       ‌          पुल्लिंग

विद्यार्थिनी                            विद्यार्थी

सासू                                       सासरा

काकी                                      काका

वधू                                          वर

भावजय                                भाऊ

मादी                                      नर

गवळीण                                  गवळी

शेळी                                   बोकडा

जाऊ                                     दीर

नायीका                                नायक

‌‌                     लांडोर                                   मोर

सांडणी                                  उंट