प्रश्न :

(अ) खालील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात लिहा :

१. देव कोणती लीला पाहत होते?
उत्तर. – देव श्रीकृष्ण बाळगोपाळांबरोबर बसून भोजन करताना प्रेमाने एकमेकांना दहीभात भरवीत असतानाचा सोहळा पाहत होते.

(आ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन ते चार वाक्यांत लिहा :

१) गोपाळ कुंजवनात कोणते खेळ खेळत होते?
उत्तर. – गोपाळ कुंजवणात श्रीकृष्ण समवेत नाना तऱ्हचे  खेळ खेळताना एकमेकांच्या मस्तकी झाडाच्या पालवीचे तुरे खोवीत होते. सुंदर फुलांचे दिव्यहार घालीत होते. स्वतःच्या कौशल्याने तयार केलेल्या गुंज माळा गळ्यात घालून मधुर गीत गात होते. मस्तकी मोरपिसे बांधून, शरीरावर चित्रविचित्र चित्रे रेखाटून खेळत बागडत होते.

२) श्रीकृष्ण व गोपाळ यांनी कशाप्रकारे भोजन केले?
उत्तर. – कुंजवनी खेळ खेळून गाई-वासरांना आणि पाणी प्यायला सोडून  श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे सर्व बालगोपाळ भोजनाला बसले, मध्ये श्रीकृष्ण बसले होते. सर्व बाळगोपाळ हसत-खेळत भोजन करत असताना ते एकमेकांच्या मुखी प्रेमाने दहीभात भरवत होते. प्रीतीभोजनाचा हा सोहळा स्वर्गातून देवदेखील पाहत होते.

(इ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा :

१) वनीं खेळती बाळ ते _______ .

२) गळां घालिती ते करीती _______ .

३) शरीरावरी रेखिती ________ .

४) तया पाजुनीया, म्हणे ________ .

५) दही-भात दे, _______ पहाती.

उत्तर : (१) बल्लवांचे

(२) तनाना

(३) दिव्यचित्रे

(४) चक्रपाणी

(५) देवलीला