वाक्यप्रचार :

१. वाघ पाठीस लागणे – फार गतीने भरभर काम करणे.

२. खडे फोडणे– नाव ठेवणे.

३. खूणगाठ बांधणे – आठवणींसाठी वस्त्राच्या टोकाला गाठ मारणे.

४. हात धुऊन पाठीस लागणे – पाठपुरावा करणे, पिच्छा करणे.

५. तोटा नसणे – कमतरता नसणे.

६. गाठ पडणे- भेट होणे.

७. पान न हालणे – यत्किंचितही कार्य न होणे.

प्रश्न :

(अ) खालील विधानांस चार पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यांपैकी अचूक पर्याय निवडून विधान पूर्ण करून लिहा:

क. मला स्मरणशक्ती द्यायला _________

१. देव अजिबात विसरला की काय?

२. ब्रम्हदेवअजिबात विसरला की काय?

३. देशमुख अजिबात विसरले की काय?

४. मथुरा अजिबात विसरली की काय?

ख. खाणावळीतली दोनदोनशे पाने हालवायला __________.

१. तुझ्यासारखी स्त्रीच पाहिजे.

२. तुझ्यासारखी खंबीर गृहिणीच पाहिजे.

३, तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे.

४. तुझ्यासारखी नारीच पाहिजे.

उत्तर क) मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय ?

उत्तर ख) खाणावळीतली दोनदोनशे पाने हालवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे .

(आ) खालील विधाने कोणी, कोणास म्हटली आहेत ते लिहा.

१. पण हळदकुंकवाला आधार म्हणून –
उत्तर.  हे विधान मथुराने आपल्या पती गोकूळला म्हटले आहे.

२. आता तुला वाटले तर ठेव चूल बंद !
उत्तर.   हे विधान गोकूळने पत्नी मथुराला म्हटले आहे.

३, बाई, बाई, बाई हद्द झाली आता!
उत्तर.   हे विधान मथुराने पती गोकूळला म्हटले आहे.

४. पाहिलेस. हे असे होते.
उत्तर.  हे विधान गोकूळने पत्नी मथुराला म्हटले आहे.

५. म्हशीची शिंगे म्हशीला काही जड होत नाहीत!
उत्तर.  हे विधान मथुराने पती गोकुळला म्हटले आहे.

६. त्याने केला दिवाळसण, पण माझे निघाले दिवाळे !
उत्तर.  हे विधान गोकुळने पत्नी मथुराला म्हटले आहे.

७. पण तुझ्या गुणावर पांघरूणसुद्धा घालील!
उत्तर.  हे विधान गोकूळने पत्नी मथुराला म्हटले आहे.

(इ) खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यांत उत्तरे लिहा :

१. गोकूळचा स्वभाव कसा आहे ?
उत्तर.   गोकूळचा स्वभाव विसरभोळा आहे.

२. मथुरा गोकूळास आठवण रहाण्यासाठी काय करावयास सांगते ?
उत्तर . मथुरा गोकूळास आठवण रहाण्यासाठी उपरण्याला खूणगाठ बांधायला सांगतो,

३. गोकूळ वाण्याच्या दुकानात काय आणावयास गेला होता ?
उत्तर.  गोकूळ वाण्याच्या दुकानात शेरभर साखर व तोळाभर केशर आणावयास गेला होता.

४. ‘गोकूळ’ ह्या पाठाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर.   ‘गोकूळ ह्या पाठाचे लेखक रा. ग. गडकरी आहेत.

५. मथुराचे वडील कोणता व्यवसाय करतात ?
उत्तर.   मथुराचे वडील खाणावळ चालविण्याचा व्यवसाय करतात.

६. प्रस्तुत नाट्यउतारा कोणत्या नाटकातून घेण्यात आला आहे ?
उत्तर.  प्रस्तुत नाट्यउतारा ‘ प्रेमसंन्यास ‘ ह्या नाटकातून घेण्यात आला आहे.

(इ) खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा:

१. गोकूळच्या जन्माचे सार्थक कशामुळे झाले?
उत्तर.   कोणतीही गोष्ट विसरायचे गोकूळ विसरत नाही; आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे त्याची बायको विसरत नाही. अशाप्रकारे त्याचा विसराळूपणा आणि त्याची भांडखोर बायको या दोहोंमुळे गोकूळच्या जन्माचे सार्थक झाले.

२. गोकूळने वाण्याकडून सामान आणणे उद्यावर का टाकले?
उत्तर.  गोकूळ वाण्याच्या दुकानावर सामान आणायला गेला पण शेरभर साखर व तोळाभर केशर की  तोळाभर साखर व शेरभर केशर बायकोने आणायला सांगितले, याची आठवण त्याला काही केल्या होईना. तो संभ्रमात पडला. घरी आल्यावर देशमुखांकडे जाण्याची आठवण बायकोने त्याला करून दिली. म्हणून सामान आणणे त्याने उद्यावर टाकले.

३. विसरभोळा गोकूळ कोणती गोष्ट विसरत नाही ?
उत्तर.  गोकूळची बायको नेहमी त्याच्या नावाने खडे फोडीत रहाते, म्हणून गोकूळ स्वतःचे नाव मात्र विसरत नाही.

