प्रश्न :

खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१. आजीने अलाहाबादला येण्याचा हट्ट का धरला ?
उत्तर – आजीला त्रिवेणी संगमावर स्नान करायचं होतं व काशीला जायचं होतं म्हणून आजीने अलाहाबादला येण्याचा हट्ट धरला.

२. आजीचा दोनदा निरोप मिळूनही लेखक घरी का गेला नाही?
उत्तर – लेखक अभ्यासात गुंतलेला म्हणून आजीचा दोनदा निरोप मिळूनही लेखक घरी गेला नाही.

३. ‘तुझ्या घरी लेकी कोण, सुना कोण हे ओळखणे कठीण’ असे लेखक का म्हणतो ?
उत्तर – आजीने सुनांवर पंचवीस वर्षे आपल्या सहवासात लेकीप्रमाणे प्रेम केले म्हणून तिच्या घरी लेकी कोण, सुना कोण हे ओळखणे कठीण असे लेखक म्हणतो.

४. लेखकाला घरून अचानक कोणता निरोप आला?
उत्तर  – ‘आई अत्यवस्थ आहे, ताबडतोब या’ असा निरोप लेखकाला घराकडून अचानक आला.

५. लेखक बी. ए. ची परिक्षा कुठून देणार आहे ?
उत्तर – लेखक बी. ए. ची परिक्षा मार्चमध्ये अलाहाबादला जाऊन देणार आहे.

६. लेखकाच्या नाव काय आहे ?
उत्तर – लेखकाच्या वडिलांचे नाव दत्ता आहे ?

७. दत्ता बी. ए. पास होऊन किती वर्षे झाली ?
उत्तर – दत्ता बी. ए. पास होऊन वर्षे “अठरा वर्षे” झाली.

८. लेखकाचे मित्र आजीला कसे ओळखत होते ?
उत्तर – लेखकाचे मित्र किती तरी गुरुवारी घरी येऊन आजीच्या हातची भाजी खावून गेले होते म्हणून लेखकाचे मित्र आजीला ओळखत होते.

९. लेखक आजीच्या अस्थी घेऊन कुठे गेला?
उत्तर – लेखक आजीच्या अस्थी घेऊन अलाहाबादला गेला.

१०. लेखकाने आजीच्या अस्थी कुठे विसर्जित केल्या ?
उत्तर – संगमावर जाऊन मावळत्या सूर्याकडे पाहत लेखकाने आजीच्या अस्थी गंगायमुनासरस्वतींच्या प्रेमसंगमात अर्पण केल्या.

(ब) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत लिहा.

१. ‘तू अठरा वर्षाइतका श्वास सोडलास आणि पुटपुटलीस’ असे म्हणून लेखकाला काय सुचवायचे आहे ?
उत्तर – आजीला आपला नातू बी. ए झालेला पहायचे  होते, कारण दत्ता बी.ए. पास होऊन अठरा  वर्षे झाले होती. त्यावेळी त्यांनी साऱ्या गावाला पेढे वाटले होते. दीडशे माणसे जेवून गेली. मोतीचूर केला होता. आजीला अठरा वर्षानंतर असाच बेत करावासा वाटला असेल.

२. आजीला आपल्या बरोबर अलाहाबादला न्यायला लेखक प्रथम का तयार नव्हता ?
उत्तर – लेखका बरोबर पंचवीस तीस मुले तेथे घर घेणार,  दाटीने कसे तरी पंधरा दिवस राहणार. आजीची तेथे कशी सोय होईल ? शिवाय मुले आपल्याला हसतील. ह्या विचारांमुळे लेखक आपल्या बरोबर आजीला अलाहाबादला न्यायला प्रथम तयार नव्हता.

३. कधी न रडणारा  लेखक का रडू लागला ?
उत्तर – लेखक आजीच्या शेजारी बसला. तीचे ओठ किंचित हल्ले. डोळे लेखकाकडे फिरले. आजी लेखकाबरोबर अलाहाबादला जाणार होती पण अशी आधीमधीच आपल्याला सोडून जाते ह्या विचारांनी  लेखकाच्या डोळ्यांत थोडे पाणी आले आणि कधी न रडणारा लेखक रडू लागला.

४.  लेखकाने आजीला कोणते वचन दिले ?
उत्तर – लेखकाने आजीला असे वचन दिले की, जेथे आजी, आजोबांनी, दत्तानी फुले वेचली, तेथे लेखक गोवऱ्या वेचण्यास जाणार नाही. नगरला गेला तर फुले वेचायलाच जाईन. तोपर्यंत दूर राहणार.

५. आजीला नेण्याचा बेत कसा निश्चित झाला ?
उत्तर – लेखक कॉलेजात गेल्यावर जवळच्या मित्रांना आजीचा अलाहाबादला यायचा बेत सांगितला, त्यावर मित्र लेखकाल म्हणाले “येऊ दे आईला, आपण त्याची सोय करु. त्यात शरम वाटण्यासारखं काय आहे ? तीर्थयात्रेला आपण आपल्या वडील माणसांना नेतोच की नाही?” असे सर्वांच्या सहमतीने आजीला नेण्याचा बेत निश्चित झाला.

