प्रश्न:

(क) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. कोकिळ पक्ष्याच्या आवाजाने कशाची चाहूल लागते?
उत्तर. कोकिळ  पक्ष्याच्या आवाजाने वसंत ऋतूची चाहूल लागते.

 २. कोकीळ पक्ष्याचे डोळे कसे दिसतात ?
उत्तर. कोकिळ  पक्ष्याचे डोळे माणकासारखे लाल दिसतात.

३. कोकिळ पक्षी कोणती फळे खातात?
उत्तर. कोकिळ पक्षी वड, पिंपळ यांची फळे व बोरे खातात.

४ . सुतार पक्ष्याचे आवडते अन्न कोणते ?
उत्तर.  किडा व मुंगी हे सुतार पक्ष्याचे आवडते अन्न.

५. टिटवीचे अन्न कोणते?
उत्तर. शंखातील जीव – जीवाणू , खेकडे, गोगलगाई व गवतातील किडे हे टिटवीचे अन्न.

६. टिटवी आपल्याला कोठे दिसतात ?
उत्तर. माळरान, शेत, नदीकिनारी तसेच म्हशींचा पाठीवर बसून आरामात फिरताना टिटवी आपल्याला दिसते.

७. कोकिळ पक्षी कोणता आवाज काढतात ?
उत्तर.  कोकिळ पक्षी ‘कुहू कुहू’ असा गोड आवाज काढतात.

८. कोकिळा कुठे अंडी घालते ?
उत्तर.  कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते.

९. सुतार पक्षी कोणता आवाज काढतात ?
उत्तर सुतार पक्षी टिSर्र , टिSर्र असा गोड आवाज काढतात.

१०. टिटवी मुळे झाडाची कशी मदत होते ?
 उत्तर. टिटवीने झाडाच्या खोडातील किडे खाल्ल्यामुळे झाडाचे रक्षण होण्यास मदत होते.

(ख)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत लिहा.

१. कोकिळ व कोकिळा यांच्या  रंगात कोणता फरक असतो ?
उत्तर.  कोकिळ पक्ष्याच्या रंगावरून नर – मादीतील फरक ओळखता येतो. काळ्या चमकदार रंगाचा दिसतो, तो कोकिळ तर कोकिळा भुरकट तांबूस रंगाची असते. तिच्या सर्व अंगावर पांढऱ्या शुभ्र रंगाचे ठिपके असतात.

२. सुतारपक्षी आपले घर कसे तयार करतो ?
उत्तर. सुतार पक्षी आंबा, बोर किंवा बाभूळ अशी खोडाची झाडे घर तयार करण्यासाठी निवडतो. आपल्या टोकदार चोचीने झाडाचे खोड पोखरून तो छान घर तयार करतो. त्याचे घर तोंडाशी लहान दिसते पान आत खूप रुंद असते.

३. सुतारपक्षी आपले अन्न कसे मिळवितो ?
उत्तर.  सुतारपक्षीची अन्न मिळविण्याची पतदत पद्धत इतर पक्ष्यांपेक्षा वेगळीच असते. आपल्या चोचीचा आघात खोडावर करून खोडाचा पोकळ भाग तो अजमावतो. त्याचा शोध लागतच आपली लांबसडक वळवळणारी जीभ खोडातील पोकळीत घालून किडा, मुंगी ओढून काढतो.  हेच त्याचे आवडते अन्न.

४. टिटवी अंडी घालण्यापूर्वी दगड – गोटे का जमा करते ?
उत्तर. टिटवी स्वत:चे घरटे बांधत नाही. नदीकिनारी किंवा शेताच्या बाजूला असलेला एखादा खड्डा हेच तिचे  घरटे. या खड्ड्याच्या बाजूला थोडेसे दगडगोटे गोळा करून मादी अंडी घालते. अंडी व गोटे यातील फरक चटकन लक्षात येत नाही.

