शब्दार्थ :

गौरव – सन्मान. (honour, laurel)

प्रश्न :

(अ) खालील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात लिहा :

१) ‘शब्दधन’ ह्या कवितेत संत तुकारामांनी काय सांगितले आहे ?
उत्तर. ‘शब्दधन’ ह्या कवितेत संत तुकारामांनी शब्दांचे म्हत्वत सांगितले आहे.

२) संत तुकारामाजवळ कोणती रत्ने आहेत ?
उत्तर. संत तुकारामाजवळ शब्दाची रत्ने आहेत.

(आ) खालील प्रश्नांचे उत्तर पाच ते सहा वाक्यांत लिहा.

१) संत तुकारामांनी शब्दांचे महत्व कसे स्पष्ट केले आहे ?
उत्तर.  संत तुकाराम म्हणतात, की शब्द हेच आमच्या घरचं धन आहे, तीच आमची रत्ने आहेत आणि त्याच शब्दांचा उपयोग शस्त्र म्हणून आम्ही केला पाहिजे. शब्द हे आमच्या जिवांचे जीवन आहे, आणि हे शब्दधनच आम्ही लोकांत वाटणार आहोत. शब्द हा जणू परमेश्वरच आहे, त्यामुळे शब्द जपून वापरावा. शब्दाची सन्मानाने पूजा करावी.

(इ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१) आम्हां घरीं _______ शब्दाचीच रत्ने.

२) शब्दचि आमुच्या जीवांचे _________.

३) तुका म्हणे पाहा शब्दचि  हा ________.

४) शब्देंचि _______ पूजा करूं.

उत्तर  १) धन

२) जीवन

३) देव

४) गौरव