वाक्यप्रचार :

१. द्रोह करणे – शत्रुत्व करणे, वैर करणे.

२. अनुग्रह करणे – कृपा करणे.

३. मग्न होणे – दंग होणे, गर्क होणे.

४. अंतर्धान पावणे – अदृश्य होणे, नाहीसे होणे.

टीपा

१.  बृहस्पती – देवांचें गुरु

२.  देवेंद्र – देवांचा राजा‌ इंद्र

३.  शुक्र – शुक्राचार्य दैत्यांचे गुरु

४. प्रल्हाद – दैत्यकुळातील सम्राट. हिरण्यकश्यपूजा मुलगा. विष्णुभक्त

प्रश्न :

(अ) खालील विधानांना चार पर्यांयी उत्तरे दिली आहेत, त्यांतली योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.

१. दैत्यकुलोत्पन्न राजा प्रल्हाद ________.
अ) अत्यंत ज्ञानसंपन्न होता.
आ) अत्यंत शीलसंपन्न होता.
इ)   अत्यंत धर्म संपन्न होता.
ई‌) ‌‌ ‌ अंत्यत धैर्यसंपन्न होता.

उत्तर.  दैत्यकुलोत्पन्न राजा प्रल्हाद अत्यंत शीलसंपन्न होता.

२. प्रल्हाद चिंतामग्न झाला तेवढ्यात ________.
अ) एक धिप्पाड तेजस्वी मूर्ती त्याच्या शरीरातून बाहेर पडली.
आ) एक धिप्पाड तेजस्वी देवी त्याच्या शरीरातून बाहेर पडली.
इ)  एक धिप्पाड तेजस्वी पुरुष त्याच्या शरीरातून बाहेर पडला.
ई)  एक धिप्पाड तेजस्वी प्राणी त्याच्या शरीरातून बाहेर पडला.

उत्तर.  प्रल्हाद चिंतामग्न झाला तेवढ्यात एक धिप्पाड तेजस्वी मूर्ती त्याच्या शरीरातून बाहेर पडली.

३. इंद्र राजा प्रल्हादाकडे गेला असता,  त्याला कळते की _________.
अ) राजा प्रल्हाद प्रजादक्ष राजा आहे.
आ) राजा प्रल्हाद कोणाचाही द्रोह करत नाही.
इ) राजा प्रल्हाद  त्रैलोक्याचा धनी आहे.
ई) जगात शील सर्व श्रेष्ठ आहे.

उत्तर. ‌ इंद्र राजा प्रल्हादाकडे गेला असला त्याला कळते की जगात शील सर्व श्रेष्ठ आहे.

प्रश्न:

(आ)  खालील प्रश्नांची प्रत्येकी उत्तरे एका वाक्यात लिहा.

१. राजा प्रल्हाद कोणत्या कुळात जन्मलेला होता ?
उत्तर.  राजा प्रल्हाद दैत्य कुळात जन्मलेला होता.

२. इंद्राने बृहस्पतीस कोणता प्रश्न केला ?
उत्तर. जगात सर्वश्रेष्ठ काय आहे ? हा प्रश्न इंद्राने बृहस्पतीस केला.

३. शुक्राचे इंद्राला काय दिले ?
उत्तर. शुक्राचे इंद्राला उत्कृष्ट ज्ञानाची प्राप्ती करून  दिली.

४. प्रल्हादाचे शरीर कोणत्या चार पुरुषांनी सोडले ?
उत्तर. धर्म, सत्य, सदाचार, बल या  चार पुरुषांनी प्रल्हादचे शरीर सोडले.

५. प्रल्हादाला अत्यानंद का झाला.
उत्तर. इंद्राची ज्ञानजिज्ञासा सेवाबुध्दी आणि विनयसंपन्नता  पाहून प्रल्हादाला आनंद झाला.

६. शील आणि धर्म एकमेकांशी कसे असतात ?
उत्तर. शील आणि धर्म एकमेकांशी एकरूप असतात.

७. प्रल्हादाची दृष्टी कशी होती ?
उत्तर. आपल्या प्रत्येक कृतीने इतरांचे हित झाले पाहिजे अशी, प्रल्हादाची दृष्टी  होती.

८. राजाची सर्वश्रेष्ठ संपत्ती कोणती ?
उत्तर.   राजाची सर्वश्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याचे शील .

(इ)  खालील प्रश्नांची प्रत्येकी उत्तरे दोन ते तीन वाक्यांत लिहा.

१. इंद्रावर कोणत्या बिकट प्रसंग ओढवला?
उत्तर.  प्रल्हादाने शीलाच्या सामर्थ्यावर देवेंद्राचे राज्य मिळविले आणि तो त्रैलोक्याचा धनी बनला. त्यामुळे इंद्राला इंद्रपद सोडण्याचा बिकट प्रसंग ओढवला.

२. प्रल्हाद इंद्राच्या कोणत्या गुणांवर खुष झाला ?
उत्तर.  इंद्राची ज्ञानजिज्ञासा, सेवाबुध्दी आणि विनयसंपन्नता  पाहून प्रल्हाद अत्यानंदीत झाला. त्याची योग्य ती गुरुसेवा पाहून तो संतुष्ट झाला.

३. शीलावाचून मिळालेल्या संपत्तीचे फळ काय मिळते ?
उत्तर. ती संपत्ती चिरकाल उपभोगता येत नाही. अशा द्रव्याने समूळ नाश होतो. हे शीलावाचून मिळालेल्या संपत्तीचे फळ असते.

