प्रश्न :

(अ)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एक वाक्यात लिहाः

१.  श्रावण महिन्यात कोणकोणते सण येतात ?
उत्तर. श्रावण महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुऴाष्टमी हे सण येतात.

२.  दीपावली आपल्याला कोणता संदेश देते ?
उत्तर.  दीपावली आपल्याला घर प्रकाशमय करा व चांगल्याचे स्वागत करा असे संदेश देते.

३.  नववर्षाचे स्वागत आपण कसे करतो ?
उत्तर . घरोघरी गुढ्या – तोरणे उभारुन भारतीय नववर्षाचे स्वागत केले जाते.
        वा
उत्तर. नववर्षाचे स्वागत आपण घरोघरी गुढ्या – तोरणे उभारुन करतो.

४.  तामीळनाडूत कुठला सण साजरा केला जातो ?
उत्तर. तामीळनाडूत ‘पोंगल’ हा सण साजरा केला जातो.

५.  ज्येष्ठ महिन्यात कोण कोणत्या फळांना बहर आलेली असते
उत्तर. ज्येष्ठ महिन्यात आंबे, फणस, काजू, करवंदे, जांभळे यासारख्या मधुर फळांना बहर आलेली असते.

६.  ऋतुचक्र आम्हाला कसे आनंद देत राहतात ?
उत्तर. ऋतुचक्र अखंड फिरत राहते आणि त्याचबरोबर येणारे सणही आम्हाला आनंद देत राहतात.

(ब)  खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यांत लिहा

१.  या पाठात श्रावण महिन्याचे वर्णन कसे केले आहे ?
उत्तर. या पाठात श्रावण महिन्याचे असे वर्णन केले आहे कि श्रावण महिना सुरु झाल्यावर, याच महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी सण येतात. ‘निसर्गाशी मैत्री करा, बंधुभावाने वागा, दुष्टांचा नाश करा’ असेच ते आम्हाला सांगत असतात.

२. शरदऋतूमघ्ये वातावरणात कोणता बदल होतो ?
उत्तर. शरदऋतूमध्ये सारे वातावरण कसे प्रसन्न बनते. झाडे पाना – फुलांनी बहरुन जातात. शेते डोलू लागतात.

३.  ‘दीपावली’ व ‘नातळा’ हे सण कोणती शिकवण देतात ?
उत्तर. दीपावलीला नरकासुराचा वध करुन स्नान केले जाते व आनंदाने सर्वत्र दिव्यांची आरास केली जाते. तर ‘नाताळ’ हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा सण आनंदाने साजरा केला जातो. ‘घर प्रकाशमय करा व चांगल्याचे स्वागत करा’ असे ‘दीपावली’ व ‘नातळ’ हे सण शिकवण देतात.

४. आश्विनमासात सण कसे साजरा केले जातात ?
उत्तर. आश्विनमासात गोव्यात तसेस महाराष्ट्रात नवरात्र, कर्नाटकात ‘विजयादशमी’, बंगालात ‘दुर्गापूजा’ तर केरळमध्ये ‘ओणम’ हे सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात. ‘अनिष्ट गोष्टी नष्ट करा’ असा संदेश हे सण आपल्याला देतात. याच सुमारास मुसलमान बांधव मोठ्या उत्साहाने ‘मोहरम’ हा सण साजरा करतात.

५.  शेतकऱ्यांच्या मनाला कोण सुखावत असते ?
उत्तर. चैत्र संपता संपता उन्हाळा सुरू होतो. वैशाखातील उन्हाचे चटके सहन करीत. शेतकरी आपल्या कामाला सुरुवात करतो. ग्रीष्मऋतूतील या कडक उन्हाळ्यातही दक्षिणेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची झुळूक शेतकऱ्यांच्या मनाला सुखावत असते.

६.  मुग्धा श्रावण महिन्या बद्दल कुठली कविता गात आहे ?
उत्तर. “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे।” अशी कविता मुग्धा श्रावण महिन्या बद्दल गात आहे. ह्याचा अर्थ असा कि बाहेर ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरु होता. आषाढातील पावसाच्या सरींनी धरती हिरवीगार झाली होती. जणू ती हिरवा शालू नेसून वर्षाऋतूच्या स्वागतास सज्ज झाली होती.

व्यवसाय :

(अ)  रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१.   भाद्रपद संपतो आणि _______ सुरुवात होते.

२.   ‘ दसरा सण मोठा।  नाही _______ तोटा.

३.   ________ गोष्टी नष्ट करा.

४.   दीपावलीच्या स्वागताला सारे _______  होतात.

५.   त्यानंतर पौष महिन्यात ________ येते.

६.   तामीळनाडूत याच सुमारास _________ सण साजरा केला जातो.

७.   झाडांची पाने गळून पडतात व नवीन ________ फुटू लागते.

८.    _________ कुहू कुहू गात वसंतऋतूचे स्वागत करतो.

९.   चैत्र महिन्याने _________ सुरुवात होते.

१०.  चैत्राला पहिला दिवस म्हणजेच _________.

११.   वैशाखातील उन्हाचे ________  सहन करीत शेतकरी आपल्या कामाला सुरुवात करतो.

उत्तर १.  शरदऋतूला

२.  आनंद

३.   अनिष्ट

४.    सज्ज

५.    मकरसंक्रांत

‌   ६ . ‌  पोंगल

७.    पालवी

८.    कोकिळ

९.    ‌नववर्षाची

१०.    गुढीपाडवा

११.   चटके

(ब)  खालील दिलेल्या महिन्यातले सण लिहाः

                   महिना

 

                   सण
श्रावण  
भाद्रपद  
आश्विन  
कार्तिक  
पौष  
फाल्गुन  
 चैत्र  

उत्तर

                  महिना

 

                          सण
श्रावण नागपंचमी, नारळी पौर्णिमा. गोकुळाष्टमी
भाद्रपद गणेश चतूर्थी
आश्विन नवरात्र, विजयादशमी, दुर्गापूजा, ओणम, मोहरम
कार्तिक दीपावली, नाताळ
पौष मकरसंक्रांत, पोंगल
फाल्गुन होळी
चैत्र गुढीपाडवा

(क)  खालील दिलेले सण आम्हाला कुठले संदेश देतात ते लिहा

                     सण                        संदेश
श्रावण –  ” निसर्गाशी मैत्री करा, बंधुभावने वागा, दुष्टांचा नाश करा “
कार्तिक –  ” घर प्रकाशमय करा व चांगल्यांचे स्वागत करा “
पौष –   ” शत्रुत्व विसरुन स्नेह वाढवा “
आश्विन –  “अनिष्ट गोष्टी नष्ट करा “

(ड)  खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी समानार्थी शब्द वापरा व वाक्ये पुन्हा लिहा.

१.  प्रत्येकाने आपले शहर स्वच्छ ठेवावे.
 प्रत्येकाने आपले नगर स्वच्छ ठेवावे.

२.  जॉनचे गाव डोंगराच्या कुशीत होते.
–  जॉनचे ग्राम डोंगराच्या कुशीत होते.

३.  सर्प हा शेतकऱ्याचा मित्र आहे,
–  साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे.

४.  चोरीची वार्ता हा हा म्हणता गावात पसरली.
 चोरीची बातमी हा हा म्हणता गावात पसरली.

५.  आकाशात मेघ जमा झाले होते.
 आकाशात ढग जमा झाले होते.