प्रश्न:

(अ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहाः

१. मोनाली सर्कस कुठे होती ?
उत्तर. मोनाली सर्कस कदंब बसस्थानकाच्या मागच्या पटांगणावर होती.

२. प्रेक्षकांना कोण खूप हसवायचे ?
उत्तर. प्रेक्षकांना उंच – बुटके जाडे, रंगीबेरंगी विदूषक खूप हसावायचे.

३. राज व रमण रिंगणात कसे यायचे ?
उत्तर. रमण राजच्या पाठीवर बसून वेगवेगळ्या कसरती करीत रिंगणात यायचे.

४. रमणराजला कसे सजवत असे ?
उत्तर. रमण राजला आंघोळ घाली, खायला देई,त्याच्या अंगावर व सोंडेवर विविध रंगांची नक्षी काढून त्याला सजवत असे.

५. सर्कस निघून गेल्यावर रमणचा नित्यक्रम कोणता होता ?
उत्तर. सर्कस निघून गेल्यावर रमण रोज सकाळी राजने प्राण सोडला त्या ठिकाणी जाऊन फुले वाहायचा.

६.मोनाली सर्कस पाहायला रीघ का लागली ?
उत्तर. मोनाली सर्कशीने खूप नाव कमावले होते म्हणून ती पाहायला प्रेक्षकांची रीघ लागली.

७.सर्कशीचे आकर्षण कोण होते ?
उत्तर. रमण विदूषक सर्कशीचे आकर्षण होते.

८.राज रमणला आपल्या सोंडेत केव्हा घ्यायचा ?
उत्तर. बॅंडचा आवाज सुरू होतात राज पुन्हा रमणला आपल्या सोंडेत घ्यायचा.

(ब)खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकीतीन ते चारवाक्यांत लिहा.

१. सर्कशीतील कोणकोणते खेळ पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटायचे ?
उत्तर. सर्कशीतील छोट्या – छोट्या मुलींच्या शारीरिक कसरती पाहून प्रेक्षकांना खूप कौतुक वाटायचे. घोडे, हत्ती, वाघ, सिंह यांचे खेळ मुलांना आकर्षित करायचे. स्त्री–पुरूष कलाकारांचे उंच झोक्यावरील खेळ पाहताना प्रेक्षक अवाक् व्हायचे.

२. राजरमणच्या खेळाचे वर्णन करा ?
उत्तर. रमण राजच्या पाठीवर बसून वेगवेगऴ्या कसरती करीत करीत रिंगणात यायचा. रिंगणातराज दोन वेळा गोलाकार फिरला की रमण खाली उतरायला. नंतर राज रिंगणात ठेवलेल्या गोल मेजावर उभा राहून पुडील दोन पाय व सोंड वर करून प्रेक्षकांना नमस्कार करायचा. नंतर तो रमणला सोंडेत धरून उंच फेकायचा. रमण हवेत कोलांट्या घेत घेत जमिनीवर येऊन उभा रहायला.

३. रमन व राजची मैत्री दाखवणाची चार वाक्ये लिहा.
उत्तर. राज व रमण खास दोस्त होते. राजला आंघोळ घालणे, खायला देणे, त्याच्या अंगावर व सोंडेवर विविध रंगांची नक्षी काढून त्याला सजवणे यातच रमण सतत रमलेला असायचा. रात्री ते दोघेही एकत्र झोपायचे. सकाळी रमण राजच्या पाठीवर बसून गावातून फिरून यायचा. राजही गावातून फिरताना खूश असायचा. राजरमणची ही दोस्ती सर्वांना कौतुकास्पद वाटायची.

४.सर्कशीजवळचा दृश्य कसा होता ?
उत्तर. सर्कस कदंब बसस्थानकाच्या मागच्या बाजूला पटांगणात होता. तिथे खूप गर्दी होती. गाड्या, फेरीवाले व बॅंडच्या आवाजांनी तो परिसर दणाणून जात होता. अधून मधून हत्तीचे चीत्कार, वाघसिंहाच्या डरकाऴ्या एकू येत होत्या. हे प्राणी ‘मोनाली’ सर्कशीतले होते.

५. राज आजारी असल्याची शंका रमणच्या मनात का आली ?
उत्तर. एके दिवशी सकाळी रमण न्याहारी वगैर आटपून राजकडे आला. बघतो तर राज झोपूनच होता. रमणने हाक मारताच राजाने डोळे उघडले, पण तो नेहमीप्रमाणे उभा राहिला नाही व सोंडेने रमणला कुरवाळलेही नाही हे पाहून राज आजारी असल्याची शंका रमणच्या मनात आली.

६. राज आजारी पडल्यावर रमणने काय केले ?
उत्तर. राज आजारी पडल्यावर रमणने सर्कशीत विदूषकाचे काम करायचे सोडून दिले पण फुकटचा पगार घ्यायचा नाही म्हणून तो सर्कशीतील इतर कामे करू लागला. ही कामे करताना राजच्या सेवेत त्याने कधी खंड पडू दिला नाही. त्याचे अंग पुसणे, पायाला औषध लावणे, खायला देणे ही सगळी कामे तो स्वत: करत होता.

व्यवसाय:

(क)रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१. मोनाली सर्कस पहायला प्रेक्षकांची _______ लागली होता.

२. त्यांच्यामधील रमण विदूषक तर सर्कशीचे _____ होते.

३. _______ आवाज सुरू होतात राज पुन्हा रमणला आपल्या सोंडेत घ्यायला.

४. राजरमणची ही दोस्ती सर्वांना ______ वाटायची.

५. रमणने राजला ______ पाहिले.

६. रमणला राजचे मागचे दोन्ही पाय _____ दिसले.

७. सर्कशीतील सर्व माणसे _______ .

८.लवकरचसर्कशीचा______ तिथून हलणार होता.

९. सर्वजण सामानाची _____करीत होते.

१०. रमण त्याच गावात छोटी मोठी ______ करून पोट भरू लागला.

उत्तर

१.रीघ

२. आकर्षण

३. बॅंडचा

४. कौतुकास्पद

५. निरखून

६. सुजलेले

७. हळहळली

८. मुक्काम

९. आवराआवर

१०. कामे

(ख) खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनाम निवडून लिहा.

(जो, हे, ती, तिने, तो, त्यांनी, त्याने)

१. _____ अभ्यास करेल _____ यश मिळवले.

२.रमण सर्कशीच्या रिंगणात आला ______ खूप कसरती केल्या.

३. सुधाचा आज वाढदिवस आहे म्हणून ______खूप आनंदित आहे.

४. प्रेक्षक नाटक पाहून खूश झाले ______ टाळ्यांचा कडकडाट केला.

उत्तर      १. जो, तो

‌‌      २.त्याने

३. ती

४. त्यांनी

(ग)खालीलसंभाषणात योग्य सर्वनामे लिहा.

रमेश – गुरूजी, आम्ही सर्कस पाहायला जाऊया ?

गुरूजी –तुम्ही येणार सर्कस पहायला ?

सर्व मुले –आम्ही येणार आम्ही येणार.

गणेश – काय रे विनय, तू येणार नाहीस ?

विनय – नाही मीपाहिली ती सर्कस.

गणेश – केव्हा पाहिलीस तू ?

विनय – मी शनिवारी गेलो होतो.

गणेश – गुरूजी, विनय येणार नाही. त्याने पाहिली ती सर्कस.