४.  इंद्राने प्रल्हादाकडे जाण्यापूर्वी आपला वेष का पालटला ?
उत्तर. आपल्याला हवी असलेली माहिती आपण अतिथीरूपात प्रल्हादाकडे गेलो तरच मिळेल ह्या विश्वासामुळे इंद्र त्याच्याकडे वेष पालटून गेला.

(ई)  खालील प्रश्नांची प्रत्येकी चार ते सहा वाक्यांत उत्तरे लिहा.

१. लक्ष्मीने ‘शील’ गुणाचे महत्व कसे सांगितले ?
उत्तर.  शीलाच्या सहाय्यानेच प्रल्हादाला त्रैलोक्य प्राप्त झाले. प्रल्हादामधले शील गेल्यामुळे  त्याचे अनुयायी धर्म, सत्य, सदाचार, बल आणि लक्ष्मीसुध्दा प्रल्हादामधून निघून गेली. या सर्वाचे मूलकारण शील हेच होय. इंद्राने प्रल्हादाचे शील हरण करुन आपले इंद्रपद पुन्हा मिळविले. अशा प्रकारे लक्ष्मीने ‘शील’ गुणाचे महत्व सांगितले.

२. इंद्राने प्रल्हादाकडे शीलच का मागितले ?
उत्तर. जगात शील हेच सर्वश्रेष्ठ आहे. इंद्राला ते पटले होते. प्रल्हादाने शीलाच्या जोरावरच इंद्रपद हस्तगत केले होते. शीलाबरोबरच धर्म, सत्य, सदाचार, बल व लक्ष्मी राहते. त्या सर्वाचे परस्पर साहचर्य आहे. इंद्रपद परत मिळवायचे तर शीलाचे पाठबळ हवे. पण त्या आधी ते प्रल्हादाकडून परत घेतले पाहिजे. म्हणून इंद्राने प्रल्हादाकडे शील मागितले.

३. इंद्राने गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न केले ?
उत्तर. आपले इंद्रपद प्रल्हादाला कसे प्राप्त झाले, याचा शोध घेण्यासाठी इंद्र बृहस्पती व शुक्राचार्य यांच्याकडे गेला. शुक्राचार्याच्या सांगण्यावरून तो प्रल्हादाकडे वेष बदलून गेला. प्रल्हादाला पुरसत नव्हती. थोड्या दिवसांनी तो परत प्रल्हादाकडे गेला. त्याने प्रल्हादाला विचारलेल्या अनेक प्रश्नांवरून मिळालेल्या उत्तरांतून व चर्चेतून शील हेच सर्वश्रेष्ठ असल्याचे इंद्राला कळले. प्रल्हाद अतिथीरुपी इंद्राच्या जिज्ञासेवर  व गुरुसेवेवर खुष होऊन वर मागायला सांगितले.. इंद्राने सरळ त्याचे शील मागितले. प्रल्हादाने ‘तथास्तु’ म्हणून आपले शील इंद्राला दिले. शीलासह अतिथीरुपी इंद्राला धर्म, सत्य, सदाचार, बल आणि लक्ष्मीची प्राप्ती झाली. गेलेले राज्य परत मिळविण्यासाठी इंद्राने हे प्रयत्न केले.

भाषाभास :

शब्द : एक किंवा एकापेक्षा अधिक अक्षरे एकत्र आल्यानंतर जर त्या अक्षरांच्या समूहाला निश्चित असा अर्थ प्राप्त होत असेल, तर त्या समूहाला ‘शब्द’ असे म्हणतात.

उदा. ‘कमळ’ हा अक्षरांचा समूह जर ‘कळअसा लिहिला तर त्याला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. त्यामुळे ‘मक या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणता येणार नाही.

– शब्दाचे दोन प्रकार आहेत.

१. विकारी शब्द

२. अविकारी शब्द

१) विकारी ब्द वाक्यात उपयोगात येताना, ज्या शब्दांच्या मूळ शब्दात (रुपात) बदल होतो त्या शब्दांना सव्यय किंवा विकारी शब्द म्हणतात.

उदा. झाड, तो,

(अ) त्या झाडचे फळे गोड असते.
(आ) त्याला आता काम आहे

२) अविकारी शब्द – वाक्यात उपयोगात येताना, ज्या शब्दांच्या मूळ शब्दात (रुपात) बदल होत नाही त्या शब्दांना अव्यय किंवा अविकारी शब्द म्हणतात.

उदा. हळू, जर

(अ) अरे , हळू चाल.
(आ) जर तू अभ्यास केलास तर उत्तीर्ण होशील.

– अविकारी शब्दाचे चार उपप्रकार.

१) क्रियाविशेषण व्य: क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .

-स्थान वाचक क्रियाविशेषण : उदा. जेव्हा, तेव्हा
-कालवाचक क्रियाविशेषण : उदा. आज, काल
-परिणामवाचक क्रियाविशेषण : उदा. जास्त, सर्व
-रितीवाचक क्रियाविशेषण : उदा. अचानक, हळूहळू , जोरात

२) शब्दयोगी अव्यव : नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .

उदा. स, ला, ना, ते ,आत , बाहेत, जवळ, पुढे

३) उभयान्वयी अव्यय : दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .

उदा. आणि ,पण, परंतु, किंवा

४) केवळ प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द .

उदा. वाह !, अरे !, छट !