प्रश्न :

काव्यांशाच्या जोड्या जुळवा.

  अ                                                                  ब

१) मने इच्छा पुरविली।              –                 १)  तुका म्हणे दुसरे ।।

२) साधक वाचक पंडित।            –                २)  करी आपुलेचि दास्य ।।

३) नाही नाही आनु दैवत।           –                ३)  श्रोते वक्ते एका मात ।।

४) मन माऊली सकाळांची ।।

उत्तर                      अ                                               ब

१) मने इच्छा पुरविली।            –          मन माऊली सकाळांची ।।

२) साधक वाचक पंडित।          –          श्रोते वक्ते एका मात ।।

३) नाही नाही आनु दैवत।        –           तुका म्हणे दुसरे ।।

(आ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यांत लिहा.

१)   तुकाराम महाराजांनी मनास कोणाची उपमा दिली आहे.
उत्तर.   तुकाराम महाराजांनी मनास माऊली, गुरू, शिष्य यांची उपमा दिली आहे.

२)  सर्व सिद्धींचे कारण असे तुकाराम महाराजांनी कशास म्हटले आहे  ?
उत्तर.  सर्व सिद्धींचे कारण असे तुकाराम महाराजांनी मनाला म्हटले आहे.

३)  तुकारामांनी दैवत कोणास म्हटले आहे  ?
उत्तर.  तुकारामांनी मनाला दैवत म्हटले आहे.

४)  तुकारामांनी कोणाकोणाला ऐकण्याची विनंती केली आहे  ?
उत्तर.  तुकारामांनी साथक, वाचक, पंडित, श्रोते आणि वक्ते यांना ऐकण्याची विनंती केली आहे.

५)  तुकाराम महाराजांचे ४१ वर्षांचे उणेपुरे आयुष्य कोठे गेले  ?
उत्तर तुकाराम महाराजांचे ४१ वर्षांचे उणेपुरे आयुष्य पुण्याजवळच्या देहू गावात गेले.

६)  तुकाराम महाराज कोणाचे परम भक्त होते  ?
उत्तर.   तुकाराम महाराज पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त होते.

(इ)  खालील प्रश्नांची पाच ते सहा वाक्यांत उत्तर लिहा.

१) या अभंगातून तुकाराम महारजांनी परमार्थाची शिकवण कशी दिली आहे ?
उत्तर.  माणसाला परमार्थाकडे किंवा प्रपंचाकडे जायला उद्युक्त करते ते त्याचे मन. प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो. आपण आपले मन काबूत ठेवले तर अष्टसिध्दींवरही अधिकार मिळवू शकतो. प्रपंच नीट करूनही शेवटी मानवी जीवनाच्या बंधनातून मुक्ती मिळू शकते. आपले पूर्ण मन परमश्वरचरणी वाहिले तरच आपल्या मनात त्याची प्रतिमा अढळ राहते. त्याची पूजा मन नि:स्वार्थभावे करू लागते. परमेश्वरदर्शनासाठी दूर कोठे जाण्याची गरज नाही. मनाचे स्वरूप कसेही असो; ते खऱ्या भक्तासाठी आईचे असते. आईचे वात्सल्य, गुरूचा उपदेश व ज्ञान, शिष्याची नम्रता आपल्याठायी एकवटली की परमार्थाकडे जाणारी वाट सोपी बनते. म्हणून साथक, वाचक, विद्वान, श्रोते, वक्ते यांनी परमार्थ साधण्यासाठी मन प्रसन्न ठेवले पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरे दैवत नाही.

ई) विरूद्ध अर्थाचे शब्द लिहा.

१.   प्रसन्न  × _______

२.   श्रोता  × _______

३.   प्रगती  × _______

४.   गुरू  × ________

५.   समाधान  × _____

६.   इच्छा  × _______

७.   सोप  × _______

८.    दूर  × ________

९.    पूर्ण  × _______

१०.  दुःख  × ________

उत्तर   १.     प्रसन्न   ×     अप्रसन्न

२.     श्रोता      ×      वक्ता

३.     प्रगती     ×     अप्रगती

४.     गुरू         ×     शिष्य

५.     समाधान  ×    असमाधान

६.     इच्छा       ×    अनिच्छा

७.     सोप         ×    कठीण

८.     दूर          ×     जवळ

९.     पूर्ण        ×     अपूर्ण

१०. ‌‌  दुःख        ×    सुख