प्रश्न:

(अ)खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहाः

१.संन्याशानेनरेंद्रला कोणता आशीर्वाद दिला ?
उत्तर. संन्याशाने नरेंद्रला “भगवान तुम्हारा भला करे” असा आशीर्वाद दिला.

२.वयस्करकामगार मुलांजवळ का आला ?
उत्तर. मुलांचा झोपाळा नीट करण्यासाठी मुलांना मदत करायला वयस्कर कामगार मुलांजवळ आला.

३. वडील नरेंद्रला पुस्तके का आणून देत
उत्तर. नरेंद्रला वाचनाची खूप आवड होती म्हणून वडील नरेंद्रला पुस्तके आणून देत.

४.आई नरेंद्रला कोणत्या गोष्टी सांगे ?
उत्तर. आई नरेंद्रला रामायण व महाभारतातील गोष्टी सांगे.

५. नरेंद्रचेपूर्ण नाव काय ?
उत्तर. नरेंद्रचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त.

६. नरेंद्रने खिडकीतून कोणाला पाहिजे
उत्तर.  नरेंद्रने खिडकीतून एक संन्यासी थंडीने कुडकुडत रस्त्याने जाताना पाहिजे.

७. नरेंद्र नित्यनेमाने काय करीत होता ?
उत्तर.  नरेंद्र नित्यनेमाने व्यायाम करीत होता.

८. नरेंद्रला काय आवडत होते ?
उत्तर.  नरेंद्रला खेळायला व वाचायला आवडत होते.

९.नरेंद्र कुठल्या नावाने प्रसिध्द झाला ?
उत्तर. नरेंद्र स्वामी विवेकानंदाच्या नावाने प्रसिध्द झाला.

१०.नरेंद्रच्या आई वडिलांचे नाव काय होते ?
उत्तर. नरेंद्रच्या आईचे नाव भुवनेश्वरीव वडीलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते.

(आ) खालील प्रश्नांची प्रत्येकी तीन ते चार वाक्यांत उत्तरे लिहा.

१.नरेंद्रने संन्यासाला शाल का दिली ?
उत्तर.कलकत्ता शहरात कडाक्याची थंडी पडली होती, नरेंद्र शाल पांघरून खिडकीपाशी उभा होता. तेव्हा त्याला एक संन्यासी थंडीने कुडकुडत रस्त्याने चाललेला दिसला. त्याच्या अंगात ठिकठिकाणी फाटलेली कफनी होती. नरेंद्रला संन्यासाची दया आली, म्हणून नरेंद्रने संन्यासाला शाल दिली.

२. कामगार बेशुध्द पडल्यावर नरेंद्रने काय केले ?
उत्तर. कामगार बेशुध्द पडल्यावर नरेंद्रने आपल्या अंगातील सदरा काढला व त्या सदऱ्याने मजुराची जखम घट्ट बांधली. नरेंद्राने सर्व मुलांकडून पैसेगोळा केले व आपल्याकडील सर्वपैसे त्यात घालून जमलेली रक्कम त्या मजुराला औषधोपचार करण्यासाठी दिली.

३. नरेंद्र मुलांना कोणती मदत करायला गेला ?
उत्तर. एकदा नरेंद्र आपल्या मित्रांसह झोपाळ्यावर झोके घेत असताना शेजारचा झोपळा तुटून मुले खाली पडली, पण कोणालाच इजा झाली नाही.मुले झोपाळा नीट करू लागली. नरेंद्र त्यांना झोपाऴा नीट करण्यात मदत करायला गेला.

४. नरेंद्रला चांगले संस्कार कसे आले ?
उत्तर.  नरेंद्रला खेळाप्रमाणेच वाचनाची फार आवड होती. वडील त्याला पुस्तके आणून देत. ती पुस्तके तो मन लावून वाचत असे. एकदाच वाचल्यावर कोणताही विषय त्याला समजत असे. वर्गात त्याचा नेहमी वरचा क्रमांक असे. आई त्याला रामायण व महाभारतातील गोष्टी सांगे, अशा गोष्टींतूननरेंद्रवर चांगले संस्कार आले.

व्यवसाय:

(क) रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहाः

१.कलकला शहरात ______  थंडी पडली होती.

२. रस्त्यावर तुरळक ______  होती.

३. त्याच्या अंगात भगवी _____ होती.

४. नरेंद्र नित्यनेमाने ________ करी.

५. तो रोज संध्याकाळी _______ जात असे.

६. एकदा नरेंद्र आपल्या मित्रांसह झोपाळ्यावर ______ घेत होता.

७. त्याचवेळी एक ______ कामगार तिकडून जात होता.

८. तो मजूर ______ होऊन जमिनीवर कोसळला,

९. त्या मजुराने _______ सर्व मुलांकडे पाहिले.

१०. हा नरॆंद्र म्हणजे __________ .

उत्तर१. कडाक्याची

२. रहदारी

३. कफनी

४. व्यायाम

५. मैदानावर

६. झोके

७. वयस्कर

८. बेशुध्द

९. कृतज्ञतेने

१०. स्वामी विवेकानंद

(ख)खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.

१.”भगवान तुम्हारा भला करे.”
उत्तर. संन्यासीनरेंद्रा म्हणाला.

२.”या पैशातून औषधोपचार करा.”
उत्तर. नरेंद्र मजुराला म्हणाला.

(ग)खालील वाक्यांत काही घटना दिल्या आहेतत्या घटनांचा योग्य क्रम लावून वाक्ये पुन्हा लिहा.

कंडक्टरने तिकीट व उरलेले पैसे दिले.

त्याला खडकीजवळची जागा मिळाली.

सतीश शाळेत वेळेवर पोहेचला.

बस आली.

सतीश बसची वाट पाहत उभा होता.

सतीशने कंडक्टरला पैसे दिले.

उत्तर

१. बस आली

२. सतीश बसची वाट पाहत उभा होता.

३. त्याला खिडकीजवळची जागामिळाली.

४. सतीशनेकंडक्टरला पैसे दिले.

५. कंडक्टरनेतिकीटवउरलेलेपैसेदिलें.

६. सतीश शाळेत वेळेवर पोहोचला.