५. कोकिळ पक्षाचे थोडक्यात वर्णन करा ?
उत्तर. कोकिळ पक्षी उडताना पंखांची उघडझाप फार जलद गतीने कतात . वड, पिंपळ यांची फळे, बोरे व किडे हे त्यांचे खाद्य्य. फुलातील मधुर रसही ते पितात. हे पक्षी कधीच दहावी बांधीत नाहीत. कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. त्यामुळे कोकिळ आणि कावळे यांच्यात भांडणे होतात.

६. सुतार पक्षाचे थोडक्यात वर्णन करा ?
उत्तर.  सुतार पक्षी आकाराने लहान असला तरी त्याचे सौंदर्य मात्र त्याच्या निरनिराळ्या रंगामुळे मनमोहक वाटते. सुतार पक्ष्याच्या डोक्यावर असलेला तांबडा तुरा बसकी टोपी घातल्यासारखा दिसतो. नर-मादीला काळसर चोच,  काळ्या अंगावर पांढरे शुम्र ठिपके व पोटाकडचा भाग पांढरा व तांबूस शेपटी असते.

(ग)  रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा.

१. कोकिळ पक्ष्याचे डोळे माणकासारखे _____ असतात.

२. कोकिळ पक्ष्याच्या ______ नर – मादीतील फरक ओळखता येतो.

३. कोकिळ उडताना _______ उघडझाप फार जलद गतीने करतात.

४. फुलातील ______ रसही ते पितात.

५. त्यामुळे कोकिळ आणि कावळे यांच्यात ______ होतात.

६. आंब्याच्या झाडांचा हा ______ मित्र.

७. झाडाच्या ______ किडे खाल्ल्यामुळे झाडाचे रक्षण होण्यास मदत होते.

८. टिटवी अतिशय ______ असते.

९.  टिटवी _______ खात आहे.

१०. अंडी व गोटे यातील फरक ________ लक्षात येत नाही.

उत्तर  १) लाल

२) रंगावरून

३) पंखांची

४) मधुर

५) भांडणे

६) खास

७) खोडातील

८) धीट

९) फळे

१०) चटकन

व्यवसाय :

(ब) खाली दोन वाक्ये दिली आहेत. ती काळजीपूर्वक वाचा.

अ) तिने आईला पत्र लिहिले.

ब) ते फुले ठेवलेले पात्र सुंदर दिसत आहे.

वरील वाक्यांती अधोरेखित शब्दांमध्ये थोडासा फरक आहे. या दोन्ही शब्दाचा अर् वेगळा आहे.

याप्रमाणे खाली शब्दांचा उपयोग करून वाक्ये लिहा.

१. घट = घाट

– गीता हातामध्ये घट घेऊन चालत गेली.
– दुरून घाट छोटसं वाटतं.

२. भट = भाट

– देवळात भट असतात.
भाटात फिरायला मजा आली

३. मठ = माठ

– स्वामीजींचे मठ खुप शांत होते.
– मीरा माठात पाणी भरुन ठेव.

४. मन = मान

– आपले मन शांत ठेवायला पाहिजे.
– जिराफची मान उंच असते.

५. रस = रास

– उसाचा रस मला खूप आवडतो.
– नदीकाठी मासळींची रास पडली होती.

६. घर = घार

– आपण आपले घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे.
घार झाडावर बसली होती.

. माणसांच्या निवासस्थानालाघर‘ अस म्हणतात. याप्रमाणे खालीस्तंभात पश – पक्ष्याची नावे दिली आहे आणि ‘स्तंभात त्यांचा राहण्याच्या जागांची नावे दिली आहे. त्याच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’                                            ‘ब’

पक्षी                                          गोठा

कोंबडा                                     वारूळ

‌‌                           घोडा                                         गुहा

गुरे                                            बीळ

सिंह                                         घरटे

साप                                         तबेला

मुंगी                                         खुराडे

उत्तर                                   ‘अ’                                              ‘ब’

पक्षी                                       ‌    घरटे

कोंबडा                                      खुराडे

घोडा                                          तबेला

गुरे                                              गोठा

सिंह                                            गुहा

साप                                          बीळ

मुंगी                                           वारूळ