खाली प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१.   पंकज व बाबा यांचे स्वागत कोणी केले ?
उत्तर.
   पंकज व बाबा यांचे स्वागत रखवालदाराने केले.

२.  पंकज व बाबा यांचे स्वागत रखवालदाराने कसे केले ?
उत्तर.
  “या, नमस्कार” असे सांगून रखवादाराने पंकज व बाबांचे स्वागत केले.

३.  बाबांनी  मालकांना काय सांगितले ?
उत्तर. 
“आम्हला काही रोपटी खरेदी करावयाची आहेत आणि रोपवाटिकाही पाहावयाची आहे” असे बाबांनी मालकांना सांगितले.

४.  पंकजने कोणती फुलझाडे खरेदी केली ?
उत्तर.
  पंकजने काही गुलाबाच्या व जास्वंदीच्या कुंड्या खरेदी केल्या.

५.  पंकजला कोणत्यां गोष्टीचे नवल वाटले ?
उत्तर. 
चिकू, लिंबू व पेरु या छोट्या छोट्या रोपट्यांवर आलेली मोठी फळॆ पाहून पंकजला नवल वाटले.

६.  खळूने पंकज व बाबांना प्रथम कुठे नेले ?
उत्तर.
  खळूने पंकज व बाबांना प्रथम गुलाबाच्या कुंड्यांकडे नेले.

७.   रोपवाटिका पाहून पंकजने काय करायचे ठरविले ?
उत्तर.
  रोपवाटिका पाहून पंकजने खूप झाडे लावून आपली बाग सजवावी असे ठरविले.

८. माती भुसभुशीत कशी राहाते ?
उत्तर. 
मातीत रेती व सुके शेण मिसळल्यामुळे माती भुसभुशीत राहते.

९.  पंकजला आनंद का जाला ?
उत्तर
. रोपट्यांवरील रंगीबेरंगी गुलाब पाहून पंकजला आनंद झाला.

१०.  आंब्यांच्या कोणत्याही पाच जातींची नावे लिहा .
उत्तर.
  माणकुराद, हापूस, जमादार, तोतापुरी, बारामासी अशी आंब्यांच्या जातींची नावे आहेत.

(ब) खालील प्रश्नांची प्रत्येकी तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा.

१.  खळूने माडाच्या रोपांबद्दल कोणती माहिती सांगितली ?
उत्तर
.  खळूने माडाच्या रोपांबद्दल असे सांगितले की काही रोपांना चार वर्षात फळं  येतात. यांची फळं लहान असली  तरी पीक भरपूर असतं. झाडही उंच वाढत नाहीत. काही सात-आठ वर्षात फळं देतात. त्यांची फळं मोठी व रुचकरही असतात. त्या झाडांचं आयुष्य भरपूर असतं.

२. कामगार कोणकोणती कामे करीत होते ?
उत्तर.
काही कामगार खणत होते, काहीजण मातीत रेती व सुके शेण मिसळत होते. कुंड्यांत व प्लॅस्टीक पिशवीत रेती मिश्रित माती भरत होते. काही झारीतील पाण्याने कुंड्या शिंपीत होते तर काहीजण कलमे तयार करीत होते.

३.  रोप लावायच्या मातीत रेती व सुके शेण का मिसळतात ?
उत्तर.
रोप लावायच्या मातीत रेती व सुके शेण मिसळल्यामुळे माती भुसभुशीत राहते. त्यामुळे मुळांची वाढ जलद व सहज होते.

४. कलम कसे तयार करतात ?
उत्तर.
  फळे, फुले चांगली व लवकर मिळवीत म्हणून चांगल्या जातीच्या झाडाची फांदी साध्या रोपावर बांधतात. त्यामुळे चांगल्या जातीचे रोप तयार होते. यालाच  कलम करणे असे म्हणतात.

५.  पंकज व बाबा यांनी रोपवाटिकेत काय काय पाहिले ह्याचे थोडक्यात वर्णन करा.
उत्तर.
  पंकज व बाबा रोपटी खरेदी करायला व रोपवाटिका पाहावयाला रोपवाटिकेत गेले होते.  तिथे त्यांनी रंगीबेरंगी गुलाबांची व जास्वंदीच्या कुंडया, नारळाच्या रोपट्या, चिकू, लिंबू, पेरु यांची रोपे, आंब्यांची रोपे पाहिले. इतकेच नव्हे तर माती कशी भुसभुशीत करतात व कलम कशे करतात हे पाहिले.

  व्यवसाय :

(अ)  खाली दिलेल्या वाक्यांच्या समोरील कंसातील योग्य शब्द निवडून वाक्ये पूर्ण करुन लिहा.

१.   मातीत रेती मिसळली की मातीत _______ राहते.
(खडखडीत, सुळसुळीत, भुसभुशीत)

२. ‌ दुपारी _________ उन्हातून गणेश घरी गेला.
(चकचकीत, रखरखीत, सणसणीत)

३.  रामभाऊ नेहमी _________ आवाजत प्रभावी भाषण करतात.
(मिळमिळीत, खणखणीत, किरकिरीत)

४.  रस्ता _________ असल्यामुळे विनू घसरुन पडला.
(खडखडीत, बुळबुळीत, दलदलीत)

५.  सोन्याचे ________  दागिने पाहून मुलींना आनंद झाला.
(फटफटीत, झिरझिरी, चकचकीत)

६. रमेश आज ________ जेवण जेवल्यामुळे त्याच्या डोळ्यांतून पाणी आले.
(मिळमिळत, चमचमीत, झणझणीत)

उत्तर  (१) भुसभुशीत
(२) सणसणीत
(३) खणखणीत
(४) बुळबुळीत
(५) चकचकीत
(ब)  रिकाम्या जागी पाठीतील योग्य शब्द लिहा.

१.   प्रथम ते ________ कुंड्यांकडे आले.
(जास्वंदीच्या, आंब्यांच्या, गुलाबाच्या)

२.  त्याने ________ रोप घेण्याचा बाबांना आग्रह केला.
(गुलाबाचे, पेरुचे, लिंबूचे)

३. ‌ एक कामगार _______पाण्याने त्यांना शिंपीत होता.
(झरीतील, नळातील, पाइपातील)

४.  पंकजला ________ पाहून समाधान वाटले.
(रोपे, कलम करणे, रोपवाटिका)

५.  पंकज व त्याचे बाबा _________ आत आले.
(कार्यालयातून, फाटकातून, गुलाबाच्या कुंडंयाकडून)

उत्तर  (१)  गुलाबाच्या
(२) पेरुचे
(३) झरीतील
(४) रोपवाटिका
(५) फाटकातून

(क)  खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.

१.  “आम्हाला काही रोपटी खरेदी करावयाची आहेत आणि रोपवाटिकाही पहावयाची आहे.”
उत्तर
. पंकजच्या बाबाने मालकला म्हटले.”

२.  ” या , नमस्कार ”
उत्तर.
  रखवालदाराने पंकज व त्याच्या बाबाना म्हटले.

३.  “खळू, आम्हाला नारळाची रोपटी दाखव ना !”
उत्तर.
  बाबाने खळूला म्हटले.

४.  “ते मातीत रेती का मिसळतात हो?”
 उत्तर. 
पंकजने खळूला विचारले.

५.  “काय करतात हो?
उत्तर. पंकजने खळूला विचारले.