४. चांगला पोशाख घालून निघालेला गोकूळ अर्ध्यावरून घरी परत का आला ?
उत्तर.  चांगला पोशाख घालून निघालेला गोकूळ आध्या वाटेत आपल्याला कोठे जायचेच हेच विसरून  गेला. बायकोला विचारून माहिती करून घ्यावी म्हणून तो परत आला.

(ई)  खालील प्रश्नांची प्रत्येकी चार ते सहा वाक्यांत उत्तरे लिहा.

१. गोकूळने मथुरेस हाका मारण्याचा सपाटा का सुरू ठेवला ?
उत्तर.  आपण घरी परत कशासाठी आलो याचा विसर पडण्यापूर्वी बायकोला हाका माराव्यात. एका हाकेने ती ओ देणार नाही. थोडा उमीर झाला तर कदाचित तिला तेथे येण्याची आठवण राहाणार नाही. परत परत हाका मारल्या म्हणजे ती लगेच बाहेर येईल. म्हणून गोकूळने मथुरेस हाका मारण्याचा सपाटा सुरू ठेवला.

२. गोकूळ कोणकोणत्या गोष्टी विसरत होता ?
उत्तर.  दुकानातल्या कोणत्या वस्तू व किती विकत आणाव्यात ते विसरणे, बायकोला काय विचारायचे ते विसरणे, देशमुखांच्या घरी जाणे हे विसरणे, देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचे आहे हे विसरून जाणे. ह्या गोष्टी गोकूळ विसरत होता.

३. दिवाळी सणाबद्दल गोकूळ काय काय म्हणाला ?
उत्तर  : बायकोच्या बापाने आग्रहाने दिवाळीसणासाठी आपल्याकडे गोकूळला त्याच्या बायकोसह बोलावून घेतले. महिनाभर ठेवून घेतले. महिना झाल्यावर प्रति महिना नऊ रुपयेप्रमाणे अठरा रुपये आपल्याकडून खाणावळ वसूल करून घेतली. सासऱ्याने केला दिवाळसण पण आपले निघाले दिवाळे, असे गोकूळ म्हणाला.

४. ‘देशमुखांकडे जायलाच पाहिजे’ याची कोणती कारणे गोकूळने बायकोला सांगितली?
उत्तर.   देशमुखांनी लहानपणापासून गोकूळला वाढवले. लिहायला वाचायला शिकविले. संसार थाटून दिला. त्यांच्या उपकाराची जाणीव त्याला आहे. शिवाय आज त्यांच्याकडे पाहुणे येणार आहेत. चार माणसे जमणार आहेत. पाहुण्यांच्या पंक्तित बसण्याचे आमंत्रणही देशमुखांनी गोकूळला दिलेय. ‘देशमुखांकडे जायलाच पाहिजे’ याची ही कारणे गोकूळने  बायकोला सांगितली.

 भाषाभास :

भाववाचक  नाम

ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु‌ यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, कर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात.

उदा.  धैर्य, कीर्ती, चागुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इत्यादी.

उदा काही वाक्ये –

१. त्याची कीर्ती रोज वाढत आहे.

२. चांगुलपणा माणसाचा अलंकार आहे.

३. आईच्या वात्सल्याला तोड नाही.

४. शिवाजी महाराजांचे शौर्य विश्वाला परिचित आहे.

भाववाचक नामे कशी तया करावीत.

सामान्य नामे व विशेष नामे यांना य, त्व, पण, पणा, ई, ता, गिरी वा आई यांसारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात. पुढील तक्ता पाहा.

क्र. शब्द प्रत्यय भाववाचक नाम आणखी भाववाचक

२.

३.

४.

५.

६.

..

८.

९.

१०.

 

शूर

मित्र

देव

लबाड

नम्र

पाटील

गुलाम

गोड

चपळ

बेबंद

 

त्व

पण

ता

की

गिरी

वा

आई

शाई (शाही)

 

 

 

 

 

शौर्य

मित्रत्व

देवपण, देवपणा

लबाडी

नम्रता

पाटीलकी

गुलामगिरी

गोडवा

चपळाई

बेबंदशाई (शाही)

 

 

सौंदर्य, माधुर्य

शत्रुत्व, क्रूरत्व

माणूसपण, चांगुलपणा

चहाडी, ईमानदारी

मधुरता. क्रूरता

आपुलकी, वडीलकी

लुच्चेगिरी, भामटेगिरी

थंडावा, गारवा

भलाई, नवलाई

हुकूमशाही (शाही)

 

उदा. – (संस्कृत) प्राचुर्य, सौंदर्य, गुरुत्व, महत्ता, रौद्रता
टीप : य. त्व, ता या संस्कृत प्रत्ययांनी, पण, पणा, ई, की या मराठी प्रत्ययांनी, गिरी,  शाई या फारसी प्रत्ययांनी भाववाचक नामे बनतात,

(मराठी) मनुष्यपण, नवलाई, आपुलकी, देवपणा

(यवनी) लुच्चेगिरी, भामटेगिरी, बेबंदशाई (शाही)