प्रश्न :

(अ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१. जंगलात दुःखाची छाया का पसरली ?
उत्तर. एके दिवशी सिंहराजा मरण पावला म्हणून जंगलात दुःखाची छाया का पसरली.

२. हत्तीने मुंग्यांना कोणती अट घातली ?
उत्तर.  हत्तीने मुंग्यांना अशी अट घातली कि जर तुम्ही हरलात, तर मी तुमच्या घराचे तुकडे तुकडे करीन आणि तुम्हाला राज्याबाहेर घालवीन.

३. सिंह राजा सर्वांना का आवडायचा ?
उत्तर.  सिंह राजा दयाळू आणि न्यायी असल्यामुळे सर्वांना तो खूप खूप आवडायचा.

४.   नवीन राजा कोण झाला ?
उत्तर.  राज्याची शिस्त धाब्यावर बसवून हत्ती राजा झाला.

५.   हत्तीराजाचा रथ कुठे येत होता ?
उत्तर.   हत्तीराजाचा रथ वाजत गाजत जंगलनगरीत येत होता.

(ब) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन चार वाक्यांत लिहा.

१. सिंहराजाच्या मृत्यूचा जंगलातील  प्राण्यांवर काय परिणाम झाला ?
उत्तर.  जंगलराज्यातील सर्व काही व्यवस्थित चालू असताना एके दिवशी सिंहराजा मरण पावला. सिंहराजाच्या मृत्यूचा जंगलातील प्राण्यांवर असा परिणाम झाला कि सगळीकडे दुःखाची छाया पसरली. पक्ष्यांनी आपले सकाळचे गाणे बंद केले. सशांनी फिरायचे सोडून दिले. वाघही डरकाळ्या मारताना दिसला नाही.

२. हत्तीचे महाद्वारात कसे स्वागत झाले ?
उत्तर.  हत्तीचा रथ  महाद्वारात येताच गाढवांनी सोळा तोफांची सलामी दिली. मनीताईने सौभाग्य – टिळा लावला. हत्तीणबाईंने पाय धुतले आणि हत्तीने वाजतगाजत जंगलाचा राजा म्हणून जंगलाच्या राजधानीत प्रवेश केला.

३.   मुंग्या पावसाळ्यासाठी बेगमी कशी करत होत्या ?
उत्तर.  मुंग्या पावसाळ्यासाठी बेगमी करण्याकरिता जंगलातील मुंग्यांची रात्रंदिवस मेहनत चालली होती. काही मुंग्या पावसाळ्यातील पाण्यापासून रक्षण व्हावे म्हणून वरुळ्याची डागडुजी करीत होत्या. काही धान्या साठवून आणून ठेवीत होत्या.

४. हत्तीच्या लक्षात शेवटपर्यंत कोणती गोष्ट आली नाही ?
उत्तर.  खरे तर हत्तीबरोबर एकच मुंगी धावत नव्हती. प्रत्येक ठिकाणी मुंग्या ह्या असायच्याच. परंतु गर्विष्ठपणामुळे हत्ती हे ओळखू शकला नाही, तो जेव्हा जेव्हा खाली बघायचा तेव्हा तेव्हा त्याला मुंगी दिसायची आणि तो धावतच राहायचा. पण प्रत्येकवेळी वेगळी मुंगी असायची. हत्तीला हि गोष्ट शेवटपर्यंत लक्षात आली नाही.

५. हत्ती धावत असताना सर्वांना नवल का वाटले ?
उत्तर‌. हत्ती खूपच थकत चालला होता. परंतु मुंगी आपल्याबरोबर धावते आहे, याचा त्याला खूप राग आला. आता तर धावता धावता तो मोठमोठ्याने चित्कारु लागला. त्याच्या त्या आवाजामुळे जंगलात एकच कोलाहल माजला. सर्व प्राणी त्या ठिकाणी जमेल. मुंगीबरोबर हत्ती  धावूच शकत नाही, याचे सर्वांना नवल वाटले.

६. जंगलात कसली पळापळ सुरु झाली ?
उत्तर.  सिंहाच्या मरणानंतर सर्वजण दुःखात बुडले होते, पण मग हळूहळू जंगलातील दुःखाची छाया कमी कमी होऊ लागली. दहा पंधरा दिवस असेच गेले आणि नवीन राजाच्या निवडीचे वेध सगळ्यांना लागले. रात्री अपरात्री बैठका गाजू लागल्या. सभासदांची पळापळ सुरु झाली.

७. हत्तीने मुंग्यांबरोबर कसली शर्यत लावली ?
उत्तर.  मुंगी हत्तीला म्हणाली “महाराज, आम्ही लहान म्हणून आमची हेटाळणी करू नका. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे असाल. सशक्त असाल. परंतु तुम्ही आमच्याइतके पळू शकणार नाही. “हे ऐकल्यावर हत्तीराजा जास्त खवळला, व म्हणाला “क्षुद्र कीटकांनो, तुम्ही माझ्याबरोबर पळू शकाल काय ? माझ्या एका पावलाचे अंतर तोडण्यास तुम्हाला कितीतरी वेळ लागेल.” असे सांगून हत्तीने मुंग्यांबरोबर पळण्याची शर्यत लावली.

(अ)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी पाच – सहा वाक्यांत लिहा.

