प्रश्न :

अ)  कवितेच्या आधारे कवितेतील ‘अ’ गटात दिलेल्या काव्यांशांची  ‘ब’ गटात दिलेल्या काव्यांशांच्या पर्यायांपैकी योग्य जोडी लावून काव्यापंक्ती पुन्हा लिहा.

  ‘अ’ गट                                                           ‘आ’ गट

१)   नाचूं कीर्तनाचे रंगी                           १)    तेथे राहू निरंतर

२)   परेहून परते घर                ‌‌        ‌        २)    तेचि माझे रुप पूर्ण

३)   सर्वांचे जे अधिष्ठान ‌                ‌        ३)    ज्ञानदीप लावू जगी

उत्तर              ‘अ’ गट                                                 ‘आ’ गट

१)   नाचूं कीर्तनाचे रंगी                          १)   ज्ञानदीप लावू जगी

२)   परेहून परते घर                ‌‌        ‌       २)    तेथे राहू निरंतर

३)   सर्वांचे जे अधिष्ठान ‌                ‌       ३)     तेचि माझे रुप पूर्ण

आ)  खालील ओळींतील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या पर्यायी शब्दांपैकी योग्य शब्द घालून ओळी पूर्ण करुन लिहा.

१.  परिसाचेनि संगे ________ होय सुवर्ण।  (पोलाद, लोह, खनिज)

२. सर्व __________ माझाई । (गाठुनी, सोडुनी, सांडूनी)

३. कीटकी ध्याता ________ झाला तोचि वर्ण। (भुजंग, मुंगी, भृंगी)

४.  वनस्पति ________ चंदन झाला जाण। (दरवळू, परिमळू, पसरवू)

५.  _______ सत्ता आली हाता । (अवघी, सारी, सकल)

६._______ कीर्तनाचे रंगी । (खेळूं, नाचूं, हसूं)

उत्तर   १.  परिसाचेनि संगे लोह होय सुवर्ण।

२. सर्व  सांडूनी माझाई ।

३. कीटकी ध्याता भृंगी झाला तोचि वर्ण।

४.  वनस्पति परिमळूचंदन झाला जाण।

५.  अवघी सत्ता आली हाता ।

६. नाचूं कीर्तनाचे रंगी ।

इ)  खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

१) ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संत नामदेवांनी कोणता मार्ग सांगितला आहे ?
उत्तर.  ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संत नामदेवांनी कीर्तनाचा मार्ग सांगितला आहे.

२)  कीर्तनाचा रंगी नाचून नामदेव कोणता दीप लावू इच्छितात ?
उत्तर. कीर्तनाचा रंगी नाचून नामदेव ज्ञानाचा दीप लावू इच्छितात.

३. सर्वांच्या अधिष्ठानाला नामदेव कोणते रुप म्हणतात ?
उत्तर. सर्वांच्या अधिष्ठानाला नामदेव आपले पूर्ण रूप म्हणतात.

४. कोणाच्या संगतीने लोहाचे सुवर्ण होते ?
उत्तर. परिसाच्या संगतीने लोहाचे सुवर्ण होते.

५.  ध्यान करणाऱ्या कीटकाला कोणाचा वर्ण (वंश) प्राप्त होतो ?
उत्तर. ध्यान करणाऱ्या कीटकाला शिवभक्ताचा (शवगणाचा) वर्ण (वंश) प्राप्त होतो.

६. कोणाच्या संगतीत वनस्पती सुगंधी (परिमळू) बनतात ?
उत्तर. चंदनाच्या संगतीत वनस्पती सुगंधी (परिमळू) बनतात.

ई) खालील प्रश्नांची प्रत्येकी पाच ते सहा वाक्यांत उत्तरे लिहा.

१. कीर्तनामध्ये रंगल्याने  मिळालेल्या आनंदाचे वर्णन नामदेवांनी कसे केले आहे ?
उत्तर. कीर्तनामध्ये तल्लीन होऊन नाचल्यामुळे नामदेव चराचर सुष्टीला विसरून गेले. अवघी सुष्टी विठ्ठलरखुमाई बनून आपल्याजवळ नाचात असल्याच्या आभासाने त्यांचे चित्त प्रफुल्लित झाले आहे. लौकिकाच्या पलीकडे असलेला मोक्ष हेच माझे घर आहे. भक्तिमार्गानेच मी तेथे पोचू शकेन. विठ्ठल- रखुमाई माझ्या परमसंतोषाचा स्त्रोत आहे. आपण सारे तेथे निरंतर राहूया. सर्वांचे मूळ वसतिस्थान तेच तर माझे पूर्ण रुप आहे. लौकिकाच्या पलीकडची सारी सत्ता माझ्या हाती आल्याचे सुख कीर्तनाच्या रंगात नाचत असताना लाभते. ते सुख मजबरोबर तुम्हालाही लाभेल. माझ्या गुरूच्या – विसाबो खेचरांच्या दातृत्वामुळेच मला हे परमसुख, अवर्णनीय आनंद प्राप्त झालेला आहे.

२. संतांच्या सहवासात असलेल्या भक्तांत घडून बदल नामदेवांनी कोणत्या उदाहरणांतून स्पष्ट केले आहे ?
उत्तर. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊन जाते. सामान्य कीटक परमेश्वराचे ध्यान करू लागला तर तोही शिवदास होऊन जातो. परमेश्र्वराचा परम भक्त बनून जातो. कोणताही वनस्पती चंदनाच्या सान्निध्यात चंदनाचा सुगंध (परिमळू) प्राप्त करू शकते. वृत्तिप्रवृत्ती वेगळी असली तरी सत्संगतीचा परिणाम चांगलाच होतो. या तीन उदाहरणांतून नामदेवांनी संतांच्या सहवासात असलेल्या भक्तांना परमेश्वराची भेट होते व ते संतपदास पोचतात हे स्पष्ट केले आहे.