(अ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१. परेशच्या वाढदिवसासाठी उमेश हजर का राहू शकला नाही ?
 उत्तर. वादळी पाऊस पडत होता म्हणून परेशच्या वाढदिवसासाठी उमेश हजर राहू शकला नाही.

२. उमेशचे बाबा त्याच्यासाठी कोणती भेटवस्तू घेणार आहेत ?
उत्तर. उमेशचे बाबा त्याच्यासाठी रेसची सायकल आणणार आहेत.

३. उमेशचा वाढदिवस‌ केव्हा आहे ?
उत्तर. उमेशच्या वाढदिवस १५ ऑक्टोबरला आहे.

४. उमेशच्या वाढदिवसासाठी ताई काय आणणार आहे ?
उत्तर. उमेशच्या वाढदिवसासाठी ताई कपडे आणणार आहे.

५. परेशचा वाढदिवस कुठे साजरा केला ?
उत्तर. परेशचा वाढदिवस अपंग मुलांच्या शाळेत साजरा केला.

६.  उमेशच्या वाढदिवसाला कोण कोण येणार होते ?
उत्तर. उमेशच्या वाढदिवसाला त्याचे   मित्र, काका – काकू, ताई, दादा, दादाचे मित्र व बाबांचे मित्र येणार होते.

(आ) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीन ते चार वाक्यांत लिहा.

१. उमेशचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा करण्यात येणार आहे ?
उत्तर. उमेशच्या वाढदिवसाला लाडू, बर्फी, जिलेबी बनविण्यासाठी खास मनुष्य बोलाविलेला आहे. दादा मोठा केक आणणार आहे. दादाच्या मित्रांचा आग्रह आहे म्हणून व्हिडिओ सिनेमा ठेवण्यात येणार आहे. संपूण समारंभाचे व्हिडिओ शुटींग करण्यात येणार आहे.

२. परेशचा वाढदिवस अपंग मुलांच्या शाळेत कसा साजरा करण्यात आला ?
उत्तर. अपंग मुलांच्या शाळेत मुकी व बहिरी मुले शिकत होती. तेथील संचालकांची परवानगी घेऊन मुलांना भेटायला मिळाले. त्यांचा परिचय करून घेतला. ती मुले सर्व कामे मुकाट्याने करीत होती . त्यांच्याशी खेळ खेळून, त्यांना एकदिवस खूप – खूप आनंद दिला. त्यांना गोड –  गोड खाऊ वाटून परेशचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

३. मामांनी उमेशला वाढदिवसाविषयी कोणती नवीन कल्पना सुचविली ?
उत्तर. मामांनी उमेशला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करता येईल असे सूचविले. गरीब वस्तीतील एखाद्या बालवाडीस भेट देता येते. पेन, वही, पुस्तक यापैकी एखादी वस्तू भेट देता येते. आपण अनाठाई खर्च करून वाढदिवस साजरे करतो, त्यापेक्षा गरीब व गरजू मुलांना एक दिवस आनंद देऊ शकतो.

व्यवसाय :

(क) रिकाम्या जागी पत्रातील योग्य शब्द लिहा.

१. वादळी पाऊस पडत होता म्हणून आम्हाला ______ रद्द करावा लागला.

२. परेशसाठी घेतलेली भेटवस्तू तशीच _______  ठेवली आहे.

३. संपूर्ण समारंभाचं _______  शुटींग करणार आहोत.

४. काल मी व बाबा _______ गेलो होतो.

५. मी _____ रंगाची सायकल पसंत केली.

६. या शाळेत ______ व ______ मुले शिकतात.

७. तेथील संचालकांची ______  घेऊन मुलांना भेटलो.

८. सायंकाळी वाढदिवसाचा _________ समारंभ केला.

९. _______ वस्तीतील एखाद्या बालवाडीस भेट  देता येईल.

१०. प्रेमळ ______ आहे.

उत्तर  (१) बेत

(२) जपून

(३) व्हिडिओ

(४) बाजारात

(५) निळ्या

(६)  मुकी, बहिरी

(७) परवानगी

(८) साधासा

(९) गरीब

(१०) सूचना

(ब) कंसातील शब्दांची योग्य रुपे घालून खालील वाक्ये पूर्ण करा.

१. मी आज येथे आहे. (असणे)

२. मी काल बाहेरगावी होतो. (असणे)

३. मी उद्या मुंबईस असने. (असणे)