प्रश्न:

(अ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.  

१. शंकरने शाळा का सोडली ?
उत्तर.  शंकराचे अभ्यासात लक्ष नसल्याने तोपरीक्षेत परत परत नापास होई म्हणून त्याने शाळा सोडली.

२. गणपतराव कोणता व्यवसाय करीत असत ?
उत्तर. गणपतराव लाकडाचे व्यापारी होते.

३. शंकरला गणपतराव का ओळखू शकले नाहीत ?
उत्तर. शंकरने वेषांतर केल्यामुळे गणपतराव त्याला ओळखू शकले नाहीत.

४.पोलिसांनी पकडताच शंकरच्या मनात कोणता विचार आला ?
उत्तर. पोलिसांनी पकडताच शंकरच्या मनात असा विचार आला कि आता आपल्याला शिक्षा होणार व तुरुगांत जावे लागणार.

५. शंकर गुहेत का लपून बसला ?
उत्तर. शंकरच्या मागे पोलीस लागले होते म्हणून शंकर गुहेत लपून बसला.

६. पोलिसांनी साधुमहाराजांना दुरुनच नमस्कार का केला‌ ?
उत्तर. साधुमहाराजांची समाधी भंग होऊ नये म्हणून पोलिसांनी साधुमहाराजांना दुरुनच नमस्कार केला.

७.शंकरने साधुमहाराजांना कोणती विनंती केली
उत्तर. महाराज, मला आपल्या चरणापाशी ठेवून घ्या व आपली सेवा करण्याची संधी करण्याची संधी द्या, अशी विनंती शंकरने साधुमहारजांना केली.

(अ)खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन ते चार वाक्यांत लिहा.

१. शंकरचे लहानपणचे वागणे कसे होते ?
उत्तर. लहानपणी शंकर खूप उनाडक्या करी. शाळेत जाई पण अभ्यासात त्याचे लक्ष नसे, परिक्षेत परत परत नापास होई. त्यामुळे त्याने शाळा सोडली. त्याला मौजमजा करण्यासाठी पैशांची गरज भासू लागली. त्यासाठी तो लहान – मोठ्या चोऱ्याही करू लागला होता.

२.गणपतरावांकडील पैसे लुटण्यासाठी  शंकरने काय काय केले ?
उत्तर. गणपतरावांकडील पैसे लुटण्यासाठी शंकर गणपतराव येण्याच्या मार्गावर दबा धरुन बसला होता. गणपतराव रस्त्याच्या वळणावर पोहोचताच शंकरने संधी साधून त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्याकडे असलेली पैशांची थैली हिसकावून घेऊन शंकरने पोबारा केला. शंकरने वेषांतर केले असल्याने गणपतराव त्याला ओळखू शकले नाहीत.

३. रस्त्यावरील आरडाओरड ऐकून लोकांनी काय केले ?
उत्तर. रस्त्यावरील आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले. त्यांनी पाठलाग करुन चोराला पकडले आणि त्याला चोप दिला. लोकांनी पैशांची थैली गणपतरावांना परत केली आणि शंकरला पोलिसांच्या हवाली केले.

४.शंकरने पोलिसांना चुकविण्यासाठी कोणता युक्ती केली ?
उत्तर. शंकर पोलिसांना चुकविण्यासाठी एका गुहेत घुसला. जवळच एक भगवी कफनी होती. शंकरने झटकन ती कफनी अंगावर चढविली. चेहरा ओळखता येऊ नये म्हणून एक भगवे वस्त्र त्याने डोक्याला गुंडाळले आणि साधूसारखा डोळे मिटून बसला.

५. पोलीस गुहेतून निघून गेल्यानंतर शंकरच्या मनात कोणते विचार आले ?
उत्तर. पोलीस गेल्यावर शंकरने सुटकेचा निःश्वास सोडला. पोलिसांनी आपल्याला नमस्कार केल्याचे आठवून त्याला हसू आले. जर का मी खरोखरच साधूप्रमाणे सज्जन बनलो तर सर्वजण माझा किती आदर करतील ! असा विचार त्याच्या मनात आला.

६. शंकरचे मनपरिवर्तन कसे झाले ?
उत्तर. शंकरने साधुमहाराजांना विनंती केली की मला आपल्या चरणापाशी ठेवा. मी आपली सेवा करीन. साधुमहाराजांची मनापासून सेवा करू लागला. महाराजांच्याउपदेशामुळे शंकरचे मनपरिवर्तन झाले.

व्यवसाय:

(क) खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहाः 

१. “महाराज, मला आपल्या चरणापाशी ठेवून घ्या व आपली सेवा करण्याची संधी द्या.”
उत्तर. शंकरने साधुमहाराजांना म्हटले.

(ख) खाली काही शब्द दिले आहेत. त्यांच्या विरूध्द अर्थाचे शब्द लिहाः  

जसे – नापास पास

दुर्जन – सज्जन

अनादर – आदर

दुःख – आनंद

अमान्य – मान्य

दूर – जवळ

विक्रि– खरेदी

ठेंगणा – उंच

जुना – नवीन

अनेक – एक

अस्वच्छ – स्वच्छ

(ग) पळण्याची क्रिया चालू आहे हे दर्शविण्यासाठी ‘पळणे’या शब्दापासून ‘पळता – पळता’ असा शब्द वापरतात. याप्रमाणे खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी त्या वाक्यासमोर दिलेल्या शब्दापासून शब्द बनवून वाक्ये पूर्ण लिहा.

जसे : गणेश पळता – पळता पडला. (पडणे)

१.खाता – खाता मला ठसका लागला. (खाणे)

२. मला वाचता – वाचता झोप लागली. (वाचणे)

३. शंकरला फिरता – फिरता चक्कर आली. (फिरणे)

४. अभिजीतला जाता – जाता ठेच लागली. (जाणे)

५. माझे हसता – हसता पोट दुखू लागले. (जाणे)

६. बघता – बघता माणसांची गर्दी जमली. (बघणे)

७. खेळता – खेळता ते दोघे भांडु लागले. (खेळणे)