प्रश्न :

(अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा:

१) फळ खाण्याआधी कोणती काळजी घ्यावी असे रामदास म्हणतात?
उत्तर. फळ खाण्याआधी ते ओळखण्याची काळजी घ्यावी असे रामदास म्हणतात.

२) पराक्रम केव्हा सांगावा असे रामदास म्हणतात?
उत्तर. आधी पराक्रम करावा आणि मगच सांगावा असे रामदास म्हणतात.

३) मैत्री कोणाशी करू नये असं रामदास सांगतात?
उत्तर.  वाचाळाशी मैत्री करू नये असं रामदास सांगतात.

(आ) खालील प्रस्नाचे उत्तर पाच ते सहा वाक्यांत लिहा :

१. ‘वाट पुसल्याविण जाऊ नये’ या ओवीत रामदासांनी कोणता उपदेश केला आहे?
उत्तर. माणसाने कसे वागू नये हे सांगताना समर्थ रामदास म्हणतात, की वाट विचारल्याशिवाय जाऊ नये. म्हणजेच जीवनाची वाटचाल करताना आपण योग्य दिशेने करतो आहोत काय, याची खात्री करूनच पाऊल पुढे टाकावे. आपल्या कर्मातून आपल्याला फळ मिळत असते. आपण जसे कर्म करू त्याप्रमाणे फळ मिळते, ते फळ उपभोगण्यापूर्वी आपण खात्री करून घ्यावी. योग्य वर्तनाविषयी स्पष्ट करताना समर्थ म्हणतात, की अधाशीपणे वस्तू पारखण्यापूर्वी घेऊ नये. क्षणाक्षणाला रुसून बसू नये, नाराज होऊ नये. तसेच खोटा मिजास सांगू नये. प्रथम करावे व नंतरच आपला पराक्रम सांगावा. धुम्रपान किंवा मादक द्रव्यांपासून दूर राहावे. तसेच वाचाळांशी मैत्री कधीच करू नये.