१. हत्तीराजाच्या स्वागताची तयारी कशी करण्यात आली ?
उत्तर. जागोजागी कमानी उभा केल्या. तोरणे – पताका लावल्या. कोल्हीणबाईने ठिकठिकाणी रांगोळी काढली. मुख्य प्रवेशद्वारावर कोकिळा सनईवादन करु लागली. उंट जोरजोराने ढोल बडवीत उभा राहिला. मनीताई गुलाबी साडी नेसून हातात पंचारती घेऊन प्रवेशद्वारावर उभ्याच होत्या. काही माकडे गुलाल उधळीत होती. रथ कलापूर्ण रीतीने सजविण्यात आला होता. अशाप्रकारे हत्तीराजाच्या स्वागतची तयारी करण्यात आली.

२. राजा झाल्यावर हत्तीच्या वागण्यात कोणता बदल झाला ?
उत्तर.  सिंह राजा मरण पाऊला म्हणून हत्तीला राजा बनविण्यात आले होते. हत्तीने राज्याचे कारभार सुरू केले. पण काही दिवसातच हत्तीराजाचे आपल्या प्रजेशी वागणे एकदम बदलले. तो क्रूर झाला. त्याची सर्वांना भीती वाटू लागली. हत्तीराजा फारच गर्विष्ठ बनला. राजा झाल्यापासून त्याची जाडीही भलतीच वाढली. आपले सुळे वाटेल तेथे चालवण्यास तो मागेपुढे पाहत नव्हता.

३. हत्तीराजा कसा मेला ?
उत्तर.  हत्तीराजाने मुंगीशी पळण्याची शर्यत लावली. शर्यत सुरू झाली होती. हत्ती रागेरागे धावत होता. त्याचा पायातून कळा येऊ लागल्या. परंतु पळताना आपल्याबरोबर मुंगी पळत असल्याचे पाहून तो तसाच पळू लागला. त्याच्या डोक्याला व अंगाला दरदरून घाम आला. डोक्याचा घाम डोळ्यांत जाऊन हत्तीला समोरचे काहीच दिसेनासे झाले. पळता पळता हत्तीराजा खड्ड्यात पडून मेला.

व्यवसाय :

(अ) खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.

१. “हे क्षुद्र कीटकांनो, केवळ माझ्या लाथेने तुमच्या या घराचे तुकडे करून टाकीन.”
उत्तर.  हत्तीराजा मुंग्यांना म्हणाला.

२.  “महाराज, आमी लहान आणि क्षुद्र असू. पण आम्ही निरुपयोगी मात्र नाही.”
उत्तर.  एक मुंगी हत्तीराजाला म्हणाली.

३. “तुम्ही काही कामाच्या नाहीत.”
उत्तर.  हत्ती मुंग्यांना म्हणाला.

४. “आपण पळण्याची शर्यत लावू.”
उत्तर.  हत्तीने मुंग्यांना म्हटले.

५. “जरूर महाराज, विलंब कशाला ? आपण पाहूयाच.”
उत्तर.  एक मुंगी हत्तीला म्हणाली.

६. “तू  माझ्याबरोबर पळत आहेस.”
उत्तर.  हत्ती मुंगीला म्हणाला.

(ब) रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१. सिंह हा त्या जंगलाचा __________ होता.

२. वाघ तर त्याच्या _________ खुश असायचा.

३. संगळीकडे ___________ छाया पसरली.

४. सशांनी _______ सोडून दिले.

५. ‌ रात्री अपरात्री ________ गाजू लागल्या.

६. अखेर _________ दिवस उगवला.

७. नव्या हत्तीराजाची भव्य __________ निघाली.

८. हत्तीराजाच्या रथाचा सारर्थी _________ असावा.

९. हातच्या काकणाला ________ कशाला ?

१०. पळत पळत तो ________ पडून मेला.

 उत्तर   १. ‌ राजा

‌‌       २.  राज्यकारभारावर

३. दु:खाची

४.   फिरायचे

५.   बैठक

६.    निवडीचा

७.   मिरवणूक

८.   वाघ

‌९.   आरशा

१०.  खड्ड्यात

भाषाभास :

विशेषणे :- जोडीतील दुसऱ्या शब्दाविषयी ते अधिक माहिती देतात.

उदा :   गर्विष्ठ  हत्ती

दयाळू राजा

गुलाबी थंडी

क्षुद्र कीटक

शूर शिपाई

(अ) पुढील वाक्यांतील विशेषणे  ओळखा.

१. वैशाख म्हणजे रणरणते ऊन.

२. धारोष्ण दूध पौष्टिक असते.

३. कंस‌ क्रूर होता.

४. तिने दोन निळ्या नोटा त्याच्या अंगावर भिरकावल्या.

५. कर्तबगार माणसेच मोठी कामे करु शकतात.

(ब) ‌ खालील शब्दांच्या विरूद्ध अर्थी शब्द लिहा.

शहाणा               ×              मूर्ख

अतृप्त                ×              तृप्त

स्वस्त               ×               महाग

जबाबदार            ×              बेजबाबदार

अंधार                  ×            प्रकाश

अनाकलन          ×            आकलन

खरे                    ×             खोटे

अवघड                ×             सोपे

पाप                   ×            पुण्य

सुबोध                   ×              दुर्बोध

प्रामाणिक             ×              लबाड

हजर                  ×            गैरहजर

ज्ञान                   ×            अज्ञान

गरीब                    ×              श्रीमंत