व्यवसाय :

(अ)  रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहाः

१.  मजेत फिरती ______ चार.

२.  तिची शेपटी ______ .

३.  जसा उभा कोणी _______.

४.  शुभ्र दुधाची _______ धार .

५.  ऊन कोवळे हे ________ .

६.  सोन्याचे झाले ________ .

उत्तर  (१)   बदके

(२)    झुपकेदार

(३)    सरदार

(४)    झिरपे

(५)    हळुवार

(६)    घरदार

प्रश्न:

(आ)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१.  कविच्या मते तळ्यात पाणी कसे आहे ?
उत्तर. कविच्या मते तळ्यात पाणी हिरवेगार आहे.

२.  कविच्या मते तळ्यात कोण फिरत आहे ?
उत्तर. कविच्या मते तळ्यात चार बदके मजेत फिरत आहे.

३.  इकडून तिकडे कोण पळत आहे ?
उत्तर.  इकडून तिकडे खार पळत आहे.

४.  तळ्याच्या काठी कुठले झाड आहे ?
उत्तर. तळ्याच्या काठी पिंपळाचे झाड आहे.

५.  कडाच्या पलिकडे काय आहे ?
उत्तर.  कडाच्या पलिकडे काळेख आहे.

६.  कविच्या मते घर कसे सोन्याचे झाले ?
उत्तर.  तळ्याकडे ऊन कोवळे असल्यामुळे कवि म्हणतो कि घर सोन्याचे झाले.