प्रश्न :

(अ) खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१. जानू पुढचे शिक्षण का घेऊ शकला नाही ?
उत्तर. घरच्या गरिबीमुळे जानू पुढचे शिक्षण घेऊ शकला नाही.

२. जानू शहरात कशासाठी गेला होता ?
उत्तर. कामधंदा मिळेल या आशेने जानू शहरात गेला होता.

३. जानूने डोळे केव्हा पाणावले ?
उत्तर. “दवाखान्यातील कामात मदत कर , तुला पुढं‌ शिकवसं वाटत असेल तर शिक.” हे डॉक्टरांचे उद्गार ऐकताच जानूचे डोळे पाणावले.

४. अपघात कसा झाला होता ?
उत्तर. एक प्रवासी बस व जीप यांची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला होता.

५. जानू किती तासानंतर शुध्दीवर आला ?
उत्तर.  जानू आठ – दहा तासानंतर शुध्दीवर आला ?

६. डॉ. रमेश कुठल्या नावाने प्रसिद्ध होते ?
उत्तर.  डॉ. रमेश  ‘गरिबांचे डॉक्टर’  म्हणून  प्रसिद्ध होते.

(आ) खालील प्रश्नाची उत्तरे प्रत्येकी तीन ते चार वाक्यांत लिहा.

१. अपघातग्रस्तांना लोकांनी कशी मदत केली ?
उत्तर. एक प्रवासी बस व जीप यांची समोरासमोर टक्कर झाली. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले होते. काही जणांना मुका मार बसला होता . तर काहीजण गंभीररित्या जखमी झाले होते. अपघातग्रस्तांच्या लोकांनी धावधाव केली. जखमींना जवळच्या दवाखान्यात उपचार केले.  काहीजणांना किरकोळ उपचार करून घरी पाठवून देण्यात आले.

२. जानूच्या पायावर डॉ. रमेश यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी कशाप्रकारे धावपळ केली ?
उत्तर. जानूच्या पायाचे हाड मोडले होते. त्याला डॉ. रमेशनी आपल्या दवाखान्यात ठेवून घेतले व नंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी शहरातील रुग्णालयात नेले. तेथे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

३. जानूच्या घरची परिस्थिती कशी होती ?
उत्तर. जानू आंबेवाडी गावाचा होता. दहावीपर्यंत शिकला होता. घरच्या गरिबीमुळे पुढे शिकू शकला नव्हता. घरी फक्त म्हातारे वडील होते. उदरनिर्वाहासाठी ते मोलमजुरी करीत असत. त्याची आई लहानपणीच वारली होती.

४. डॉ. रमेश गरिबांची सेवा करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करीत असत ?
उत्तर.  डॉ. रमेश ‘गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध होते. आपल्याभोवती असलेल्या गरीब, अडाणी व अर्धपोटी लोकांना ते नेहमीच मदत करीत. जानूच्या पायावर सुद्धा त्यांना शस्त्रक्रिया केली व त्याला आपल्या दवाखान्यात कामाला ठेवले.

५. डॉक्टरांनी जानूला घरी का पाठवले नाही ?
उत्तर.  जानू गरीब होता, त्याचे वडील म्हतारे होते. ते मोलमजुरी करुन पोट भरत होते . जानू दहावीपर्यंत शिकला होता. पण घरच्या परिस्थितीमुळे तो पुढे शिकू शकला नव्हता, म्हणून डॉक्टरनी  त्याला दवाखान्यात काम करून पुढचे शिक्षण घेण्यासाठी आपल्याकडे ठेवले.

६. जानुला दु:ख का झाले ?
उत्तर. जानू आठ-सहा तासानंतर शुद्धीवर आला होता. त्याला वेदना होत होत्या. त्याने डोळे उघडून पाहिले. आपण बसमध्ये नसून रुग्णालयातील खाटेवर असल्याचे त्याच्या लक्षात आले . पायाकडे लक्ष जाताच जानूला दु:ख झाले.

व्यवसाय :

(इ) रिकाम्या जागी पाठतील योग्य शब्द लिहा.

१. लोक _____ दिशेने धावले.

२. एक प्रवासी बस व जीप यांची समोरासमोर ________ झाली होती.

३. अपघातात अनेक ________ जखमी झाले होते.

४. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी लोकांना ______ केली.

५. तरुण शुध्दीवर आल्याचे पाहून डॉक्टरांना _______ वाटले.

६. डॉक्टरांनी त्याच्या _______  व्यवस्था केली.

७. डॉक्टरांना जानूच्या घरची माहिती समजल्यावर ______ आली.

८.  चार दिवसांनी डॉक्टर रमेशनी जानूला रुग्णालयातून आपल्या ______ आणले.

९. घरी परत येत असताना _______ सापडलो.

१०.  डॉक्टरांचे ______ ऐकताच जानूचे डोळे पाणावले.

 उत्तर  (१) आवाजाच्या

(२) टक्कर

(३) प्रवासी

(४) धावाधाव

(५) समाधान

(६) औषधोपचाराची

(७) दया

(८) दवाखान्यात

(९) अपघातात

१०) उद्गार

(ई)  खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.

१. “डॉक्टर , तुम्ही मला वाचविलेस. मी तुमचा अत्यंत आभारी आहे.”
उत्तर. जानू डॉक्टरांना म्हणाला.

२. “अरे , असं का बोलनतोस”
उत्तर. डॉक्टरांनी जानूला म्हटले.

३. “अरे जानू , निराश होऊ नकोस. सर्व काही ठीक होईल. “
उत्तर. डॉक्टरांनी जानूला म्हटले.

४. “डॉक्टर, मी आता चालू शकतो. मी जाऊ का ?”
उत्तर. जानू डॉक्टरांना म्हणाला.

(क) क्रियापदांची योग्य रूपे योजून खालील मोकळ्या जागा भरा.

जसे : पंखा फिरतो – पंखे फिरतात
१. चाक फिरते – चाके फिरतात

२. विमान उडते – विमाने डतात

३. गाडी धावते – गाड्या धावतात

४. मुलगा पळतो – मुलगे पळतात

(ख) रुग्णालय हा शब्द ‘रुग्ण ब आलय’ हे दोन शब्द एकत्र आल्याने बनलेला आहे. याप्रमाणे खालील शब्दांना एकत्र आणून एक शब्द बनवा.

औषध आलय – औषधालय

पुस्तक आलय – पुस्तकालय

भोजन आलय – भोजनालय

देव आलय – देवालय

सचिव आलय – सचिवालय