६. आजीला शांत करण्यासाठी लेखकाने कोणते मोघम सांगितले ?
उत्तर – भीक मागणार नाही. लाचार होणार नाही. कुणाचा मिंधा  होणार नाही. उपास काढीन, पण सरळ चालेन , तुझे व्रत चालवीन असे लेखकाने मोघम लेखकाने आजीला शांत करण्यासाठी सांगितले.

(इ) खालील वाक्ये कोणी – कोणास म्हटले ते लिहा.

१. “बाळ्या किती  रे दिवस लिहिले” ?
उत्तर – आजीने लेखकाला विचारले.

२. “झाली अठरा वर्षे.”
उत्तर – लेखक आजीला म्हणाला.

३. “येऊ दे आईना, आपण त्याची सेय करू”
उत्तर – लेखकाचे मित्र लेखकाला म्हणाले.

४ “आई, आले बरं का भाऊ, आता तरी बोला. “
उत्तर – वहिनी आजीला म्हणाल्या.

५. “दानधर्म करु का? फलाण्याफलाण्याला बोलावू का ? काय करू सांगा.”
उत्तर – वहिनीनी आजीला विचारले.

६. “माय, तुला प्रतिज्ञा पाहिजे ? घे प्रतिज्ञा.”
उत्तर – लेखक आजीला म्हणाला.

(ई) रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१. तू दीर्घ __________ सोडलास आणि भूतकाळात शिरलीस.

२. तुझ्या __________  नाकावरून करंगळी फिरवली.

३. मी तुझ्या आणि त्यांच्या अभ्यासावर _______ ठेवीन.

४. किती तरी गुरुवारी ते आपल्या घरी तुझ्या हातीची ______  खावून गेले होते .

५ .पटकन् ______  बसून घरी गेलो.

६. दादा तुझ्याकडे पाहत _______  बसला होता.

७. मला पाहताच वाहिनीनी ________ फोडला.

८. वहिनीना ________ वर्षे सहवास मिळाला होता.

९. उपास कढीण, पण ________ चालेन.

१०. तुझ्या अस्थीची पिशवी ________ घेऊन अभ्यास केला.

उत्तर – (१) नि:श्वास

(२) गरुड

(३) देखरेख

(४) भाजी

(५) सायकलवर

(६) कोपऱ्यात

(७) हंबरडा

(८) पंचवीस

(९) सरळ

(१०) मांडीवर

भाषाभ्यास:

वाक्यात येणारी नामे व सर्वनामे ही जशीच्या तशी येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या रूपात बदल करावा लागतो. जसे – ‘वाघाला उंटाचा राग आला.’ ‘ माकडानी गुलाल उधळला.’ या वाक्यांतील वाघ, उंट ‘ही नामे जशीच्या तशी वाक्यात न ठेवता’ वाघा – ला, उंटा – चा, माकडां – नी असा त्याच्या रूपात बदल झाला. नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात हा जो बदल होतो त्याला ‘विभक्ती’ असे म्हणतात.

‘ वाघाला’ ‘उंटाचा ‘माकडांनी’ ही विभक्तीची रूपे आहेत. ही रूपे तयार करताना या शब्दांना ‘चा’ ‘ला’ ‘नी’ ही अक्षरे जोडली. अशा अक्षरांना ‘विभक्ती प्रत्यय’ म्हणतात. हे प्रत्यय शब्दांना लागत असताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. ‘वाघ’ या शब्दाचे ‘वाघा’ ‘उंट’ या शब्दाचे ‘उंटा’, ‘माकड’ या शब्दाचे ‘माकडा’ अशी जी रूपे होतात त्याला सामान्यरूप असे म्हणतात. हा बदल शब्दाच्या शेवटच्या अक्षरामध्ये होतो. विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखेच असते.

जसे ‘धोबी’ – धोब्याचा, धोब्याला, धोब्याने

पाणी – पाण्यात, पाण्यातून, पाण्याचा

अनेकवचनी शब्दांच्या सामान्यरूपावर नेहमी अनुस्वार येतो. जसे – शहरे – शहरांचे, घोडे- घोड्यांना पुढे काही शब्द दिले आहेत. त्यांचे वर्गीकरण खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे लिहा.

शब्द                          मुळशब्द                  सामान्यरूप                    प्रत्यय

गावाला                        गाव                           गावा                            ला

घरात                            घर                            घरा                               त

गळ्यातून                     गळा                         गळ्या                           तून

गाईच्या                        गाय                          गाई                               च्या

पक्ष्याने                         पक्षी                         पक्ष्या              ‌               ने

घड्याळास                  घड्याळ                   घड्याळ्या                      स

खालील वाक्यामध्ये कंसात मूळ शब्द दिले आहेत. त्यांना योग्य प्रत्यय लावून त्यांची सामान्यरूपे रिक्यामा जागी लिहून वाक्य पूर्ण करा.

१) (मावशी) ___________ फ्रॉक आणला.

२) (मित्र) ___________ आता खाली बसा.

३) (पत्रा) _________ दगड पडून आवाज झाला.

(४) (विद्या) _________ खरा पुजारी माणूस आहे.

(५) (भिकारी) ________ झोळी फाटली.

(६) (मुलगा) _________ व माझी गट्टी झाली.

(७) (पिपुरडे) ________ आम्ही एक वाजता निघालो.

उत्तर– (१) मावशीने

(२) मित्रांनो

(३) पत्र्यावर

(४) विद्याचा

(५) भिकऱ्याची

(६) मुलाची

(७) पिंपुरड्याहून