प्रश्न :

() खाली प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

१. विठ्ठलाच्या अंगावर कोणते अलंकार आहेत ?
उत्तर.  विठ्ठलाच्या पायात पैंजण व हातात कडी असे अलंकार आहेत.

२. विठ्ठलाच्या हातीवरील फोड पाहून जनाबाई त्याला काय सांगतात ?
उत्तर. विठ्ठलाच्या हातावरील फोड पाहून जनाबाई त्याला मुसळ सोड म्हणून सांगतात.

आ) खाली प्रश्नांची उत्तरे प्रत्येक तीन – चार वाक्यांत लिहा.

१. विठ्ठलाने जनाबाईला कोणकोणत्या कामांत मदत केली ?
उत्तर.  विठ्ठलाने जनाबाईला भात कांडायला, उखळ पुढे  जाऊन काढयला मदत केली. विठ्ठलाने स्वतः हातांत मुसळ घेऊन साळी कांडली. कांडून झाल्यावर स्वतः भातातील कोंडा पाखडून काढला.

२. जनाबाईची कामे करताना विठ्ठलाला कोणता त्रास झाला ?
उत्तर. जनाबाई भात कांडायची, ते पाखडण्याची कामे करताना विठ्ठलाला थकवा आला. त्याच्या सर्वांगाला घाम येऊन पितांबर भिजून गेला. मुसळाने भात कांडिता कांडिता पंढरीनाथाच्या हाताला फोड आले.

() रिकाम्या जागा योग्य शब्द लिहा :

१. पुढे जाऊनी ________ काढी.

२. सर्व _________ घाम आला.

३. ________ पाखडुनी काढी.

४. जनी म्हणे _______ सोड.

उत्तर  १. उखळ

२.   अंगी

३.   कोंडा

४. मुसळ